ब्रह्मत्रिपुरसुंदरी ती माझी आई,
ब्रह्मत्रिपुरगामिनी ती माझी आई ,
ब्रह्मांडव्यापक आई ,
माझी नंदाई,! हो माझी नंदाई...... {१}
सिंह आणि वीरांना बळ पुरवणारी आई,
दुष्ट जणांचा नाश करणारी आई,
मातृवात्सल्या आई,
माझी नंदाई,! हो माझी नंदाई......{२}
तुझ्या ग दर्शनाला मन मोहून जाई,
सामर्थ्य देणारी शिवाची जिजाई ,
आत्मबल घडवणारी ती माझी आई,
वैभवलक्ष्मी आई,
माझी नंदाई, हो माझी नंदाई......{३}
लिहिता लिहिता आई ग संपली शाई,
तरीही मनाने मी तुझे गुण गान गाई,
"कुशीत" घेना मज ए माझी आई,
जीवदानी आई,
माझी नंदाई, हो माझी नंदाई.......
{आई हि कविता लिहिताना खूप रडू येत होते ग.. पण तुझ्या वात्सल्याच्या उबे मुले मी स्वताला सावरू शकलो}. मी काही कवी नाही माझ्या मनात जे जे आलं ते मी लिहून तुझ्या चरणी अर्पण करतोय काही चुकल्यास माफ कर ग आई.........
FOR AUDIO OF THIS SONG CLICK THE "ME" BUTTON BELOW
"ME"
FOR AUDIO OF THIS SONG CLICK THE "ME" BUTTON BELOW
"ME"