'अंजनामाता' वहीचे महात्म्य समजून घेण्याआधी आपण 'स्वाहा' आणि 'स्वधा' म्हणजे काय ते सजून घेवूया. हि दोन्ही नामे त्या चंडिकेचीच.
'स्वाहा' कार म्हणजे परमेश्वराला अहंकार न बाळगता जे अर्पण करायचे किंबहुना अहंकार सुद्धा ज्या शब्दाने अर्पण करायचा तो शब्द. ती स्पंदन म्हणजे 'स्वाहा' साक्षात 'अनसूया' थोडक्यात 'स्वाहा' म्हणजे अहंकार, मत्सर न बाळगता भगवंताच्या चरणी पूर्ण समर्पित होणे.
तर 'स्वधा' म्हणजे आदिमाता जिचे हे अकरावे नाम आहे. ती कशी आहे? तर, स्वतःच स्वतःचा आधार आहे. स्वतःच स्वतःला धारण करणारी आहे. ती कोण आहे? ती 'स्वधा' आहे आणि 'स्वाहा' पण आहे.
मानवाला विजय मिळवायचा असेल तर आधी स्वावलंबी बनलं पाहिजे, स्वयंपूर्ण बनलं पाहिजे (अर्थात self sufficient & self dependent) आणि ते बनायचं असेल तर आधी 'स्वाहा'कार करायला पाहिजे. म्हणजे आधी स्वतःला भगवंताला अहंकार विरहीत होऊन पूर्णपणे समर्पित करायला पाहिजे, म्हणजे काय? तर , स्वतःला अर्पण करायला पाहिजे. सन्यास वगैरे घेण्याची आवश्यकता नाही. माझा भाव कसा पाहिजे? कि, हे भगवंता माझ संपूर्ण जीवन तुझ्या पायाशी वाहिलेल आहे. तुला माझे जे काही करायचं आहे ते तू कर. मी आनंदाने प्रत्येक गोष्टीचा (सुख आणि दु:ख ) स्वीकार करीन. तूच माझा सांभाळ कर. मला मोकळा वेळ मिळेल तेव्हा किंवा मुद्दाम वेळ काढून मी तुझ्या भजनामध्ये, पुजनामध्ये, सेवेमध्ये तो वापरीन. अशा रीतीने भगवंताला स्वतःचा 'स्वाहा'कार केला की, मगच मनुष्याला हि आदिमाता 'स्वधा' प्राप्त होते आणि मगच तो स्वावलंबी व स्वयंपूर्ण होतो.
'स्वधासा अंजना' जी स्वधा आहे तीच सदैव अंजना आहे. 'स्वधासा अंजना'
परमात्म्याला प्रकट करणाऱ्या दोन शक्ती :
१. अंजना शक्ती
२. व्यंजना शक्ती
जेव्हा भगवंत (सदगुरु ) भावारुपाने येतो, आपल्या नकळतच येऊन मदत करतो ती 'व्यंजना शक्ती' आणि जेव्हा सदगुरु प्रकट रूपाने येतो ती 'अंजना शक्ती'.
अंजना शक्तीचा पुत्र म्हणजे महाप्राण हनुमंत, जो थोरला पुत्र आहे अर्थात सदगुरु दत्तात्रेय.
अनसूया हि स्वाहा आहे व अंजनी हि स्वधा दोन्ही एकच.
हा 'स्वाहा'कार (पूर्णसमर्पण ) व 'स्वधा'कार (पूर्ण स्वावलंबन, स्वयंपूर्णता) कोण देऊ शकतो? तर, ज्यांनी हे दोन्ही गुण धारण केले आहेत तो व जो आदिमाता अंजनेचा (स्वधाचा) पुत्र आहे तो हनुमंत.
म्हणून आम्हाला 'स्वधा'कार प्राप्त करून घ्यायचा असेल तर आम्हाला पहिल्यांदा- "ॐ हरीमर्कटाय स्वाहा " हा मंत्र म्हणायला पाहिजे. हा श्रेष्ठ मंत्र अतिशय पूर्वापार प्रचलित आहे. पण 'स्वाहा'कार आणि 'स्वधा'काराच कार्य श्रद्धावानांसाठी श्री वरदा चंडिका प्रसन्नोत्सवापासून अर्थात आदिमाता श्री महिषासुरमर्दिनीच्या स्थापना दिवसापासून सुरु झाले आहे.
"ॐ हरीमर्कटाय स्वाहा " ह्या मंत्राचे महात्म्य वर्णन करताना ऋषी आपल्याला स्पष्टपणे सांगतात कि,
"ॐ हरिमर्कट मर्कट मंत्रमिदं ,परिलिख्यती लिख्यती वामतले ,
यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं ,यदि मुन्चति मुन्चति वामलता "
"ॐ हरीमर्कटाय स्वाहा " जो कोणी हा मंत्र हनुमंताच्या डाव्या पायाच्या खाली लिहील त्याच्या (लिहिणाऱ्याच्या) शत्रूंचा आणि वामलतेचा नाश होईल. वामलता म्हणजे काय? तर कळीचा प्रभाव आणि शनीची दशा. अर्थात साडेसाती, शनीची दशा आणि कळीचा प्रभाव ह्यांची एकत्रित झालेली गुंफण म्हणजे वामलता. माझ्या शत्रूंचा आणि वामलतेचा नाश करण्याचे सामर्थ्य जे आहे तो मंत्र म्हणजे "ॐ हरीमर्कटाय स्वाहा "
अंजनामाता वही मला कस सहाय्य करते?
- ज्या क्षणी आपल्याला वाटतंय कि आपल मत कमकुवत बनलंय, आपल्या भीती घेरतेय त्याच क्षणाला अंजना मातेच्या आणि तिच्या पुत्राच्या आश्रयाला गेल्याने आपण निर्भर बनतो. सदगुरू कृपेने मनः सामर्थ्य मिळते.
- आपल्या पतीमधील दुर्गुण कमी करायचे आहेत, तशी पत्नीची इच्छा असेल तर पत्नीने अंजनामाता वही लिहावी व पत्नीमधील दुर्गुण कमी व्हावे अशी पतीची इच्छा असेल तर पतीने अंजनामाता वही लिहावी. हनुमंत मधुफल वाटिकेतील फळे द्यायला सज्ज आहेच. त्याने दोघांत सुसंवाद सुरु होईल.
- प्रत्येक मानवामध्ये दहा चांगले गुण आहेत व दहा दोष आहेत. ते दहा दोष कमी करण्यासाठी अंजनामाता वहीचा आश्रय घ्यावा. मग "और देवता चित्त न धरही, हनुमत सेई सर्व सुख करही" ह्याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही, कारण वामलतेला नष्ट करण्याच कार्य हनुमंत करतो. वामलता मनुष्याला अकरा दिशांनी बांधते. अकरावी मनाची दिशा त्याचा स्वामी हनुमंत आहे त्या वामलतेला तोडण्यासाठी सदगुरू कृपेच बळ लागत ते बळ अंजनामाता वहीच्या माध्यमाने प्राप्त होते.
- जे अविवाहित आहेत किंवा ज्याची पत्नी किंवा जिचा पती हयात नाही त्यानाही हि वही अत्यंत लाभदायी आहे कारण अंजनामाता वही लिहिण्याने एकट्याने जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. त्यांना कोणावर अवलंबून राहायची आवश्यकता उरणार नाही. कारण अंजनामाता वही लिहिल्याने स्वधा शक्तीचा स्त्रोत सदगुरू कृपेने अखंड सुरु राहतो.