आजचा दिवस खूपच वेगळा...! `जुनं ते सोनं` अंतर्गत काल झालेले mega
scale sorting च्या वाटपाचा आजचा दिवस. पुणे जिल्ह्यातील खेड व मुळशी
तालुक्यातील वाटपासाठी आज 5 टीम
्स सकाळी ८ वा.निघाल्या.बापूकृपेन े मला या सेवेत जायला मिळालं. तिथे पोहोचताना व पोहोचल्य...ानंतर ज्या कार्यकर्त्यांनी हा सर्व्हे केला त्यांना मनापासून सलाम केल ा.
इतक्या दुर्गम भागात खडतर मार्गाचा हा सर्व्हे त्यांनी कसा केला?
एकच उत्तर-त्यांच्या पाठीशी असलेल्या बापू या
शक्तीमुळेच.! ज्यांना वाटप केलं गेलं त्यांच्याकडे पाहिलं तर बापूंनी आपल्याला किती सुखात ठेवलंय याची तीव्रतेने जाणीव होते. वाटपात मिळालेल्या वस्तूंमुळे ल ाभार्थींच्या
चेहऱ्यावरील आनंद पाहणं हा एक अनुभवच... प्रतिकूलता तिथेच जाणीव हेच
खरं..! आपण खूप अनुकूलता असूनही सारखे कुढत असतो.
तसाच अनुभव प्रथमच बापूंच्या चि न्मय पादुकांचं पूजन करणाऱ्या श्रद्धावानांना झालेल्या अतीव आनंदाचे चेहरे पाहताना ये तो. आपल्याला सहजप्राप्त गोष्टींची किंमत लवकर कळतच नाही. बापूंचं पादुकापूजन करायला मिळणं ही बापूंची आपल्यावर कृपा आहे,आ पण काही श्रेष्ठ भक्तीची गाठोडी घे ऊन आलेलो नाहीत याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडायला लागतो. मग आपण पादुकापुजनासाठी वाढदिवसासारखे मुहूर्त पाहू लागतो. तो मात्र आपल्याला सदैव साथ देत असतो,मदत पुरवत अस तो..मुहूर्त न पाहता...! बापू आपल्याला दिसतात,त्यांना पाहता येतं,त्यांच्याबरोबर नाचता-हसता येतं याचं महत्त्व आपल्याला कितपत स्मरणा त राहातं
कोण जाणे. आपल्याला सर्व सहज वाटू लागतं आणि मग येतो casual approach..
बापू काय दर गुरुवारी दिसतात, गुरुक्षेत्रमला असतात..अरे ,बाप ू
लाख सांगोत, `मी तुमचा मित्र आहे` तो त्यांचा मोठेपणा झाला, पण तो सर्व
देवांचाही देव आहे याची जाणीव आपण दर श्वासाला आपण ठेवायला हवीय आणि
सतत कृतज्ञ राहायला हवं.! या कृतज्ञतेसाठी तरी या
देवाचं पादुकापूजन अगदी MUST .. खरंच या सेवा सप्ताहाने अनेक स्तरांवर मला चिंतनशील केलंय.. आज `मायेची ऊब`अंतर्गत नंदाईच्या लेकींनी 21 गोधड्या तयार केल्या .
आता कालपासून सिंहसुद्धा या सेवेत पुढे सरसावले आहेत बरं..!
`गणेशमूर्ती`सेवेत लगद्याचे 75 गोळे,10 मूर्ती
फिनिशिंग तसेच 25 मूर्तीवर रंगक ाम केले गेले.
`चरखा` नेहमीप्रमाणेच जोरात...171 लडी बापूचरणी अर्पण.. आजचे `जुनं ते
सोनं` अंतर्गतच्या वाटपाचे लाभार्थी- तब्बल 3300 ! Bapu Thy Grace
!!! छान सेवेमुळे `सत्संग` tonic चा डोस चांगलाच रंगला...! फुल्ल धमाल
....
Friday, June 10, 2011
भक्ती-सेवा सप्ताह : दिवस चौथा !
आजचा दिवस भक्तिपेक्षा कांकणभर जास्त सेवेचाच..! पहाटे ठीक
6 वाजता पुण्याहून 35 - 40 कि.मी.अंतरावरील कासारसाई गावात आपले
केंद्राकार्यकर्ते रवाना झाले. कार्यक्रमस्थळी ती मंडळी आली ती
दोन ट्रक भर कपडे घेऊनच..! `जुनं ते सोनं` अंतर्गत या कपड्यांचे MEGA SCAL E... वर sorting झाले.(किती म्हणून विचा रताय? कृपया फोटो पहा.) `मायेची उब ` कक्षात आज 11 गोधड्या तयार झाल् या. आज या सेवेत सिंहांनीसुद्धा सहभाग घेत ला..(`आम्हालाही येतं`
हे दाखवायला नाही बरं का ! ) `गणेशमूर्ती`सेवेत आज 75 गोळे तयार होऊन
55 मूर्तींचे फिनिशिंग केले गेले. `चरखा`सुद्धा आज वेगात..!
एकंदर 190 लडी व 100 बॉबिन्स बापूचरणी अर्पण ...! `सत्संग` म्हणजे
दिवसभराचा थकवा विरघळवून टाकणारं tonic ! आजही कोण प्रमुख,कोण
कार्यकर्ता,कोण भक्त काही कळत नव्हतं....माझ्या बापूसमोर सगळे समान पातळीवर ! `बापू भक्त` ही एकच आणि खरी ओळख..!
भक्ती-सेवा सप्ताह : दिवस तिसरा !
७ जून २०११ ! आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे प.पूज्य बापूंच्या पादुकापुजनाने झाली. आणखी ५ नवीन मंडळींना पूजनाचा ल
ाभ मिळाला.विशेष म्हणजे आज पूज न सांगायला होते पुणे केंद्राचे प्रमुख सेवक प्रवीणसिंह वाघ..! अत्यंत भावपूर्ण वातावरणात श्री अनिरुद्धांचे प...ूजन संपन्न झाले. आज `गणेशमूर्ती`सेवेअंतर्गत कक्षात केलेली सजावट अप्रतिम होती. `नवविधा भक्ती`च्या प्रत्येक पा यरीवर मुर्तीप्रक्रियेचा एकेक टप्पा हि कल्पनाच खूप सुंद र..! बापूंवरील वृद्धिंगत होत जाणार े प्रेम नवनवीन कल्पनांना जन्म देते हेच खरं..!
लगद्याचे एकंदर 100 गोळे तयार झाले व 30 मूर्तींचे फिनिशिंग केले
गेले.प.पूज्य नंदाईच्या लेकीसुद्धा आज फुल्ल फॉर्मात होत्या..
70 लेकींनी एकेंदर 18 गोधड्या तयार केल्या..! आनंदे गुरुमाय...!`जुनं
ते सोनं` अंतर्गत आज 149 कुटुंबातील 600 लाभार्थींच्या कपड्यांचे वर्गीकरण
व बांधणी (packing) करण्यात आली. आज `चरखा`ही जोरातच फिरत होता.एकूण 100
लडी आणि 205 बॉबिन्स बापूचरणी अर्पण करण्यात आल्या. (
achievement ना ? ) दिवसअखेरचा `हरिपाठ` हा उर्जास्त्रोत
ठरतोय...त्यानंतरचा सत्संग हा, ज्यांचं बापूंवर मनापासून प्रेम आहे आणि
ज्यांना म्हणून `त्याचं`नाम आळव ावंसं वाटतं,अशा
श्रद्धावानांकडून सादर केला जातो. `गायकी`नाही तर बापूंना अपेक्षित `भाव`
असणारे बरेच `भावगायक` बापू सर्वांसमोर आणत आहेत...! मी `गायक`आहे हा
विचार न ठेवता मी `त्याचा`सेवक आहे हा भाव ठेऊन बापूनाम घेणाऱ्यावर बापू
खूष होताना दिसत आहेत. तिसरा `भाव`पूर्ण दिवस संपन्न...!
भक्ती-सेवा सप्ताह : दिवस दुसरा ...!
भक्ती-सेवा सप्ताहाचा आज दुसरा आनंद दिन..! आजच्या दिवसाची सुरुवात
प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या पूजनाने झाली. प्रथमच पादुका पूजन
करणाऱ्या आजच्या मंडळींना त्यांच्या डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंना सोबत
घेऊनच येत होता. आज सेवा उपक्रमांना सुरुवात झाली... ती भक्त-कार्यकर्त्यांच्या उदंड उत्साहात...! आज `मायेची ऊब` अंतर्गत एकूण 13 गोधड्या तयार झाल्या. `प.पूज्य नंदाईच्या लेकी` अगदी तल्लीन हो ऊन सेवा करताना पाहायला मिळाल्या.`चरख्य ाचे`
चक्रसुद्धा वेगात होते.एकंदर ३६ चरख्यांची मांडणी केली गेली.दिवसअखेर
35 तयार लडी व 150 भरलेल्या बॉबिन्स बापूचरणी अर्पण करण्यात
आल्या. `गणेशमूर्ती`सेवेस मिळालेला प्रतिसादही उल्लेखनीय होता. आकर्षक आणि
अर्थपूर्ण सजावट असलेल्या या कक्षात एकंदर 75 गणेशमूर्तींच्या
finishing चे 25 % काम पूर्ण करण्यात आले. तसेच कागदाच्या लगद्याचे 103 गो ळे तयार झाले. आजची
सर्वांत प्रशंसनीय सेवा म्हणजे `जुनं ते सोनं`अंतर्गत झालेली सेवा ! काही
तासांच्या कालावधीत एकूण 411 कुटुंबांतील अंदाजे 1650 व्यक्तींच्या
कपड्यांचे स्त्री-पुरुष-वृद्ध-लहान बालके यांच्या वयोगटानुसार वर्गीकरण
करून त्यांचे व्यवस्थित packing करण्यात आले. या सेवेत आपापल्या
कुवतीनुसार सर्व वयोगटातील सर्व जणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून बापू
नक्कीच आनंदले असतील..!श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजाचे,
मातृवात्सल्यविन्दानमचे, गुरुचरित्राच्या १४ व १८ व्या अध्यायांचे पठण हे
सेवा `समर्पित` भावाने करण्याची शिकवण देणारे होते. सेवा करताना नकळत
जागृत झालेला अहंभाव `त्याच्या` नामसंकीर्तनात विरघळून जातो याची
पुनःप्रचीती आली. नंतर पुन्हा `हरिपाठा`ने दिवसाची पूर्तता
झाली...अतिशय तृप्त भावनेने...!
भक्ती-सेवा सप्ताहास सुरुवात उत्साहात...!
प.पूज्य बापू, नंदाई, सुचितदादा यांच्या कृपाशिषाने भक्ती-सेवा सप्ताहाला उत्साहात प्रारंभ झाल
ा. उपक्रमाची सुरुवात उपक्रम स्थळाच्या स्वच् छतेने झाली. यावेळी पर्जन्यराजाने दणदणीत सल ामी देऊन उपक्रमास शुभेच्छा दिल ्या..प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या आ गमनाच...े वेळी मात्र त्याने `मौन`
पाळले...प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या
पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी विशेष म्हणजे पुणे केंद्राने आव ाहन केल्याप्रमाणे अशा मंडळींना पूजनाचा लाभ मिळाला ज्यांना इच ्छा असूनही काही अडचणींमुळे,घरा तील निष्कारण विरोधामुळे त्यांच ्या घरी पादुका पूजन करता येत न ाही.. केंद्राच्या या आवाहनाला खूप छा न प्रतिसाद मिळाला आणि बापुकृपेने त्यांना आनंद दे ता आला. त्यानंतर झाला `सत्य प्रवेश`...पुढे श्रीगुरुच रित्र अध्यायांचा मेरुमणी अध्या य १४ वा चे पठण झाले..आणि त्यानंतरचा कळस गाठणा रा संतश्रेष्ट श्री ज्ञानदेवांच ा `हरिपाठ`...! `आजचा दिनु ऐसा गोड जाहला...`!!
Subscribe to:
Posts (Atom)