Thursday, May 5, 2011

७ मे ला परमपूज्य बापू करणार श्री वरदा चंडिका प्रसोनात्सावाच्या विविध स्थानांची स्थापना

FACEBOOK POSTING BY SAMIRSINH-VAIDYA-DATTOPADHYE


हरि ॐ   श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सव अगदी जवळ म्हणजे प्रत्येकाच्या श्वासाशी येऊन ठेपलाय. आणि हा श्वास आहे म्ह्णूनच माझा प्राण आहे. आणि आपला प्राण म्हणजे आपले लाडके बापू. म्हणूनच या श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सवाची सुरुवात स्वत: परमपूज्य अनिरुध्द बापू, परमपूज्य नंदाई व परमपूज्य सुचितदादा करणार आहेत.   दिनांक ५ मे २०११ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता श्रीगुरुक्षेत्रम् येथे परमपूज्य बापू श्री महीषासूरमर्दीनीच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहेत. त्यानंतर हे पवित्र तीर्थ श्री जान्हवीस्थानम् येथे वाहीले जाणार आहे.   दिनांक ७ मे २०११ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री हरिगुरुग्राम येथे बापूंचे आगमन होणार आहे. सकळी ११.०० वाजल्यापासून संध्याकाळी साधारणपणे ५.०० वाजेपर्यत श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सवाच्या विविध स्थानांची स्थापना बापू करणार आहेत.  त्याची साधारण रुपरेषा पुढील प्रमाणे :   १. मंडपपूजनम : श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सवासाठी या संपूर्ण पवित्र करून तो सिध्द केला जाणार आहे.   २. राजोपचारे पूजन : यामध्ये आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आदिमातेचे राजोपचारे म्हणजेच अगदी राजेशाही थाटात पूजन बापू स्वतः करणार आहेत.   ३. नृसिंह सरस्वती पादुका पूजन : त्यानंतर बापूंच्या घरच्या अतिशय पूरातन व अतिपवित्र नृसिंह सरस्वतीच्या पादुकांवर बापू अभिषेक करणार आहेत.   ४. श्री अखिल कामेश्वरी महालक्ष्मी मूर्ती स्थापना : मुख्य स्टेजवर बरोबर मध्यभागी श्री अखिल कामेश्वरी महालक्ष्मी मूर्तीची स्थापना बापू करणार आहेत.   ५. श्री आरोग्यभवानी महासरस्वती मूर्ती स्थापना : मुख्य स्टेजवर श्री अखिल कामेश्वरी महालक्ष्मी मूर्तीच्या बरोबर उजव्या बाजूला श्री आरोग्यभवानी महासरस्वती मूर्तीची स्थापना बापू करणार आहेत.   ६. श्री कालनियंत्री महाकाली मूर्ती स्थापना : मुख्य स्टेजवर श्री अखिल कामेश्वरी महालक्ष्मी मूर्तीच्या बरोबर डाव्या बाजूला श्री कालनियंत्री महाकाली मूर्तीची स्थापना बापू करणार आहेत.   ७. देवीसिंह स्थापना : ह्या आदिमातेचा सर्वात लाडका पुत्र असणारा परमात्याची श्री देवीसिंहच्या रुपात तिच्याच शेजारी स्थापना केली जाणार आहे.   ८. अवधूत कुंभ स्थापना : मुख्य स्टेजवर या आदिमातेच्या तीन स्वरुपांभोवती ९ अवधूत कुंभांची स्थापना होईल.   ९. श्री कतराज स्थानाची स्थापना : ज्या कतराज आश्रमात या आदिमातेने आपले पहिले पाऊल टाकले. त्या श्री कतराज स्थानाची स्थापना बापू करणार आहेत. याच पवित्र कतराज स्थानावर महापूजन व शत्रुविघ्नेश्वरी पूजन करणारे श्रध्दावान आपले अर्चनद्रव्य येथे अर्पण करतील.   १०. गंगा माता मूर्ती स्थापना : ज्या गंगामातेला बापू ऊदी स्वरूपात अखंड व अक्षय स्थान देणार आहेत त्या पवित्र गंगामातेची स्थापना बापू करणार आहेत.   ११. जान्हवी स्थानम स्थापना : ही गंगामातेची मूर्ती ज्या पवित्र स्थानावर ठेवून आपण तिच्यावर देशविदेशातून आणलेल्या शतनद्या व सप्तसमुद्र यांच्या पवित्र जलाने ह्या मूर्तीवर अभिषेक होणार त्या जान्हवी स्थानमची स्थापना बापू करणार आहेत.   १२. गंगा पताका स्थापना : त्याचबरोबर ह्या गंगामातेच्या गंगा पताकांची स्थापना होणार आहे.   १३. श्री महाकाली कुंड स्थापना : यामध्ये आपणा सर्व श्रध्दावान भक्तांना असूर दहन द्रव्य अर्पण करायचे आहे. याची स्थापना बापू करणार आहेत.   १४. श्री महालक्ष्मी दीप स्थापना : यामध्ये आपणा सर्व श्रध्दावान भक्तांना सूर स्नेहन द्रव्य अर्पण करायचे आहे. याची स्थापना बापू करणार आहेत.   १५. श्री महासरस्वती वापी स्थापना : यामध्ये आपणा सर्व श्रध्दावान भक्तांना मांगल्य द्रव्य अर्पण करायचे आहे. याची स्थापना बापू करणार आहेत.   १६. श्री दुर्गा वरद होम येथील महीषासूरमर्दीनी मूर्तीची स्थापना : या ठिकाणी बापूंनी लिहलेल्या मातृवात्सल्यविंदानम् चे संस्कृत पठण परपूज्य बापूंच्या आवाजात होणार अशा स्थानावर श्री महीषासूरमर्दीनी मूर्तीची स्थापना एका मोठ्या गडावर केली जाणार आहे.   १७. अकरा कंठकूप पाषाणांची स्थापना : या महीषासूरमर्दीनीच्या गडासमोर तिच्याच रुपाची ११ कंठकूप पाषाणांत स्थापना केली जाणार आहे.   १८. जलाशय स्थापना : हे ११ कंठकूप पाषाण ज्या पवित्र जलाशयाभोवती असणार त्या पवित्र जलाशय स्थापना बापू करणार आहेत.   १९. यज्ञकुंड स्थापना : याच जलाशयासमोर यज्ञकुंड असणार आहे ज्यामध्ये सर्व श्रध्दावान भक्तांना ऊद अर्पण करायचा आहे. याची स्थापना बापू करणार आहेत.   २०. श्री पितांबर पीठ क्षेत्र पूजन : सर्वात शेवटी श्री पितांबर पीठ क्षेत्र पूजन होऊन खर्‍या अर्थाने श्री श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सवाची सुरुवात होणार आहे.    काय मग येताय ना ७ तारखेला....................................................... आपल्या मोठ्या आईला आणि तिच्या लाडक्या पुत्राला भेटायला. हरि ॐ  


All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected