Friday, June 10, 2011

भक्ती-सेवा सप्ताह : दिवस दुसरा ...!

भक्ती-सेवा सप्ताहाचा आज दुसरा आनंद दिन..!  आजच्या दिवसाची सुरुवात प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या पूजनाने झाली. प्रथमच पादुका पूजन करणाऱ्या आजच्या मंडळींना त्यांच्या डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंना सोबत घेऊनच येत होता. आज सेवा उपक्रमांना सुरुवात झाली... ती भक्त-कार्यकर्त्यांच्या उदंड उत्साहात...! आज `मायेची ऊब` अंतर्गत एकूण 13 गोधड्या तयार झाल्या. `प.पूज्य नंदाईच्या लेकी` अगदी तल्लीन होऊन सेवा करताना पाहायला मिळाल्या.`चरख्याचे` चक्रसुद्धा वेगात होते.एकंदर ३६ चरख्यांची मांडणी केली गेली.दिवसअखेर 35 तयार लडी व 150 भरलेल्या बॉबिन्स बापूचरणी अर्पण करण्यात आल्या. `गणेशमूर्ती`सेवेस मिळालेला प्रतिसादही उल्लेखनीय होता. आकर्षक आणि अर्थपूर्ण सजावट असलेल्या या कक्षात एकंदर 75 गणेशमूर्तींच्या finishing चे 25 % काम पूर्ण करण्यात आले. तसेच कागदाच्या लगद्याचे 103 गोळे तयार झाले. आजची सर्वांत प्रशंसनीय सेवा म्हणजे `जुनं ते सोनं`अंतर्गत झालेली सेवा ! काही तासांच्या कालावधीत एकूण 411 कुटुंबांतील अंदाजे 1650 व्यक्तींच्या कपड्यांचे स्त्री-पुरुष-वृद्ध-लहान बालके यांच्या वयोगटानुसार वर्गीकरण करून त्यांचे व्यवस्थित packing करण्यात आले. या सेवेत आपापल्या कुवतीनुसार सर्व वयोगटातील सर्व जणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून बापू नक्कीच आनंदले असतील..!श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजाचे, मातृवात्सल्यविन्दानमचे, गुरुचरित्राच्या १४ व १८ व्या अध्यायांचे पठण हे सेवा `समर्पित` भावाने करण्याची शिकवण देणारे होते. सेवा करताना नकळत जागृत झालेला अहंभाव `त्याच्या` नामसंकीर्तनात विरघळून जातो याची पुनःप्रचीती आली.     नंतर पुन्हा `हरिपाठा`ने दिवसाची पूर्तता झाली...अतिशय तृप्त भावनेने...!

No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected