Thursday, May 12, 2011

जुईनगरच्या देवता मोठ्या आईच्या भेटीला येणार

 marathi post
शनिवार दिनांक १४ मे रोजी सायंकाळी जुईनगरच्या देवता श्री हरिगुरुग्राम येथे श्री वरदाचण्डीका प्रसन्नोत्सवात मोठ्या आईच्या भेटीला येणार. 
१) हा देवभेटीचा / क्षेत्रभेटीचा कार्यक्रम शनिवार दिनांक १४ मे रोजी ठीक संध्याकाळी ६.०० वाजता सुरु होइल. 
२) श्रीक्षेत्र ज...ुईनगर येथील आदिमातेसमोरील दोन देविसिंह, श्री मंगेशाचा त्रिशूळ, श्री शांतादुर्गेसमोरील तीन नाग व त्याचबरोबर मंगलकुंभ ह्या देवता श्रीक्षेत्र श्रीहरिगुरुग्राम येथे आणले जातील.
३) कार्यक्रमाची सुरुवात श्रीदुर्गावरद होमाच्या मंडपातून होईल. 
४) वरील सर्व देवता सजवलेल्या पालखीतून अत्यंत दिमाखदारपणे वाजत गाजत प्रचंड जल्लोशात मुख्य मंडपात आणल्या जातील. मुख्य प्रवेशव्दाराशी या देवतांचे औ़क्षण केले जाईल. 
५) त्यानंतर वरील देवता प्रथम श्री महलक्ष्मी दीप मग त्यानंतर श्री महाकाली कुण्ड त्यानंतर श्री महासरस्वती वापी, मग श्री सहस्त्रचण्डी यज्ञ त्यानंतर आई शत्रुघ्नेश्वरी व सर्वात शेवटी तीन प्रमुख देवता म्हणजेच आपल्या आदिमातेच्या भेटीला जातील.त्यानंतर सर्वात महत्वाचा सोहळा म्हणजे श्रीक्षेत्र जुईनगर येथील श्री शांतादुर्गा अर्थात पार्वती अ श्री गंगामाता ह्यांची भेट होईल. गंगामाता शंकराच्या डोक्यावर निवास करते तर पार्वती शंकराच्या ह्रुदयात. अशी ही दोन आदिमातेचीच रुपे एकमेकांना भेटतील. सर्व कोहळा साधारणपणे १०.०० वाजेपर्यंत होईल.   तेव्हा शनिवारचा दिवस चुकवू नका पूर येवो वा भूकंप या आदिमातेचे चरण सोडू नका कारण एकवेळ सर्व जग बुडेल पण ज्यांनी ज्यांनी ह्या आदिमातेचे चरण धरले ते मात्र यात अजिबात बुडणार नाहीत ही आपल्या बापूरायाची ग्वाही आहे.

No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected