Wednesday, June 29, 2011

श्रमि श्रमला श्रीरंग....!


FACEBOOK POST BY SANJAYSINH GAMBHIR
 भक्ती-सेवा सप्ताहाच्या `वो सात दिन` भावनेतून कोणीही पुण्यातील श्रद्धावान बाहेर आलेले नव्हते किंबहुना कोणालाच बाहेर पडायचेच नव्हते. अशा स्थितीत `गोविद्यापीठम` सेवा जाहीर झाली.कितीजण सेवेला येतील कोणीही अंदाज बांधू शकत नव्हतं..आपण सामान्यच,कारण `त्याचा` अंदाज कोणाला असणार ? `त्याचा` अंदाजच निराला हेच खरं ...कारण इतिहास घडवला `त्यानं`..! तब्बल आठ  बसेस,खाजगी वाहने आणि रेल्वे असं मिळून जवळपास 500 भक्त-कार्यकर्ते सेवेस उपस्थित...!
नुकताच झालेला भक्ती-सेवा सप्ताह आता mega सेवांचीच सवय करून गेलाय की काय ?
गोविद्यापिठमच्या प्रांगणात प्रवेश केला आणि जाणवू लागलं ते बापू. नंदाई अन सुचितदादाचं अस्तित्व...अगदी ठळकपणे !   स्वप्नीलसिंहांनी सर्वांचं मनापासून स्वागत केलं आणि थोड्याच वेळात सेवाकार्य सुरु झालं..
अनावश्यक तण काढण्यापासून बंधारा बांधण्यापर्यंत विविध प्रकारच्या सेवांचा समावेश या सेवाकार्यात करण्यात आला होता.  
वय वर्षे 5 ते 85 या वयोगटातील सर्व श्रद्धावानांनी उत्साहात आपापल्या शारीरिक कुवतीनुसार या  सेवेत सहभाग घेतला.
गोविद्यापिठमच्या प्रत्येक झाडातून,प्रत्येक पानातून आपला बापू आनंदी चेहऱ्याने सर्वांकडे पाहत होता...नेहमीसारखाच..! तो आपल्याकडे पाहतच असतो. आपण त्याला पाहतो का हे महत्वाचे...प्रत्येक सेवेत असा अनुभव येतो की कामाची सवय  नसलेल्या आम्हाला  इतकं काम करून थकवा कसा येत नाही ? याचं उत्तर एकच...बापू करितो आमुची सेवा तो आपला सर्व थकवा स्वतःकडे घेतो,तो दमतो म्हणून आम्ही विना थकवा राहतो..!हा भाव नाहीये मित्रांनो, सत्य आहे...!!  म्हणून आपण `मी सेवा केली `असे न म्हणता `हे बापुराया, मी तुझा शतशः ऋणी आहे, तू मला ही संधी  दिलीस` असं म्हणायला हवंय.  
बापूकार्यात एक फायदा असतो,मित्रांनो,आपल्या मनातील जाळी-जळमटे, शंका-कुशंका, तर्क-कुतर्क, रुसवे-फुगवे, पोकळ अहंकार या सर्वांना मूठमाती  दिली   जाते. तशी व्यवस्था बापू यंत्रणेत आहे.पण कधी ? आपण काही करतोय हा विचार येऊ दिला नाही तर.. बापू विश्वनियंता आहे,सर्वव्यापी,सर्वज्ञ आहे. तरीही आपल्या छोट्याशा चांगल्या कृतीचं त्याला खूप कौतुक आहे.  
खरं तर त्यानं कौतुक करावं असं खरंच आपण काही करू शकत नाही. भल्या-भल्या ऋषी-मुनींना हजारो वर्षे तपश्चर्या करूनही जो दुष्प्राप्य तो आम्हांस जर खरोखर काहीही न करता लाभला आहे तर आम्ही त्याला हवं तसंच वागायला हवं...!  
विश्वव्यापक तूंचि  होसी I ब्रह्मा विष्णू व्योमकेशी I
धरिला वेष तू मानुषी I  भक्तजन तारावया II 
याचं स्मरण आपण कायम ठेवायला हवं. 
आपल्या जीवनातील तण (कुविचार) आणि  ताण काढण्यापासून  ते जीवनाला मर्यादेचा बंधारा बांधण्याचं काम बापू   अखंडपणे करत आहेत. आपण चुकतच राहतो,चुका करतच राहतो, बापू मात्र आपल्यासाठी राबतच राहतो,श्रमतच राहतो ..आपल्या चुकांना क्षमा करून ! 
आपलंआता कर्तव्य आहे की  बापूंना आपल्यामुळे सदैव आनंदी ठेवणं...आपल्या रागाचा अनुराग झाला की आपल्या अरंग जीवनात पांडुरंग प्रकटविण्यासाठी    तो
अनिरुद्ध श्रीरंग समर्थ आहे....!!!   

Monday, June 27, 2011

सेवाभक्तीचा सप्ताह झाला...प्रमोदसिंह बंकापुरे


॥  हरि ॐ ॥
 पुणे केंद्रामध्ये सेवाभक्ती सप्ताह संपन्न झाला. अतिशय सुन्दर भक्तीमय वातावरण झाले होते. श्रध्दावानांनी अतिशय तन्मयतेने उत्साहाने सहभाग घेतला.प.पू.समीरदादांनी सेवासप्ताहात केंद्रात भेट देऊन उपक्रमाचे खूप कौतूक केले कार्यक्रमाचे नियोज़न खुपच सुंदर होते.सर्वांनी सेवाभक्तीचा आनंद पुरेपूर लूट्ला. पुणे केंद्रातील प्रमोदसिंह बंकापुरे यांनी सेवासप्ताहावर एक गाणे तयार केले, सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी सत्संग समितीने सत्संगात ते ज़ोरदारपणे सादर केले.
 
=चाल: गुरु भक्तीचा घेऊन प्याला =
 
सेवाभक्तीचा ...........
सेवाभक्तीचा सप्ताह झाला
माझ्या बापूंनी आनंद दिला ॥ध्रु॥
चक्र चरख्याची गरगरा फिरली
आणि लडींची बरसात झाली
सिंहवीरांनी.........
सिंहवीरांनी गोधडी शिवली
नंदामाईची क्रुपा मिळाली...(१)
विघ्नहर्त्याची सेवा हो घडली
गणरायाची मुर्ती ही रंगली
ज़ुने ते सोने...........
ज़ुने ते सोने सेवा हो झाली
दीन दुबळ्यांना वस्त्रे मिळाली...(२)
सेवाभक्तीला रंग हो चढला
सत्संगाने तर कळस केला
समीरदादांना........
समीरदादांना खेचून आणले
त्यांनी कौतुक कौतुक केले...(३)
बापू ऎकून खूश हो झाले
श्रध्दावानांना आशिर्वाद दिले
सेवासप्ताह..........
सेवासप्ताह संपन्न झाला
माझ्या बापूंना आनंद झाला.....(४)
सेवासप्ताह संपन्न झाला
माझ्या बापूंना आनंद झाला......
माझ्या बापूंना आनंद झाला..
माझ्या बापूंना आनंद झाला................

॥ हरि ॐ ॥

Tuesday, June 21, 2011

अंजनामाता वही



श्रद्धावानांनो, सदगुरू श्री अनिरुद्धांनी स्वतः तयार केलेली, विशिष्ट रचना असलेली, श्री वरदा चंडिका प्रसन्नोत्सवात सिद्ध झालेली, अकरा दिशांनी संरक्षण देणारी व वामलता (दुष्प्रार्ब्धाचा) नाश करणारी 'अंजनामाता' वही लिहून सदगुरु कृपेचा लाभ घेऊया.

'अंजनामाता' वहीचे महात्म्य समजून घेण्याआधी आपण 'स्वाहा' आणि 'स्वधा' म्हणजे काय ते सजून घेवूया. हि दोन्ही नामे त्या चंडिकेचीच.
'स्वाहा' कार म्हणजे परमेश्वराला अहंकार न बाळगता जे अर्पण करायचे किंबहुना अहंकार सुद्धा ज्या शब्दाने अर्पण करायचा तो शब्द. ती स्पंदन म्हणजे 'स्वाहा' साक्षात 'अनसूया' थोडक्यात 'स्वाहा' म्हणजे अहंकार, मत्सर न बाळगता भगवंताच्या चरणी पूर्ण समर्पित होणे.
तर 'स्वधा' म्हणजे आदिमाता जिचे हे अकरावे नाम आहे. ती कशी आहे? तर, स्वतःच स्वतःचा आधार आहे. स्वतःच  स्वतःला धारण करणारी आहे. ती कोण आहे? ती 'स्वधा' आहे आणि 'स्वाहा' पण आहे.
 मानवाला विजय मिळवायचा असेल तर आधी स्वावलंबी बनलं पाहिजे, स्वयंपूर्ण बनलं पाहिजे (अर्थात self sufficient & self dependent) आणि ते बनायचं असेल तर आधी 'स्वाहा'कार करायला पाहिजे. म्हणजे आधी स्वतःला भगवंताला अहंकार विरहीत होऊन पूर्णपणे समर्पित करायला पाहिजे, म्हणजे काय? तर , स्वतःला अर्पण करायला पाहिजे. सन्यास वगैरे घेण्याची आवश्यकता नाही. माझा भाव कसा पाहिजे? कि, हे भगवंता माझ संपूर्ण जीवन तुझ्या पायाशी वाहिलेल आहे. तुला माझे जे काही करायचं आहे ते तू कर. मी आनंदाने प्रत्येक गोष्टीचा (सुख आणि दु:ख ) स्वीकार करीन. तूच माझा सांभाळ कर. मला मोकळा वेळ मिळेल तेव्हा किंवा मुद्दाम वेळ काढून मी तुझ्या भजनामध्ये, पुजनामध्ये, सेवेमध्ये तो वापरीन. अशा रीतीने भगवंताला स्वतःचा 'स्वाहा'कार केला की, मगच मनुष्याला हि आदिमाता 'स्वधा' प्राप्त होते आणि मगच तो स्वावलंबी व स्वयंपूर्ण होतो.
'स्वधासा अंजना' जी स्वधा आहे तीच सदैव अंजना आहे. 'स्वधासा अंजना'

परमात्म्याला प्रकट करणाऱ्या दोन शक्ती :
१. अंजना शक्ती
२. व्यंजना शक्ती

जेव्हा भगवंत (सदगुरु ) भावारुपाने येतो, आपल्या नकळतच येऊन मदत करतो ती 'व्यंजना शक्ती' आणि जेव्हा सदगुरु प्रकट रूपाने येतो ती 'अंजना शक्ती'.
अंजना शक्तीचा पुत्र म्हणजे महाप्राण हनुमंत, जो थोरला पुत्र आहे अर्थात सदगुरु दत्तात्रेय.
अनसूया हि स्वाहा आहे व अंजनी हि स्वधा दोन्ही एकच.
हा 'स्वाहा'कार (पूर्णसमर्पण ) व 'स्वधा'कार (पूर्ण स्वावलंबन, स्वयंपूर्णता) कोण  देऊ शकतो? तर, ज्यांनी हे दोन्ही गुण धारण केले आहेत तो व जो आदिमाता अंजनेचा (स्वधाचा) पुत्र आहे तो हनुमंत.
म्हणून आम्हाला 'स्वधा'कार प्राप्त करून घ्यायचा असेल तर आम्हाला पहिल्यांदा- "ॐ हरीमर्कटाय स्वाहा "  हा मंत्र म्हणायला पाहिजे. हा श्रेष्ठ मंत्र अतिशय पूर्वापार प्रचलित आहे. पण 'स्वाहा'कार आणि 'स्वधा'काराच कार्य श्रद्धावानांसाठी श्री वरदा चंडिका प्रसन्नोत्सवापासून अर्थात आदिमाता श्री महिषासुरमर्दिनीच्या स्थापना दिवसापासून सुरु झाले आहे.
"ॐ हरीमर्कटाय स्वाहा " ह्या मंत्राचे महात्म्य वर्णन करताना ऋषी आपल्याला स्पष्टपणे सांगतात कि,
"ॐ हरिमर्कट मर्कट मंत्रमिदं ,परिलिख्यती लिख्यती वामतले , 
    यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं ,यदि मुन्चति मुन्चति वामलता "
"ॐ हरीमर्कटाय स्वाहा " जो कोणी हा मंत्र हनुमंताच्या डाव्या पायाच्या खाली लिहील त्याच्या (लिहिणाऱ्याच्या) शत्रूंचा आणि वामलतेचा नाश होईल. वामलता म्हणजे काय? तर कळीचा प्रभाव आणि शनीची दशा. अर्थात साडेसाती, शनीची दशा आणि कळीचा प्रभाव ह्यांची एकत्रित झालेली गुंफण म्हणजे वामलता. माझ्या शत्रूंचा आणि वामलतेचा नाश करण्याचे सामर्थ्य जे आहे तो मंत्र म्हणजे "ॐ हरीमर्कटाय स्वाहा "

अंजनामाता  वही मला कस सहाय्य करते?
  1. ज्या क्षणी आपल्याला वाटतंय कि आपल मत कमकुवत बनलंय, आपल्या भीती घेरतेय त्याच क्षणाला अंजना मातेच्या आणि तिच्या पुत्राच्या आश्रयाला गेल्याने आपण निर्भर बनतो. सदगुरू कृपेने  मनः सामर्थ्य  मिळते.
  2. आपल्या पतीमधील दुर्गुण कमी करायचे आहेत, तशी पत्नीची इच्छा असेल तर पत्नीने अंजनामाता  वही लिहावी व पत्नीमधील दुर्गुण कमी व्हावे अशी पतीची इच्छा असेल तर पतीने अंजनामाता वही लिहावी. हनुमंत मधुफल वाटिकेतील फळे द्यायला सज्ज आहेच. त्याने दोघांत सुसंवाद सुरु होईल.
  3. प्रत्येक मानवामध्ये दहा चांगले गुण आहेत व दहा दोष आहेत. ते दहा दोष कमी करण्यासाठी अंजनामाता वहीचा आश्रय घ्यावा. मग "और देवता चित्त न धरही, हनुमत सेई सर्व सुख करही" ह्याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही, कारण वामलतेला नष्ट करण्याच कार्य हनुमंत करतो. वामलता मनुष्याला अकरा दिशांनी बांधते. अकरावी मनाची दिशा त्याचा स्वामी हनुमंत आहे त्या वामलतेला तोडण्यासाठी सदगुरू कृपेच बळ लागत ते बळ अंजनामाता वहीच्या माध्यमाने प्राप्त होते.
  4. जे अविवाहित आहेत किंवा ज्याची पत्नी किंवा जिचा पती हयात नाही त्यानाही हि वही अत्यंत लाभदायी आहे कारण अंजनामाता वही लिहिण्याने एकट्याने जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.  त्यांना कोणावर अवलंबून राहायची आवश्यकता उरणार नाही. कारण अंजनामाता वही लिहिल्याने स्वधा शक्तीचा स्त्रोत सदगुरू कृपेने अखंड सुरु राहतो.
 त्या सदगुरू श्री अनिरुद्धाना प्रार्थना करूया की, हे सदगुरूराया अनिरुद्धा तुझ्या कृपेनेच आम्हाला वामलता तोडणारी अंजनामाता वही प्राप्त झाली आहे. आम्हासाठी तूच 'स्वाहा' आणि 'स्वधा' आहेस म्हणून आमच्या जीवनात तूच 'स्वधा'कार (स्वावलंबन) आणू शकतो. म्हणून हे गुरुराया तू आम्हाला नित्य तुझ्याच प्रकाशात . हीच तुझ्या चरणी प्रार्थना. 

AIGV - भाग दोन (वनशेती)

Swapnil Dattopadhye 

हरि ओम
घाणेरी आणि बाभळीची रोपे करायला जोरदार सुरवात झाली. आत्मबल आणि अहिल्या संघातील सर्वच वीरा झपाटून कामाला लागल्या आहेत. तसेच सातारा, विरार, ऐरोली उपासना केंद्रांनी देखील मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करायला सुरवात केली आहे. अनेक श्रध्दावानांनी या रोपांची लागवड सुरु केली आहे

सगळ्यांच्याच उत्साहाला एक नवी पालवी फुटली आहे. त्याच पालवीला खतपाणी घालण्याच्या उद्देशाने आज व उद्या गोविद्यापीठम येथे AIGV  अंतर्गत वनशेतीमध्ये चारा लागवड केली जाणार आहे. खरतर ग्रामीण भागामध्ये चार्‍याची किती आवश्यकता आहे हे आपल्याला बापूंनी बारामास शेती चारा योजनेमध्ये सांगितले होते पण कायम स्वरुपी शेतकर्‍यांची ह्या चार्‍याची सोय व्हावी म्हणून आपण ग्रामविकासमध्ये कोणता चारा कसा लावायचा, त्याच्यातील कोणते अन्नघटक अधिक उपयुक्त असतात तसेच हा हिरवा चारा टिकवायचा कसा हे शिकवतो.

त्याचाच भाग म्हणून आपण आज व उद्या गोविद्यापीठम येथे मका (African Tall) व पॅरा गवताची लागवड करणार आहोत. ह्यातील पॅरा गवताचे वैशिष्ठ्य म्हणजे हे गवत लावल्यावर ह्या पासून वर्षभरात ८ ते १० वेळा गवत मिळते. तसेच एकदा लावलेल्या ह्या गवतापासून जवळजवळ ३ वर्षापर्यंत गवत मिळतच रहाते. त्याचप्रमाणे ह्या चार्‍यांमुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर थांबते. जोरदार पर्जन्यवृष्टी असणार्‍या भागात पावसाने माती वाहून जात नाही.

लवकरच त्याचे फोटो आपल्याला फेसबुकवर बघायला मिळतील तोपर्यंत सातारा उपासना केंद्रातर्फे केल्या जाणार्‍या रोपांचे फोटो पाहूया.
हरि ओम




Thursday, June 16, 2011

AIGV - भाग एक ( वनशेती )


BSwapnil Dattopadhye on Thursday, June 16, 2011 at 2:43pm
हरि ओम
६ मे रोजी बापूंचे रामराज्य २०२५ या विषयावर प्रवचन झाले आणि अनिरुध्दाज् इन्सिट्युट ऑफ ग्रामीण विकासाचे काम वेगाने सुरु झाले. थोड्याच दिवसात या कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतः परमपूज्य बापू, नंदाई आणि सुचितदादा गोविद्यापीठम् ला आले. त्या सर्वांचे फोटो आपण फेसबुकवर बघितले. आणि मग सगळ्यांकडून आम्हाला या ग्रामविकासाच्या कामात कसे सहभागी होता येईल याची जोरदार विचारणा सुरु झाली.
ग्रामविकासाच्या या कार्यामध्ये असणार्‍या जलसंधारण, वनीकरण, पशुपालन तसेच सेंद्रिय शेती या विविध घटकांची कामे आता गोविद्यापीठ्म येथे सुरु होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपण बाभूळ (Acacia Arabica), घाणेरी किंवा टणटणी (Lantana) यांची रोपे तयार करणार आहोत. ज्या ज्या श्रध्दावानांना अशी रोपे तयार करण्याची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर अशी रोपे तयार करून गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे अथवा कोणत्याही दिवशी गोविद्यापीठम् येथे जमा करावीत. रोपांच्या संख्येचे बंधन नसल्याने कितीही रोपे तयार करून आपण वरील ठिकाणी जमा करु शकता.

आता बघूया ही रोपे कशी तयार करायची
घाणेरी किंवा टणटणी (Lantana)

घाणेरीची रोपे तयार करण्यासाठी घाणेरीच्या झाडाची साधारण पेन्सिल एवढ्या जाडीची काडी निवडा. ही काडी तिरकी कापून घ्या म्हणजे मातीमध्ये ती पटकन रुजते. साधारण एक फुट ऊंचीची काडी कापून घ्या. या काडीवर शक्यतो २/३ डोळे आहेत याची खात्री करा. डोळे म्हणजे ज्या ठिकाणी नविन पाने फुटतात अशी जागा. नंतर या काडीवर फक्त दोनच पाने ठेवून बाकीची पाने काढून टाका.
आता कुंडी किंवा पिशवी घेऊन त्याला खाली २/३ भोके पाडा. त्यानंतर त्यामध्ये चांगली नर्सरी माती व शेणखत अथवा गांडूळखत समप्रमाणात घेऊन कुंडी किंवा पिशवी भरुन घ्या. त्यामध्ये ही घाणेरीची काडी लावा व लगेच हलके पाणी द्या. अशी तयार झालेली कुंडी किंवा पिशवी आडोश्याला परंतू भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशारितीने ठेवा. दररोज या कुंडीला किंवा पिशवीला पाणी घाला. साधारण ४/५ पाने फुटल्यावर ही रोपे गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे अथवा कोणत्याही दिवशी गोविद्यापीठम् येथे जमा करावीत
बाभूळ (Acacia Arabica)

बाभळीची रोपे तयार करण्यासाठी बाभळीच्या बिया गरम पाण्यात भिजत टाका त्या सुमारे २४ ते ३० तास भिजू द्या म्हणजे त्या लवकर रुजतील.   
आता कुंडी किंवा पिशवी घेऊन त्याला खाली २/३ भोके पाडा. त्यानंतर त्यामध्ये चांगली नर्सरी माती व शेणखत अथवा गांडूळखत समप्रमाणात घेऊन कुंडी किंवा पिशवी भरुन घ्या. त्यामध्ये एका कुंडीत किंवा पिशवीत २ या प्रमाणे ह्या भिजलेल्या बिया लावा. शक्यतो बिया लावण्याच्या जागी जास्तीत जास्त शेणखत किंवा गांडूळखत असू द्या म्हणजे बिया पटकन रुजतील त्यानंतर लगेच हलके पाणी द्या. अशी तयार झालेली कुंडी किंवा पिशवी आडोश्याला परंतू भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशारितीने ठेवा. दररोज या कुंडीला किंवा पिशवीला पाणी घाला. रोपे साधारण अर्धा/एक फूटाचे झाल्यावर ही रोपे गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे अथवा कोणत्याही दिवशी गोविद्यापीठम् येथे जमा करावीत

महामंत्र पठण




परमात्म्याच्या राजीव लोचानांकडे बघत बघत जो कोणी खालील महामंत्र १०८ वेळा १०८ दिवस म्हणेल त्याला उचित काम करण्यासाठी लागणारं सामर्थ्य प्राप्त होतेच.
श्रद्धावानांनो सद्गुरूचे हे वाचन आपल्या जीवनात प्रत्यक्ष आणून उचित कार्यासाठी सद्गुरूचे सामर्थ्य मिळवूया.
- महामंत्र -
राजीवलोचनः रामो कृपादृष्टी प्रक्षेपणेन हि l
ददाति सामर्थ्यमतुलं तदात्वे सर्वयोधिभ्यः l
ॐ परमेष्ठिने वत्सिने नमः ll
अर्थ- श्रीराम सर्व वानर सेनेचे अवलोकन करतात  व आपल्या राजीव नयनांनी (म्हणजे कामळासारख्या)  केवळ कृपादृष्टीक्षेपाद्वारे सर्व योध्यांना अतुलनीय सामर्थ्य प्रदान करतात.
                 महासंकटमोचन   महापापनिवारक  दिव्यप्रकाश आराधनाज्योती मधील आपल्या जीवनात सामार्थ्यारूपी प्रकाश आणणारी ही ५२वी आराधनाज्योती.
                 जे सामर्थ्य उचित कार्यासाठी वापरायचे आहे ते सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी हा महामंत्र मानला जातो म्हणून ते सामर्थ्य मिळविण्याचा सोपा मार्ग सदगुरू श्री अनिरुद्ध ह्या महामंत्राद्वारे श्रद्धावानांना दिग्दर्शीत करीत आहेत. तो मार्ग म्हणजे परमात्म्याच्या राजीव लोचानांकडे (डोळ्यांकडे ) अत्यंत प्रेमाने बघत बघत जो कोणी ह्या मंत्राचे दररोज १०८ वेळा असे १०८ दिवस पठाण करील त्याला उचित कार्यासाठी जे जे सामर्थ्य वापरायचे आहे ते ते सर्व सामर्थ्य त्याला ह्या महामंत्राच्या पठणाने प्राप्त होतेच. परंतु ज्या रुपाकडे बघून मी हा महामंत्र ते रूप परमात्म्याचच असलं पाहिजे. राजीव लोचन म्हणजे काय? तर ज्याच्या पापण्या डोळे उघडे केल्यानंतरही एकतृतीयांश बाहेरच राहतात ते राजीव लोचन होय. त्यामुळे डोळ्यांना कमळाच्या पाकळीचा आकार प्राप्त होतो . चित्रामध्ये तो राजीव लोचानच असावा लागतो. राजीव लोचन हे त्याच्या कृपादृष्टीचं साधन आहे. अशा भक्तवत्सल परमात्म्याला मी नमस्कार करतो. म्हणून ह्या महामंत्राच्या पुढे ॐ परमेष्ठिने वत्सिने नमः l 
