Tuesday, June 21, 2011

AIGV - भाग दोन (वनशेती)

Swapnil Dattopadhye 

हरि ओम
घाणेरी आणि बाभळीची रोपे करायला जोरदार सुरवात झाली. आत्मबल आणि अहिल्या संघातील सर्वच वीरा झपाटून कामाला लागल्या आहेत. तसेच सातारा, विरार, ऐरोली उपासना केंद्रांनी देखील मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करायला सुरवात केली आहे. अनेक श्रध्दावानांनी या रोपांची लागवड सुरु केली आहे

सगळ्यांच्याच उत्साहाला एक नवी पालवी फुटली आहे. त्याच पालवीला खतपाणी घालण्याच्या उद्देशाने आज व उद्या गोविद्यापीठम येथे AIGV  अंतर्गत वनशेतीमध्ये चारा लागवड केली जाणार आहे. खरतर ग्रामीण भागामध्ये चार्‍याची किती आवश्यकता आहे हे आपल्याला बापूंनी बारामास शेती चारा योजनेमध्ये सांगितले होते पण कायम स्वरुपी शेतकर्‍यांची ह्या चार्‍याची सोय व्हावी म्हणून आपण ग्रामविकासमध्ये कोणता चारा कसा लावायचा, त्याच्यातील कोणते अन्नघटक अधिक उपयुक्त असतात तसेच हा हिरवा चारा टिकवायचा कसा हे शिकवतो.

त्याचाच भाग म्हणून आपण आज व उद्या गोविद्यापीठम येथे मका (African Tall) व पॅरा गवताची लागवड करणार आहोत. ह्यातील पॅरा गवताचे वैशिष्ठ्य म्हणजे हे गवत लावल्यावर ह्या पासून वर्षभरात ८ ते १० वेळा गवत मिळते. तसेच एकदा लावलेल्या ह्या गवतापासून जवळजवळ ३ वर्षापर्यंत गवत मिळतच रहाते. त्याचप्रमाणे ह्या चार्‍यांमुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर थांबते. जोरदार पर्जन्यवृष्टी असणार्‍या भागात पावसाने माती वाहून जात नाही.

लवकरच त्याचे फोटो आपल्याला फेसबुकवर बघायला मिळतील तोपर्यंत सातारा उपासना केंद्रातर्फे केल्या जाणार्‍या रोपांचे फोटो पाहूया.
हरि ओम




No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected