"मोरया रे बापू मोरया रे, मोरया रे बापू मोरया रे,
जन्मोजन्मी हेच मागणे घडो तुझी सेवा ,आले विघ्न दूर करावे अनिरुद्ध देवा"..........
म्हणता म्हणता १,२,३, भाग संपला, आगमन म्हणता म्हणता अखेर त्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आलाच. अर्थात पुनार्मिलाप सोहळा... संध्याकाळी ४.३० च्या सुमारास बाप्पाच्या पुनार्मिलाप सोहळ्याच्या मिरवणुकीला सुरवात झाली.
पण ह्या वेळी पावसाने खूपच जोर लावला पण प्रत्येक श्रद्धावान त्याकडे दुर्लक्ष
करत आपला बापू, आई, मामा, आणि गणपती बाप्पा कधी येतोय ह्याकडे लक्ष केंद्रित करत होते, आणि तेवढ्यात गणपती बाप्पाला लिफ्ट मधून आणले गेले .... आणि तेवढ्यात बापू सुद्धा आले ... मग काय पावसाला सर्व जण विसरूनच गेले जणू आणि बापू नामाचा गजर सुरु झाला.. आणि आपली बाळ एवढ्या पावसात भिजत असताना तो बापुराया सुद्धा पावसात भिजत -भिजत प्रत्येकाला दर्शन देत होता.... "त्याच्या डोळ्यातून येणाऱ्या गंगाजलामुळे प्रत्येक जण त्यात नाहत होता"... त्यावेळी काढलेले हे काही क्षण ...