Tuesday, October 18, 2011

बापूंनी जागविला आत्मविश्वा्स.....

Source By Atmabal Mahotsav Page
रविवारी सायंकाळी एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित प्रवचन सोहळ्यात बापू बोलत होते. आपल्या एक तासाच्या प्रवचनात त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देत, साध्या आणि सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडविण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे आणि देवाला न विसरण्याचा मंत्रही दिला.
* क्षणचित्रे..


■ व्यासपीठावर चांदीचा मुलामा दिलेला बॅकड्रॉप आकर्षक पद्धतीने बनविण्यात आला होता. त्या पार्श्व्भूमीवर मध्यभागी भद्रकालीमाता, डाव्या बाजूला हनुमान आणि उजव्या बाजूला स्वामी सर्मथांच्या प्रतिमा होत्या.


■ बापूंचे ६.३५ वाजता व्यासपीठावर आगमन झाले. त्यांना विद्यार्थ्यांनी बॅण्डच्या तालावर मानवंदना दिली.

■ मैदानात आकाशकंदील लावण्यात आले होते आणि गुढय़ा उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे साधू संत येती घरा.. तोचि दिवाळी दसरा.. याची अनुभूती भाविकांना येत होती.

■ बापूंचे प्रवचन सुरू होताच आल्हाददायी मंद पवन सुरू झाला.


■ बापूंनी दिल्या यशस्वी जीवनाच्या टिप्स..

■ आजकाल कुटुंबांमध्ये एकत्र प्रार्थना होत नाही. ज्या कुटुंबात एकत्र प्रार्थना होते. ते कुटुंब एकत्र राहत असते. हा अनुभव आहे.

■ जीवनात देवाला विसरू नका. २४ तासातील २४ मिनिटे म्हणजे एक घटिका नामस्मरण करा.

■ जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर असलेले १00 गुन्हे माफ करून त्याला मदत करतो.

■ जे परमेश्वरराला आवडत नाही तेच आपण करीत असतो.

■ सुखाची साधने असली तरी त्या साधनांचे अस्तित्व पुरेसे नाही.

मनात भीती ठेवून भक्ती करू नका, मनातील भीती काढण्यासाठी भक्ती करा.. भक्ती करणे म्हणजे मनाचा दुबळेपणा नव्हे.. भक्ती करणार्यांभमध्येच ताकद असते. देवावर विश्वाहस असेल तर तुमचाही आत्मविश्वाणस वाढेल.. असा आत्मविश्वाीस आज अनिरुद्धबापू यांनी भाविकांच्या मनात जागविला..

प्रवचनासाठी एकलव्य क्रीडा संकुल भाविकांनी फुल्ल झाले होते. ते म्हणाले की, जीवनात चांगल्या गोष्टी करताना आजूबाजूचे लोक नावे ठेवतील. त्याची तमा बाळगू नका.. तुम्ही माझ्यावर प्रेम करीत असाल तर त्या प्रमाणात माझ्याकडे पाप द्या.. पण भगवंताला विसरू नका.. त्याच्या नावातच मोठी ताकद आहे. “एक विश्वास असावा पुरता ..”

परमेश्वराच्या नावात मोठी ताकद आहे. हे विज्ञानानेही स्वीकारले आहे. ध्वनी व कंपने ही जीवनाच्या प्रत्येक गोष्टीशी जोडली गेली आहेत. जीवनात बदल घडवून आणण्याचे साधन म्हणजे नाम होय. .. असेही त्यांनी प्रवचनातून सांगितले.

तसेच अनेक प्रसिद्द वर्तमानपत्रात ह्या अनिरुद्ध अनंदुत्सवाबद्द्ल तपशील माहिती अली आहे ..





All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected