Thursday, June 16, 2011

AIGV - भाग एक ( वनशेती )


BSwapnil Dattopadhye on Thursday, June 16, 2011 at 2:43pm
हरि ओम
६ मे रोजी बापूंचे रामराज्य २०२५ या विषयावर प्रवचन झाले आणि अनिरुध्दाज् इन्सिट्युट ऑफ ग्रामीण विकासाचे काम वेगाने सुरु झाले. थोड्याच दिवसात या कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतः परमपूज्य बापू, नंदाई आणि सुचितदादा गोविद्यापीठम् ला आले. त्या सर्वांचे फोटो आपण फेसबुकवर बघितले. आणि मग सगळ्यांकडून आम्हाला या ग्रामविकासाच्या कामात कसे सहभागी होता येईल याची जोरदार विचारणा सुरु झाली.
ग्रामविकासाच्या या कार्यामध्ये असणार्‍या जलसंधारण, वनीकरण, पशुपालन तसेच सेंद्रिय शेती या विविध घटकांची कामे आता गोविद्यापीठ्म येथे सुरु होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपण बाभूळ (Acacia Arabica), घाणेरी किंवा टणटणी (Lantana) यांची रोपे तयार करणार आहोत. ज्या ज्या श्रध्दावानांना अशी रोपे तयार करण्याची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर अशी रोपे तयार करून गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे अथवा कोणत्याही दिवशी गोविद्यापीठम् येथे जमा करावीत. रोपांच्या संख्येचे बंधन नसल्याने कितीही रोपे तयार करून आपण वरील ठिकाणी जमा करु शकता.

आता बघूया ही रोपे कशी तयार करायची
घाणेरी किंवा टणटणी (Lantana)

घाणेरीची रोपे तयार करण्यासाठी घाणेरीच्या झाडाची साधारण पेन्सिल एवढ्या जाडीची काडी निवडा. ही काडी तिरकी कापून घ्या म्हणजे मातीमध्ये ती पटकन रुजते. साधारण एक फुट ऊंचीची काडी कापून घ्या. या काडीवर शक्यतो २/३ डोळे आहेत याची खात्री करा. डोळे म्हणजे ज्या ठिकाणी नविन पाने फुटतात अशी जागा. नंतर या काडीवर फक्त दोनच पाने ठेवून बाकीची पाने काढून टाका.
आता कुंडी किंवा पिशवी घेऊन त्याला खाली २/३ भोके पाडा. त्यानंतर त्यामध्ये चांगली नर्सरी माती व शेणखत अथवा गांडूळखत समप्रमाणात घेऊन कुंडी किंवा पिशवी भरुन घ्या. त्यामध्ये ही घाणेरीची काडी लावा व लगेच हलके पाणी द्या. अशी तयार झालेली कुंडी किंवा पिशवी आडोश्याला परंतू भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशारितीने ठेवा. दररोज या कुंडीला किंवा पिशवीला पाणी घाला. साधारण ४/५ पाने फुटल्यावर ही रोपे गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे अथवा कोणत्याही दिवशी गोविद्यापीठम् येथे जमा करावीत
बाभूळ (Acacia Arabica)

बाभळीची रोपे तयार करण्यासाठी बाभळीच्या बिया गरम पाण्यात भिजत टाका त्या सुमारे २४ ते ३० तास भिजू द्या म्हणजे त्या लवकर रुजतील.   
आता कुंडी किंवा पिशवी घेऊन त्याला खाली २/३ भोके पाडा. त्यानंतर त्यामध्ये चांगली नर्सरी माती व शेणखत अथवा गांडूळखत समप्रमाणात घेऊन कुंडी किंवा पिशवी भरुन घ्या. त्यामध्ये एका कुंडीत किंवा पिशवीत २ या प्रमाणे ह्या भिजलेल्या बिया लावा. शक्यतो बिया लावण्याच्या जागी जास्तीत जास्त शेणखत किंवा गांडूळखत असू द्या म्हणजे बिया पटकन रुजतील त्यानंतर लगेच हलके पाणी द्या. अशी तयार झालेली कुंडी किंवा पिशवी आडोश्याला परंतू भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशारितीने ठेवा. दररोज या कुंडीला किंवा पिशवीला पाणी घाला. रोपे साधारण अर्धा/एक फूटाचे झाल्यावर ही रोपे गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे अथवा कोणत्याही दिवशी गोविद्यापीठम् येथे जमा करावीत

महामंत्र पठण




परमात्म्याच्या राजीव लोचानांकडे बघत बघत जो कोणी खालील महामंत्र १०८ वेळा १०८ दिवस म्हणेल त्याला उचित काम करण्यासाठी लागणारं सामर्थ्य प्राप्त होतेच.
श्रद्धावानांनो सद्गुरूचे हे वाचन आपल्या जीवनात प्रत्यक्ष आणून उचित कार्यासाठी सद्गुरूचे सामर्थ्य मिळवूया.
- महामंत्र -
राजीवलोचनः रामो कृपादृष्टी प्रक्षेपणेन हि l
ददाति सामर्थ्यमतुलं तदात्वे सर्वयोधिभ्यः l
ॐ परमेष्ठिने वत्सिने नमः ll
अर्थ- श्रीराम सर्व वानर सेनेचे अवलोकन करतात  व आपल्या राजीव नयनांनी (म्हणजे कामळासारख्या)  केवळ कृपादृष्टीक्षेपाद्वारे सर्व योध्यांना अतुलनीय सामर्थ्य प्रदान करतात.
                 महासंकटमोचन   महापापनिवारक  दिव्यप्रकाश आराधनाज्योती मधील आपल्या जीवनात सामार्थ्यारूपी प्रकाश आणणारी ही ५२वी आराधनाज्योती.
                 जे सामर्थ्य उचित कार्यासाठी वापरायचे आहे ते सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी हा महामंत्र मानला जातो म्हणून ते सामर्थ्य मिळविण्याचा सोपा मार्ग सदगुरू श्री अनिरुद्ध ह्या महामंत्राद्वारे श्रद्धावानांना दिग्दर्शीत करीत आहेत. तो मार्ग म्हणजे परमात्म्याच्या राजीव लोचानांकडे (डोळ्यांकडे ) अत्यंत प्रेमाने बघत बघत जो कोणी ह्या मंत्राचे दररोज १०८ वेळा असे १०८ दिवस पठाण करील त्याला उचित कार्यासाठी जे जे सामर्थ्य वापरायचे आहे ते ते सर्व सामर्थ्य त्याला ह्या महामंत्राच्या पठणाने प्राप्त होतेच. परंतु ज्या रुपाकडे बघून मी हा महामंत्र ते रूप परमात्म्याचच असलं पाहिजे. राजीव लोचन म्हणजे काय? तर ज्याच्या पापण्या डोळे उघडे केल्यानंतरही एकतृतीयांश बाहेरच राहतात ते राजीव लोचन होय. त्यामुळे डोळ्यांना कमळाच्या पाकळीचा आकार प्राप्त होतो . चित्रामध्ये तो राजीव लोचानच असावा लागतो. राजीव लोचन हे त्याच्या कृपादृष्टीचं साधन आहे. अशा भक्तवत्सल परमात्म्याला मी नमस्कार करतो. म्हणून ह्या महामंत्राच्या पुढे ॐ परमेष्ठिने वत्सिने नमः l 
असे जोडले आहे.
                  ह्या महामंत्राचं महात्म्यं आम्हाला ध्यानात ठेवलं पाहिजे. आम्ही उभे राहून म्हणू ,बसून म्हणू,हातात फोटो घेऊन म्हणू ह्या पेक्षा आम्ही तो रोज म्हणू हे महत्वाचे.
                  मला जरी हा मंत्र रोज १०८ वेळा असा १०८ दिवस म्हणता आला नाही तरी चालेल. मात्र दररोज वेळ मिळेल तेव्हा दिवसातून ५ वेळा, किंवा ९ वेळा , किंवा ११ वेळा, किंवा १५ वेळा त्याच्या डोळ्यांकडे प्रेमाने बघत बघत म्हटला तरी मला उचित कार्यासाठी जे जे सामर्थ्य हवा ते ते सार तो देणारच. मात्र वाईट हेतूने अनुचित कार्यासाठी सामर्थ्य मिळविण्याच्या हेतूने जर हा मंत्र म्हटला तर त्या पासून कोणतेही सामर्थ्य मिळणार नाही. कारण ' तो ' कसा ? तर " जाणितो वर्म सकळांचे "
            म्हणून आपण सर्वजण सद्गुरू श्री अनिरुद्धांना प्रार्थना करूया की, हे सद्गुरुराया अनिरुद्धा तू आम्हा सर्वांचे जाणतोच आहे. तुझ्या राजीव लोचनांचा कृपाप्रसाद आम्हाला नित्य मनः सामर्थ्याची रसद पुरवितच आहे. आज आम्ही तुझी सर्व लेकरे , तुझ्या चरणी प्रार्थना करतो की, हे सद्गुरुराया अनिरुद्धा,तुझ्या राजीव लोचनांकडे प्रेमाने बघत बघत हि रससाधना आमच्याकडून करून घेण्याची तू बुद्धी दे.
           सद्गुरूचे आपल्याशी अनेक जन्मांचे नाते आहे म्हणून त्याच्या फोटोकडे प्रेमाने बघत बसा, त्याचे रूप न्याहाळा, त्याचा रूप अतिशय प्रेमाने सतत बघावसं वाटलं पाहिजे. त्याचं रूप आपल्याला पिता आलं पाहिजे. त्याला बघून मला आनंद वाटलं पाहिजे. श्रीसाईसच्चरितातील १९व्या अध्यायात श्रीसाईबाबा राधाबाईंना सांगतात की आई तू माझ्याकडे अनन्यपणे पाहा मी हि तुझ्याकडे अनन्यपणे पाहीन. रूप महात्म्य जेवढा अधिक तेवढं नाम महात्म्य ही अधिक, जेवढा नाम महात्म्य अधिक तेवढं गुणसंकीर्तन अधिक चांगले. त्यामुळे त्याचे त्रिगुण कळतात.
              सद्गुरूंच्या वारंवार दर्शनाने माझ्या मनातील मानवत्व वाढीस लागते नामस्मरणाने माझ्या मनातील जनावरे मारली जातात तर गुणसंकीर्तनाने माझ्या प्रगतीचा मार्ग खुला होतो.
               गुणसंकीर्तन म्हणजे सद्गुरूच्या प्रेमाबद्दल बोलणे. म्हणून तितक्याच प्रेमानी सद्गुरू बापूंनी श्रद्धावानांना सांगितले की, आज जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्वांना सांगा , प्रेमाने सांगा. ते सांगताना तुम्ही तुमच्या मनातील सुंदर सूर ऐकाल. तुमचा सद्गुरू नित्य जवळ आहे ह्याचा अनुभव घ्याल. कसा तर All over, Everywhere, Wherever you are . कारण माझा सद्गुरू असाच आहे. तुम्ही मला सद्गुरू मानता तर मला तुमच्या बरोबर असलंच पाहिजे कारण ती माझ्या आई चण्डिकेची  इच्छा आणि माझे आजोबा दत्तगुरूंचा हुकुम आहे. मी तुमच्यासाठी तुमच्याबरोबर नेहमीच आहे. सद्गुरू नाह्मी त्याच्या भक्तांसाठी विश्वासपात्र असतो. सद्गुरू माझा आहे ही भावना घेऊनच आपण पुढच्या जीवनात प्रवेश करणार आहोत.

हे सद्गुरूराया अनिरुद्धा तुझ्याप्रेमाच्या ह्या अमृतकुंभाचा माझ्या हृदयात नित्य अभिषेक होत राहो हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
                                                                    ll हरि ॐ ll 


श्री गुरुक्षेत्रम येथे दिलेली माहीती


All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected