Friday, June 10, 2011

भक्ती-सेवा सप्ताह : दिवस पाचवा...!

 आजचा दिवस खूपच वेगळा...! `जुनं ते सोनं` अंतर्गत  काल झालेले mega scale sorting च्या वाटपाचा आजचा दिवस. पुणे जिल्ह्यातील खेड व मुळशी तालुक्यातील वाटपासाठी आज 5 टीम
्स सकाळी  ८ वा.निघाल्या.बापूकृपेने मला या सेवेत जायला मिळालं. तिथे पोहोचताना व  पोहोचल्य...ानंतर ज्या कार्यकर्त्यांनी हा सर्व्हे केला त्यांना मनापासून सलाम केला. इतक्या दुर्गम भागात खडतर  मार्गाचा हा सर्व्हे त्यांनी कसा केला? एकच उत्तर-त्यांच्या पाठीशी असलेल्या बापू या शक्तीमुळेच.! ज्यांना वाटप केलं गेलं त्यांच्याकडे पाहिलं तर बापूंनी आपल्याला किती सुखात ठेवलंय याची तीव्रतेने जाणीव होते. वाटपात मिळालेल्या वस्तूंमुळे लाभार्थींच्या चेहऱ्यावरील आनंद  पाहणं हा एक अनुभवच... प्रतिकूलता तिथेच जाणीव हेच खरं..! आपण खूप अनुकूलता असूनही सारखे कुढत असतो. तसाच अनुभव प्रथमच बापूंच्या चिन्मय पादुकांचं पूजन करणाऱ्या श्रद्धावानांना  झालेल्या  अतीव आनंदाचे चेहरे पाहताना येतो. आपल्याला सहजप्राप्त गोष्टींची किंमत लवकर कळतच नाही. बापूंचं पादुकापूजन करायला मिळणं ही बापूंची आपल्यावर कृपा आहे,आपण काही श्रेष्ठ भक्तीची गाठोडी घेऊन आलेलो नाहीत याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडायला लागतो. मग आपण पादुकापुजनासाठी वाढदिवसासारखे मुहूर्त   पाहू  लागतो. तो मात्र आपल्याला सदैव साथ देत असतो,मदत पुरवत असतो..मुहूर्त न पाहता...! बापू आपल्याला दिसतात,त्यांना पाहता येतं,त्यांच्याबरोबर नाचता-हसता येतं याचं महत्त्व  आपल्याला कितपत स्मरणात राहातं कोण जाणे. आपल्याला सर्व सहज वाटू लागतं आणि मग येतो casual approach.. बापू काय दर गुरुवारी दिसतात, गुरुक्षेत्रमला असतात..अरे ,बापू लाख सांगोत,  `मी तुमचा मित्र आहे` तो त्यांचा मोठेपणा झाला, पण तो सर्व देवांचाही देव आहे याची जाणीव आपण दर श्वासाला आपण ठेवायला हवीय आणि सतत कृतज्ञ राहायला हवं.! या कृतज्ञतेसाठी तरी या देवाचं पादुकापूजन अगदी MUST .. खरंच या सेवा सप्ताहाने अनेक स्तरांवर  मला चिंतनशील  केलंय..      आज `मायेची ऊब`अंतर्गत नंदाईच्या लेकींनी 21 गोधड्या तयार केल्या. आता कालपासून सिंहसुद्धा या सेवेत पुढे सरसावले आहेत बरं..! `गणेशमूर्ती`सेवेत  लगद्याचे 75 गोळे,10 मूर्ती फिनिशिंग तसेच 25 मूर्तीवर रंगकाम केले गेले. `चरखा` नेहमीप्रमाणेच जोरात...171 लडी बापूचरणी  अर्पण..  आजचे `जुनं ते सोनं` अंतर्गतच्या वाटपाचे लाभार्थी- तब्बल 3300 !      Bapu Thy Grace !!! छान सेवेमुळे `सत्संग` tonic चा डोस चांगलाच रंगला...! फुल्ल धमाल ....

No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected