mail @ --> kedarsinh.madan@gmail.com
tohakinara@rediffmail.com
kalpeshmadan@ymail.com
-------------------------------------------------------
माझ्या प्रारब्धाचा गुंता
भेदू पाही माझ्या देहा
माय बाप अनिरुद्ध
त्याची अखंड छत्र छाया
माझ्या पापांच्या राशीत
गुंतलो अडकलो पुरा
"क्षमा" आईच्या नामात
प्रेम भरवी वासरा
नाही पुण्याला गुणिले
नाही पापाला भागिले
भक्ती-सेवेच्या गणिताचे
सोपे समीकरण सोडविले
माझ्या जीवन नदीचा
स्वये होवूनिया घाट
दावूनी जीवन विकासाची दिशा
रात्रांदिसा उभा घेण्यास कवेत
आता कैचे आम्ही मलीन
नाही दुबळे ना दीन
दावू यमदूता ठेंगा
होवू अनिरुद्ध सागरात विलीन
-संतोष कृष्णा राणे,
कालिना-सांताक्रूझ (पूर्व)
------------------------------------------------------------------------------------------------
लिहू तर लिहू काय काहीही कळत नाही,
मनातल्या विचारांचा ओघ काही थांबता थांबत नाही,
सुचली एकाधी ओळ जरी मला,
तरीही ती पूर्ण काही होत नाही,
कारण तुझ्याशिवाय बापु आता दुसर काही सुचतच नाही...
कारण तुझ्याशिवाय बापु आता दुसर काही सुचतच नाही...
-केदार मदन
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सावळे सुंदर बापूचे रूप मनोहर ,
हृदयी माझ्या विरजिले !!दृ !!
गोड नामात ह्याच्या झालो मी धन्य ,
अनिरुद्ध अनिरुद्ध , चरणी तुझ्या शारण्य !! १ !!
तुझे हास्य पाहण्या आलो मुंबई नगरीत,
तुझे दर्शन होता मीच झालो पतित !!२!!
बाळ हा मी तुझा बापू आलो शरण ,
घ्यावे जवळ मजला मी तो अभागी बटिक !!३!!
- केदारसिंह मदन ,
डोंबिवली {पूर्व }
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
मित्रांनो, टाळी एका हाताने वाजत नसते ||धृ||संशयाचे हळ कल्लोळ,
उगाचच उपजत नसतात.
जेव्हा आपण करतो नाती गढूळ ,
तेव्हाच ते निपजत असतात.
मैत्री म्हणजे माझ्यातल्या मी पणाची,
आणि तुझ्यातल्या मी पणाची आहुती,
जेव्हा हा स्वाहाकार थांबतो,
तेव्हाच मैत्री ला मिळणारी गती कुंठीत होते,
मैत्री तुरळक होऊन, संपते.
म्हणून सांगतो मित्रांनो,
टाळी एका हाताने वाजत नसते ||१||
दोष नसतो कुणाचाच,
न माझा, न तुझा,
तो असतो फक्त मी-पणाचा,
जेव्हा मैत्री पेक्षा ego मोठा होतो,
मैत्री मधल्या ओलाव्याला उष्णता मिळते,
प्रेमळ ओलाव्याला सुकवत, मैत्री विरते,
म्हणून सांगतो मित्रांनो,
टाळी एका हाताने वाजत नसते||२||
"तुटे वाद ,संवाद तो हितकारी"
परंतु आपल्याच शब्दाची उडते आपल्यावर पिचकारी
साधता संवाद, वाद होतो,
आपल्याच उणीवांनी समोरच्याचे तोंड भरते,
ह्या भरलेला शब्दांनी मन तिळ-तिळ तुटते,
म्हणून सांगतो मित्रांनो,
टाळी एका हाताने वाजत नसते||३||
बापूंचा सिंह , संकेत भंडारी .
कामोठे उपसना केंद्र .
21/11/2011
----------------------------------------------------------------------------------------------
IIहरि ओमII
“आईचं प्रेम”
आई चैत्राची पालवी
माया, ममतेचा झुला
वात्सल्याच्या गंधातूनी
घर आंगण खुलवी
आई वैशाखाच ऊन
छत्र छायेची माऊली
भोगी दुःखाचे चटके
उभी होऊन सावली
वाट पाही पावसाची
ज्येष्ठ मेघांच्या आडून
भेट माय लेकरांची
येते कंठात दाटून
मेघ मल्हाराची धून
आई आषाढाच्या सरी
तिचं विठ्ठला नमन
चालूनी संसाराची वारी
आई श्रावण क्षितीज
ऊन पावसाचा खेळ
तिच्या डोळ्यातून उमटे
सप्तरंगी धनुष्यी मेळ
गौरी गणपतीचा थाट
आई हिरवा भादवा
खेळ झिम्मा फुगडयांचा
लेकी - सूनांना भेटवा
पिवळ्या केशरी झेंडू माळा
विश्वमातेचा नवरात्री सोहळा
नऊ मास नऊ दिस
आई सोसे गर्भवास
आषाढ अश्विन अमावस्या
केली दिव्यांची आरास
आई तुझेच पूजन
तोची आम्हा मातृदिन
आई दीपावलीची शोभा
आई कार्तिकाचा मास
मला दाविलास देव
टिपूर चांदण्या रात्रीस
भक्ती भरलेला मास
कृष्ण स्वये मार्गशीर्ष
तुझ्यामुळे आलो जन्मास
लाभले देवाचे आशिष
पौष माघाच्या थंडीत
भास्कर मकर राशीत
तीळ-गुळ पोळ्या झाल्या फस्त
बाळ शिरे मायेच्या उबेत
नाना रंगांच्या दुनियेत
आई सावध फाल्गुन
जाळी दुर्गुणांची होळी
वसंत घालूनी ओंजळी
बारा मासांची रचना
आहे आईच्या देहात
देवही अखंड डुंबला
न्हाला आईच्या प्रेमात
सांताक्रूझ (पूर्व)
21/11/2011
21/11/2011
-------------------------------------------------------------------------------------------------------------
"जगणे फक्त तुझ्याच साठी"
नाती गोती अनेक होती
भेटले बहु आयुष्याच्या वाटेवरती
विचारांती अनेक प्रश्न मारुनी गेले मनास गाठी
असेल उत्तर एकाच ओठी
जगणे फक्त तुझ्याच साठी………..
लाडवाने मज गमत नव्हते
प्रेम उरी ते शून्यच होते
तुझ्या उरीचे प्रेमांकुर ते, वाढती माझ्या हृदयात
लाजून सांगे फांदी फांदी
जगणे फक्त तुझ्याच साठी………
नव्हती ओढ कधी कुणाची
जिव्हाळाही कधीच नव्हता
आसमंती ह्या भारावून प्रिती
सांडलेस आसू सागरकाठी
लिहितो त्याच मी वाळू वरती
जगणे फक्त तुझ्याच साठी………..
क्षितीजास तेव्हा पाहत होतो
भासत होते सारे चित्र-विचित्र
इंद्रधनुचे रंगही तेव्हा,
करीत होते माझ्या मलाच खंत
साक्ष देती ह्या वृक्षांच्या दाटी
जगणे फक्त तुझ्याच साठी…………
थांबली जरी हि रक्तवाहिनी
तुटली जरी हि हृदयरोहिणी
नको तुझ्या तेव्हा अश्रूधारा
बघ हसून त्या सरणावरती
असेल शेवट एकाच ओठी
जगणे फक्त तुझ्याच साठी………….
ये तिथेच पुन्हा दुसऱ्या दिवशी
पहाण्यास माझी ती राख माती
होऊनी अक्षरे सांगेल तुला ती
येईन पुन्हा मी तुझ्याचसाठी
तुझ्यासवे पुन्हा जगण्यासाठी………
संतोष कृष्णा राणे -
सांताक्रूझ (पूर्व)
22/11/2011
22/11/2011