Tuesday, August 23, 2011

चला ग मंगळागौरीचा ह्या करूया जागर ...


आपले सगळे सण वार परम पूज्य नंदाई खूप प्रेमाने संभाळते. उदा. गणपती,हळदी-कुंकू , दिवाळी -दसरा आणि मंगळागौरसुद्धा. मागच्या वर्षी श्रावण महिन्यातच नंदाईने तिच्या लाडक्या लेकीची आणि लाडक्या सुनेची मंगळागौर  अगदी थाटामाटात  साजरी केली. लोप पावत चाललेल्या सर्व खेळांना आईने पुन्हा उजाळा दिला. जवळ जवळ एक महिना आधीपासून आईसकट आम्ही सर्वजण ह्या खेळ आणि गाण्यांच्या तयारीला लागलो होतो. आईच्या busy schedule मधून स्वत: आईसुद्धा ह्या सर्वासाठी वेळ काढत होती.
आईने स्वत: नऊवारी साडी नेसली होती आणि शाकंभरी व निष्ठाला पण नेसवली होती.त्या दोघींना नखशिखांत पारंपारिक दागिन्यांनी सजवलेले होतें. कोल्हापुरी साज , बेल पांटीक ,पोहे हार, पुतळ्यांची माळ  ,नथ,  बुगडी,कंबरपटटा , पैंजण आणि अजून बरच काही ...........
आम्हाला सर्वांना असा वाटलं की आमचीही मंगळागौर आजच आहे.खरच ,
तुझिया छायेत आम्हा कमी काही नाही ......
सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल उधळीतो...

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected