आपण कायम विस्मृतीच्या राज्यात जगतो. परमेश्वराच्या विस्मृतीत राहतो. माया जशी तुम्हाला मोहातखेळवते तशी ती आपल्याला परमेश्वराच्या मोहातही पाडते. आपल्या आयुष्यात सदैव स्मृती जागृत करतरहाते. म्हणून ललिता पंचमीला आपण या जानकी मातेची प्रार्थना करतो.
हे माते तू सर्व जगताची तरिणीमाता आहेस. तू इच्छापूर्तिवर्धिनी आहेस. तू थोड़ी तरी स्मृती मला दे.
मी तुझ्याकडून मिळालेली स्मृती माझ्या जीवनात चांगल्या कार्यासाठी वापरीन. म्हणजेच जानकीमातासीता ही मुळभावाने परमेश्वराची स्मृती आहे. म्हणून ललिता पंचमीला या परमेश्वरी स्मृतीची आपण उपासना
रामकार्य अधिष्ठात्री सीता फलदायी फलदायिनी नित्य शुद्धा, शुद्ध इच्छा, इच्छा कृतीवर्धिनी
ह्या मंत्राने करतो.
ह्या मंत्राच्या साहाय्याने सर्व ऐश्वर्य प्राप्त होण्यास मदत होऊन, ते टिकून राहाण्यासाठी ह्या मंत्राचा फायदाहोतो.
No comments:
Post a Comment