Friday, February 4, 2011


Shree Gurukshetram Mantra

हा मंत्र प. पू. बापूंनी गुरुवार दिनांक १ एप्रिल २०१० सर्व भक्तांना दिला. त्यावेळी "श्री हरिगुरुग्राम" येथे ह्या मंत्राबद्दल जे काही सांगितले ते थोडक्यात......काही चुकले असल्यास क्षमा असावी....हरि ओम

गुरुक्षेत्रम मंत्र हा त्रिविध मंत्र आहे. हा एकच आहे. ह्या तीन स्टेज नाहित.
उन्मीलन म्हणजे बीज - अंकुरणे- कळी-फुल-फळ आणि पुन्ह बीज.

आम्ही आम्च्या जीवनाच, देवाचं, बोन्साय करतो. ज्या क्षणी देवाच्या विश्वासाचं बोन्साय करतो. त्या क्षणी आमचं स्वतःच बोन्साय होतो. हा गुरुक्षेत्रम मंत्र स्वतः बापूनी सिद्ध केलाय कोणासाठी? गुरुपरंपरेच्या आद्न्येने माझ्यावर प्रेम करणार्या प्रत्येकासाठी.

बापूंचा गुरुमंत्र-गुरुक्षेत्रम मंत्र....
हा पुढच्या काळासाठी तारक मंत्र आहे. ह्या मंत्राचे चिंतन करत मनन करायच.ह्या मंत्राच्या पलीकडे कुठलाही मंत्र जाऊ शकत नाही. हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. हा मंत्र सर्वांच्या खुणा पटविणार आहे.

गुरुक्षेत्रमच्या, दत्तगुरुच्या, त्रिविक्रमच्या व तुमच्या खुणा ज्या तुम्हाला पटलेल्या नाहीत आणि हा मंत्र सिद्ध करणार्याच्या खुणा...

तुमची शुद्ध भुमिका तुम्हाला पट्वायची असेल. तुमची खुण तुम्हाला "त्याच्याकडून" पटवून घ्यायची असेल तर त्याच्या चावडीच्या मिरवणूकीत सामिल होऊन त्या चावडीच्या साईनाथाची भक्ती करा.

जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या मित्राला हाक माराविशी वाटेल. प्रोब्लेमध्ये नसताना सुद्धा तेव्हा हा मंत्र म्हणा.

मातृवात्सल्यविंदानम्चं त्रिविध स्वरुप :
मन प्राण प्रद्न्या
वर्तमान भूत भविष्य
स्वर्ग पाताळ नरक
बाल्य तारुण्य वृद्ध
ह्या मंत्रानेच आहेत.

ह्या मंत्राने कुठल्याही देवीची पूजा, हवन करु शकतो.

कुठल्याही देवतेचे पुजन करताना १६ वेळा हा मंत्र म्हणून पूजन केले तरी पूजन होते.

तुमच्या खुणा ज्या इतरांन चुकिच्या पटल्या आहेत त्या सुधारण्यासाठी हा मंत्र आहे.

रात्री झोपताना हा मंत्र म्हणायचा व म्हणायचे (अनिरुद्धा, होय हा मंत्र मी घेतला.)

(या मंत्रास चालही बापूंनी बसवलेली आहे आणि या मंत्राच्या घोषातच त्रिपुरारी त्रिविक्रमवर अभिषेक करुन त्याची "श्री गुरुक्षेत्रम" ला स्थापना करण्यात आली आहे.)

No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected