Friday, August 26, 2011

गणपती बाप्पा मोरया अनिरुध्द बाप्पा मोरया

FACEBOOK NOTE BY SWAPNILSINH DATTOPADHYE. 
॥ हरि ओम ॥

आजपासून बरोबर पाच दिवसांनी श्री गणेशाचे आगमन होणार. कालच परमपूज्य बापूंनी त्यांच्या सर्व श्रध्दावान मित्रांना आपल्या घरच्या गणपतीचे आमंत्रण दिले.

# बुधवार दि. ३१-०८-२०११ रोजी ठिक ५.०० वाजता अमरसन्स, लिंकिग रोड, बांद्रा येथून श्री गणेशाचा प्रचंड उत्साहात वाजत गाजत आगमन सोहळा सुरु होईल. तेव्हा या आगमनाच्या मिरवणूकीला सर्वांनी या आणि हो हॅपी होमला बापूंचे दर्शन घेतल्यावर प्रसाद घेउन जायला विसरू नका.

# गुरुवार दि. ०१-०९-२०११ रोजी ९.०० वाजता गणपतीचे पूजन सुरु होईल व त्यानंतर ११.०० वाजल्यापासून रात्रा ९.०० वाजेपर्यंत दर्शन सुरु असेल. आणि अर्थातच त्यानंतर महाआरती होईल.

# शुक्रवार दि. ०२-०९-२०११ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत दर्शन सुरु असेल.  

# शनिवार दि. ०३-०९-२०११ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत दर्शन सुरु असेल.  

आणि त्यानंतर आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा पुर्नमिलाप सोहळा ( आपण विर्सजन मिरवणूकीला पुर्नमिलाप सोहळा असे म्हणतो ) ४.०० वाजता सुरु होईल. अत्यंत उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या वातावरणात बापूंबरोबर नाचत नाचत या गणरायाला आपण "पुढच्या वर्षी लवकर या" म्हणून आळवणार आहोत.हा मात्र त्यानंतर साक्षात नंदाई व सुचितदादांच्या हस्ते महाप्रसाद घेऊन जायला विसरू नका.

प.पू. बापू, प.पू नंदाई व प.पू. सुचितदादा यांच्या तर्फे मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आग्रहाचे निमंत्रण करतो.

(बर्‍याच जणांना असे वाटते कि आम्ही आगमनाच्या मिरवणूकीला येऊ शकत नाही. असे नाहिये. प्रत्येक जण या मिरवणूकीलाच काय पण या तिन दिवसात प्रत्येक कार्यक्रमाला येऊ शकतो.)

तेव्हा हि माहिती कृपया आपल्या सर्व श्रध्दावान पर्यंत पोचवा. व जमले तर पुढचे ४-५ दिवस हेच आपल्या "STATUS" वर राहू द्या जेणेकरून सर्वांना याची माहीती होईल.या संर्दभात काही अडचण असल्यास नक्की विचारु शकता.

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected