हरी ॐ श्री रणचंडिका प्रपत्ती माहिती
कुठल्याही श्रावणी सोमवारी हि प्रपत्ती केली जाऊ शकते .
श्रावणात शिव शंकराला मान असतो आणि दुसरा म्हणजे" नरसिंहाला ".
*हि प्रपत्ती कशी करावी ते आत्ता सविस्तर पाहूया.
प्रथम सुर्यास्तानंतरच स्नान करून त्रिविक्रमाच्या प्रतिमेसमोर बसावा.
१ } प्रथम श्री गुरुक्षेत्रम मंत्र ९ {9} वेळा म्हणावा.
२} नंतर "ॐ नमशचान्दिकाये " हा मंत्र १०८ वेळा म्हणावा.
३} त्यानंतर त्रिविक्रमाची प्रतिमा आपल्या डोक्यावर ठेवून परत नऊ वेळा
श्री गुरुक्षेत्रम मंत्र म्हणावा.
४} त्यानंतर एका वाटीत दहीसाखर , व दुसर्या वाटीत केळं. असा नैवेद्य त्रिविक्रमास अर्पण करावा.
५} नंतर त्या दहीसाख्रेतील एक पळी दहीसाखर प्रपत्ती करणाऱ्या पुर्षाने आधी प्राशन करावे.
६} केळ्याचा प्रसाद घरातील इतर सर्व स्त्री व पुरुषास वाटावा. तो स्वतः ग्रहण करू नये.
७} नंतर परत त्रीविक्रमासमोर बसून त्याच्याकडे बघत बघत उरलेले दहीसाखर स्वतः पिऊन टाकावे.
८} नंतर त्रिविक्रमास सुगंधित फुले, अर्पण करून लोटांगण घालावे.
९} सगळ्यात शेवटी फुलं आहेत.
१०} आणि प्राथना करावी कि "माय चंडिके तू मला स्वत जवळ घे आणि मला परमात्म्याच्या हाती सोपव"
काही महत्वाच्या सूचना.
१ . श्री रणचंडिका प्रपत्ती बाहेर न करता स्वतः घरात एकट्यानेच करावी .
२ . हि प्रपत्ती फक्त पुर्षांसाठीच आहे.
३. प्राथना करायला विसरू नये.
४. काही मागे पुढे राहिल्यास मनात खंत न ठेवता त्रिविक्रमाची व बाप्पाची क्षमा मागावी.
५. रणचंडिका प्रपत्ती १६ वर्ष्याच्या जास्त वय असणारा कोणीही करू शकतो.
६. वरील सर्व माहिती साठी रामराज्य पुस्तकात पान क्रमांक. ४७, व ४८ पाहावे.
No comments:
Post a Comment