आजचा दिवस भक्तिपेक्षा कांकणभर जास्त सेवेचाच..! पहाटे ठीक
6 वाजता पुण्याहून 35 - 40 कि.मी.अंतरावरील कासारसाई गावात आपले
केंद्राकार्यकर्ते रवाना झाले. कार्यक्रमस्थळी ती मंडळी आली ती
दोन ट्रक भर कपडे घेऊनच..! `जुनं ते सोनं` अंतर्गत या कपड्यांचे MEGA SCAL E... वर sorting झाले.(किती म्हणून विचा रताय? कृपया फोटो पहा.) `मायेची उब ` कक्षात आज 11 गोधड्या तयार झाल् या. आज या सेवेत सिंहांनीसुद्धा सहभाग घेत ला..(`आम्हालाही येतं`
हे दाखवायला नाही बरं का ! ) `गणेशमूर्ती`सेवेत आज 75 गोळे तयार होऊन
55 मूर्तींचे फिनिशिंग केले गेले. `चरखा`सुद्धा आज वेगात..!
एकंदर 190 लडी व 100 बॉबिन्स बापूचरणी अर्पण ...! `सत्संग` म्हणजे
दिवसभराचा थकवा विरघळवून टाकणारं tonic ! आजही कोण प्रमुख,कोण
कार्यकर्ता,कोण भक्त काही कळत नव्हतं....माझ्या बापूसमोर सगळे समान पातळीवर ! `बापू भक्त` ही एकच आणि खरी ओळख..!
No comments:
Post a Comment