असे जोडले आहे.
                  ह्या महामंत्राचं महात्म्यं आम्हाला ध्यानात ठेवलं पाहिजे. आम्ही उभे राहून म्हणू ,बसून म्हणू,हातात फोटो घेऊन म्हणू ह्या पेक्षा आम्ही तो रोज म्हणू हे महत्वाचे.
                  मला जरी हा मंत्र रोज १०८ वेळा असा १०८ दिवस म्हणता आला नाही तरी चालेल. मात्र दररोज वेळ मिळेल तेव्हा दिवसातून ५ वेळा, किंवा ९ वेळा , किंवा ११ वेळा, किंवा १५ वेळा त्याच्या डोळ्यांकडे प्रेमाने बघत बघत म्हटला तरी मला उचित कार्यासाठी जे जे सामर्थ्य हवा ते ते सार तो देणारच. मात्र वाईट हेतूने अनुचित कार्यासाठी सामर्थ्य मिळविण्याच्या हेतूने जर हा मंत्र म्हटला तर त्या पासून कोणतेही सामर्थ्य मिळणार नाही. कारण ' तो ' कसा ? तर " जाणितो वर्म सकळांचे "
            म्हणून आपण सर्वजण सद्गुरू श्री अनिरुद्धांना प्रार्थना करूया की, हे सद्गुरुराया अनिरुद्धा तू आम्हा सर्वांचे जाणतोच आहे. तुझ्या राजीव लोचनांचा कृपाप्रसाद आम्हाला नित्य मनः सामर्थ्याची रसद पुरवितच आहे. आज आम्ही तुझी सर्व लेकरे , तुझ्या चरणी प्रार्थना करतो की, हे सद्गुरुराया अनिरुद्धा,तुझ्या राजीव लोचनांकडे प्रेमाने बघत बघत हि रससाधना आमच्याकडून करून घेण्याची तू बुद्धी दे.
           सद्गुरूचे आपल्याशी अनेक जन्मांचे नाते आहे म्हणून त्याच्या फोटोकडे प्रेमाने बघत बसा, त्याचे रूप न्याहाळा, त्याचा रूप अतिशय प्रेमाने सतत बघावसं वाटलं पाहिजे. त्याचं रूप आपल्याला पिता आलं पाहिजे. त्याला बघून मला आनंद वाटलं पाहिजे. श्रीसाईसच्चरितातील १९व्या अध्यायात श्रीसाईबाबा राधाबाईंना सांगतात की आई तू माझ्याकडे अनन्यपणे पाहा मी हि तुझ्याकडे अनन्यपणे पाहीन. रूप महात्म्य जेवढा अधिक तेवढं नाम महात्म्य ही अधिक, जेवढा नाम महात्म्य अधिक तेवढं गुणसंकीर्तन अधिक चांगले. त्यामुळे त्याचे त्रिगुण कळतात.
              सद्गुरूंच्या वारंवार दर्शनाने माझ्या मनातील मानवत्व वाढीस लागते नामस्मरणाने माझ्या मनातील जनावरे मारली जातात तर गुणसंकीर्तनाने माझ्या प्रगतीचा मार्ग खुला होतो.
               गुणसंकीर्तन म्हणजे सद्गुरूच्या प्रेमाबद्दल बोलणे. म्हणून तितक्याच प्रेमानी सद्गुरू बापूंनी श्रद्धावानांना सांगितले की, आज जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्वांना सांगा , प्रेमाने सांगा. ते सांगताना तुम्ही तुमच्या मनातील सुंदर सूर ऐकाल. तुमचा सद्गुरू नित्य जवळ आहे ह्याचा अनुभव घ्याल. कसा तर All over, Everywhere, Wherever you are . कारण माझा सद्गुरू असाच आहे. तुम्ही मला सद्गुरू मानता तर मला तुमच्या बरोबर असलंच पाहिजे कारण ती माझ्या आई चण्डिकेची  इच्छा आणि माझे आजोबा दत्तगुरूंचा हुकुम आहे. मी तुमच्यासाठी तुमच्याबरोबर नेहमीच आहे. सद्गुरू नाह्मी त्याच्या भक्तांसाठी विश्वासपात्र असतो. सद्गुरू माझा आहे ही भावना घेऊनच आपण पुढच्या जीवनात प्रवेश करणार आहोत.

हे सद्गुरूराया अनिरुद्धा तुझ्याप्रेमाच्या ह्या अमृतकुंभाचा माझ्या हृदयात नित्य अभिषेक होत राहो हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
                                                                    ll हरि ॐ ll 


श्री गुरुक्षेत्रम येथे दिलेली माहीती


Sunday, June 12, 2011

आराध्न्या ज्योती ५२ ,चे १०८ वेळा पठण १०८ दिवस

                               राजीवलोचनः रामो कृपादृष्टी प्रक्षेपणेन हि l
                               ददाति सामर्थ्यमतुलं तदात्वे सर्वयोधिभ्यः ll
                                         ॐ परमेष्ठिने वत्सिने नमः 
          आराध्न्या ज्योती ५२. १०८ वेळा एकूण १०८ दिवस करायला बापूनी सांगितले आहे.

Friday, June 10, 2011

भक्ती-सेवा सप्ताह : दिवस पाचवा...!

 आजचा दिवस खूपच वेगळा...! `जुनं ते सोनं` अंतर्गत  काल झालेले mega scale sorting च्या वाटपाचा आजचा दिवस. पुणे जिल्ह्यातील खेड व मुळशी तालुक्यातील वाटपासाठी आज 5 टीम
्स सकाळी  ८ वा.निघाल्या.बापूकृपेने मला या सेवेत जायला मिळालं. तिथे पोहोचताना व  पोहोचल्य...ानंतर ज्या कार्यकर्त्यांनी हा सर्व्हे केला त्यांना मनापासून सलाम केला. इतक्या दुर्गम भागात खडतर  मार्गाचा हा सर्व्हे त्यांनी कसा केला? एकच उत्तर-त्यांच्या पाठीशी असलेल्या बापू या शक्तीमुळेच.! ज्यांना वाटप केलं गेलं त्यांच्याकडे पाहिलं तर बापूंनी आपल्याला किती सुखात ठेवलंय याची तीव्रतेने जाणीव होते. वाटपात मिळालेल्या वस्तूंमुळे लाभार्थींच्या चेहऱ्यावरील आनंद  पाहणं हा एक अनुभवच... प्रतिकूलता तिथेच जाणीव हेच खरं..! आपण खूप अनुकूलता असूनही सारखे कुढत असतो. तसाच अनुभव प्रथमच बापूंच्या चिन्मय पादुकांचं पूजन करणाऱ्या श्रद्धावानांना  झालेल्या  अतीव आनंदाचे चेहरे पाहताना येतो. आपल्याला सहजप्राप्त गोष्टींची किंमत लवकर कळतच नाही. बापूंचं पादुकापूजन करायला मिळणं ही बापूंची आपल्यावर कृपा आहे,आपण काही श्रेष्ठ भक्तीची गाठोडी घेऊन आलेलो नाहीत याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडायला लागतो. मग आपण पादुकापुजनासाठी वाढदिवसासारखे मुहूर्त   पाहू  लागतो. तो मात्र आपल्याला सदैव साथ देत असतो,मदत पुरवत असतो..मुहूर्त न पाहता...! बापू आपल्याला दिसतात,त्यांना पाहता येतं,त्यांच्याबरोबर नाचता-हसता येतं याचं महत्त्व  आपल्याला कितपत स्मरणात राहातं कोण जाणे. आपल्याला सर्व सहज वाटू लागतं आणि मग येतो casual approach.. बापू काय दर गुरुवारी दिसतात, गुरुक्षेत्रमला असतात..अरे ,बापू लाख सांगोत,  `मी तुमचा मित्र आहे` तो त्यांचा मोठेपणा झाला, पण तो सर्व देवांचाही देव आहे याची जाणीव आपण दर श्वासाला आपण ठेवायला हवीय आणि सतत कृतज्ञ राहायला हवं.! या कृतज्ञतेसाठी तरी या देवाचं पादुकापूजन अगदी MUST .. खरंच या सेवा सप्ताहाने अनेक स्तरांवर  मला चिंतनशील  केलंय..      आज `मायेची ऊब`अंतर्गत नंदाईच्या लेकींनी 21 गोधड्या तयार केल्या. आता कालपासून सिंहसुद्धा या सेवेत पुढे सरसावले आहेत बरं..! `गणेशमूर्ती`सेवेत  लगद्याचे 75 गोळे,10 मूर्ती फिनिशिंग तसेच 25 मूर्तीवर रंगकाम केले गेले. `चरखा` नेहमीप्रमाणेच जोरात...171 लडी बापूचरणी  अर्पण..  आजचे `जुनं ते सोनं` अंतर्गतच्या वाटपाचे लाभार्थी- तब्बल 3300 !      Bapu Thy Grace !!! छान सेवेमुळे `सत्संग` tonic चा डोस चांगलाच रंगला...! फुल्ल धमाल ....

भक्ती-सेवा सप्ताह : दिवस चौथा !

 आजचा दिवस भक्तिपेक्षा कांकणभर जास्त सेवेचाच..! पहाटे ठीक 6 वाजता पुण्याहून 35 - 40 कि.मी.अंतरावरील कासारसाई गावात आपले केंद्राकार्यकर्ते रवाना झाले. कार्यक्रमस्थळी ती मंडळी आली ती
दोन ट्रक भर कपडे घेऊनच..! `जुनं ते सोनं` अंतर्गत या कपड्यांचे MEGA SCALE... वर sorting झाले.(किती म्हणून विचारताय? कृपया फोटो पहा.) `मायेची उब ` कक्षात आज 11 गोधड्या तयार झाल्या. आज या सेवेत सिंहांनीसुद्धा सहभाग घेतला..(`आम्हालाही येतं` हे दाखवायला नाही बरं का ! )      `गणेशमूर्ती`सेवेत आज 75 गोळे तयार होऊन 55 मूर्तींचे फिनिशिंग केले गेले.              `चरखा`सुद्धा आज वेगात..! एकंदर  190 लडी व 100 बॉबिन्स बापूचरणी अर्पण ...!  `सत्संग` म्हणजे दिवसभराचा थकवा विरघळवून टाकणारं tonic ! आजही कोण प्रमुख,कोण कार्यकर्ता,कोण भक्त काही कळत नव्हतं....माझ्या बापूसमोर सगळे समान पातळीवर ! `बापू भक्त` ही एकच आणि खरी ओळख..!  

भक्ती-सेवा सप्ताह : दिवस तिसरा !

७ जून २०११ ! आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे प.पूज्य बापूंच्या पादुकापुजनाने झाली. आणखी ५ नवीन मंडळींना पूजनाचा ल
ाभ मिळाला.विशेष म्हणजे आज  पूजन सांगायला होते पुणे केंद्राचे प्रमुख सेवक प्रवीणसिंह वाघ..!अत्यंत भावपूर्ण वातावरणात श्री अनिरुद्धांचे प...ूजन संपन्न झाले.    आज `गणेशमूर्ती`सेवेअंतर्गत कक्षात केलेली सजावट अप्रतिम होती. `नवविधा भक्ती`च्या प्रत्येक पायरीवर मुर्तीप्रक्रियेचा एकेक टप्पा हि कल्पनाच खूप सुंदर..! बापूंवरील  वृद्धिंगत होत जाणारे प्रेम नवनवीन कल्पनांना जन्म देते हेच खरं..! लगद्याचे एकंदर 100 गोळे तयार झाले व 30 मूर्तींचे फिनिशिंग केले गेले.प.पूज्य नंदाईच्या लेकीसुद्धा आज फुल्ल फॉर्मात होत्या.. 70  लेकींनी  एकेंदर 18 गोधड्या तयार केल्या..!  आनंदे गुरुमाय...!`जुनं ते सोनं` अंतर्गत आज 149 कुटुंबातील 600 लाभार्थींच्या कपड्यांचे वर्गीकरण व बांधणी (packing) करण्यात आली.  आज `चरखा`ही जोरातच फिरत होता.एकूण 100 लडी आणि 205 बॉबिन्स बापूचरणी अर्पण करण्यात आल्या. ( achievement ना ? )        दिवसअखेरचा `हरिपाठ` हा उर्जास्त्रोत ठरतोय...त्यानंतरचा सत्संग हा, ज्यांचं बापूंवर मनापासून प्रेम आहे आणि ज्यांना म्हणून `त्याचं`नाम आळवावंसं  वाटतं,अशा श्रद्धावानांकडून सादर केला जातो. `गायकी`नाही तर बापूंना अपेक्षित `भाव` असणारे बरेच `भावगायक` बापू सर्वांसमोर आणत आहेत...! मी `गायक`आहे हा विचार न ठेवता मी `त्याचा`सेवक आहे हा भाव ठेऊन बापूनाम घेणाऱ्यावर बापू खूष होताना दिसत आहेत.        तिसरा `भाव`पूर्ण दिवस संपन्न...! 

भक्ती-सेवा सप्ताह : दिवस दुसरा ...!

भक्ती-सेवा सप्ताहाचा आज दुसरा आनंद दिन..!  आजच्या दिवसाची सुरुवात प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या पूजनाने झाली. प्रथमच पादुका पूजन करणाऱ्या आजच्या मंडळींना त्यांच्या डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंना सोबत घेऊनच येत होता. आज सेवा उपक्रमांना सुरुवात झाली... ती भक्त-कार्यकर्त्यांच्या उदंड उत्साहात...! आज `मायेची ऊब` अंतर्गत एकूण 13 गोधड्या तयार झाल्या. `प.पूज्य नंदाईच्या लेकी` अगदी तल्लीन होऊन सेवा करताना पाहायला मिळाल्या.`चरख्याचे` चक्रसुद्धा वेगात होते.एकंदर ३६ चरख्यांची मांडणी केली गेली.दिवसअखेर 35 तयार लडी व 150 भरलेल्या बॉबिन्स बापूचरणी अर्पण करण्यात आल्या. `गणेशमूर्ती`सेवेस मिळालेला प्रतिसादही उल्लेखनीय होता. आकर्षक आणि अर्थपूर्ण सजावट असलेल्या या कक्षात एकंदर 75 गणेशमूर्तींच्या finishing चे 25 % काम पूर्ण करण्यात आले. तसेच कागदाच्या लगद्याचे 103 गोळे तयार झाले. आजची सर्वांत प्रशंसनीय सेवा म्हणजे `जुनं ते सोनं`अंतर्गत झालेली सेवा ! काही तासांच्या कालावधीत एकूण 411 कुटुंबांतील अंदाजे 1650 व्यक्तींच्या कपड्यांचे स्त्री-पुरुष-वृद्ध-लहान बालके यांच्या वयोगटानुसार वर्गीकरण करून त्यांचे व्यवस्थित packing करण्यात आले. या सेवेत आपापल्या कुवतीनुसार सर्व वयोगटातील सर्व जणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून बापू नक्कीच आनंदले असतील..!श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजाचे, मातृवात्सल्यविन्दानमचे, गुरुचरित्राच्या १४ व १८ व्या अध्यायांचे पठण हे सेवा `समर्पित` भावाने करण्याची शिकवण देणारे होते. सेवा करताना नकळत जागृत झालेला अहंभाव `त्याच्या` नामसंकीर्तनात विरघळून जातो याची पुनःप्रचीती आली.     नंतर पुन्हा `हरिपाठा`ने दिवसाची पूर्तता झाली...अतिशय तृप्त भावनेने...!

भक्ती-सेवा सप्ताहास सुरुवात उत्साहात...!

प.पूज्य बापू, नंदाई, सुचितदादा यांच्या कृपाशिषाने भक्ती-सेवा सप्ताहाला उत्साहात प्रारंभ झाल
ा. उपक्रमाची सुरुवात उपक्रम स्थळाच्या स्वच्छतेने झाली. यावेळी पर्जन्यराजाने दणदणीत सलामी देऊन उपक्रमास शुभेच्छा दिल्या..प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या आगमनाच...े वेळी मात्र त्याने `मौन` पाळले...प.पूज्य बापूंच्या चिन्मय पादुकांच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी विशेष म्हणजे पुणे केंद्राने आवाहन केल्याप्रमाणे अशा मंडळींना पूजनाचा लाभ मिळाला ज्यांना इच्छा असूनही काही अडचणींमुळे,घरातील निष्कारण विरोधामुळे त्यांच्या घरी पादुका पूजन करता येत नाही.. केंद्राच्या या आवाहनाला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि बापुकृपेने त्यांना आनंद देता आला. त्यानंतर झाला `सत्य प्रवेश`...पुढे श्रीगुरुचरित्र अध्यायांचा मेरुमणी अध्याय १४ वा चे पठण झाले..आणि त्यानंतरचा कळस गाठणारा संतश्रेष्ट श्री ज्ञानदेवांचा `हरिपाठ`...!                 `आजचा दिनु ऐसा गोड जाहला...`!!

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected