Tuesday, October 4, 2011

Importance of Ashwin navrtri poojan And ashtami hom





Ashwin Navratra poojan
                                                        !!आश्विन नवरात्रीच्या अष्टमीचा होम !!
अष्टमीच्या शुभ दिवशी संध्याकाळी आपल्या घरी पुढील प्रमाणे यज्ञ करायचा आहे.



साहित्य: तांदूळ, ताम्हण, कापूर.


पूजाविधी: प्रथम तांदुळाचे स्वस्तिक काढून त्यावर ताम्हण ठेऊन त्यात २,३ मुठी तांदूळ पसरावेत.


नंतर त्यावर ८ कापराच्या वड्या ८ दिशांना मांडाव्यात (ठेवाव्यात) व एक कापूर मध्यभागी ठेवावा व प्रथम तो प्रज्वलित करावा व पुढील जप (२७, ५४, १०८) वेळा म्हणावा.

१. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते ||

२. ॐ श्री आल्हादीन्यै नंन्दायै संधी्न्यै नमो नम:  ||

३. ॐ कुलदेवता श्री ............  (आपल्या कुलदेवतेचे नाव) नम:  ||

प्रत्येक वेळी एकेक कापूर ताम्हणाच्या मधोमध अग्नीत टाकणे. जप संपेपर्यंत अग्नी शांत होऊ देऊ नये.जप संपल्यानंतर साष्टांग नमस्कार घालणे.

मग ताम्हण हळू उचलून बाजूला करणे व स्वस्तिक काढलेले तांदूळ गोळा करून त्या ताम्हनात ठेवणे.ते तांदूळ दसऱ्यापर्यंत देव्हाऱ्यात सफेद कपड्यात बांधून ठेवणे व दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करणे.


source warrior

No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected