श्रीमांदार-गणेश हे अत्यंत सिध्द व स्वयंभू असे गणेशाचे स्वरूप आहे. ह्यास मांदार-गणेश अथवा श्रीमूलार्क-गणेश अथवा श्रीश्वेतार्क-गणेश असेही म्हटले जाते. अशा श्रीमांदार-गणेशाच्या स्वागतासाठी / स्थापनेसाठी आवश्यक असलेले वेदोक्त विधी सांप्रत श्रीअनिरुध्द-गुरुक्षेत्रम्मध्ये चालू आहेत.
श्वेत रुई म्हणजे श्वेत मांदार झाड हे सिध्द जागीच बघायला मिळते व ह्याचा उपयोग अतिशय पवित्र पूजनात केला जातो. शिवाला ह्या श्वेत मांदाराची फुले अतिशय प्रिय आहेत. मांदार झाडाला नील मांदार अथवा श्वेत मांदार हे त्याच्या फुलावरून संबोधिले जाते.
अशा झाडाचे परीक्षण करून व विशिष्ट विधी संपन्न करून पौर्णिमा किंवा मंगळवार किंवा गुरुवार ह्या दिवशी येणार्या संकष्ट चतुर्थीच्या रात्रौ चंद्रप्रकाशात चंद्रोदयानंतर तीन घटिकांच्या आत ही मूर्ति बाहेर काढाली जाते.
श्रीमांदार-गणेश मूर्ति काढण्यापूर्वी २१ दिवस अगोदर आमंत्रण व दिग्बंधन विधान केले जाते व त्यानंतर रजत (चांदीच्या) अस्त्रांनी श्रीमांदार गणेशाला बाहेर काढण्यात येते. हा विधी योग्य जाणकार व्यक्तिने अधिकारी व्यक्तिंच्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक असते, अन्यथा त्याचे अनिष्ट अथवा विपरीत परिणाम होतात असा समज आहे.

अशा श्वेत मांदारझाडाच्या मुळाशी श्रीमांदार-गणेशाची प्राप्ति होते. साधारणत: २१ ते २५ वर्षे वयाच्या झाडाच्या मुळाशी परिपूर्ण स्वरूपातील गणेशाचे स्वरूप दिसू लागते. ज्या झाडाच्या मुळाशी असा श्रीमांदार-गणेश आहे, असा वृक्षा नित्य तजेलदार व पुष्पयुक्त असतो आणि म्हणूनच त्याचे स्वरूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे असते.
अशा श्रीमूलार्क-गणेशाचे, श्रीमांदार-गणेशाचे, श्रीश्वेतार्क-गणेशाचे श्रीअनिरूध्द-गुरुक्षेत्रम्मध्ये आगमन होण्याची आपण सर्वजण वाट बघूया. ४ सप्टेंबर रोजी असणार्या अंगारकी चतुर्थीपासून सर्व श्रध्दावानांना श्रीमांदार-गणेशाच्या नित्य-दर्शनाचा लाभ घेता येईल.
Source:- Samirdada's Blog (samirsinh-dattopadhye.blogspot.com)