Wednesday, August 31, 2011

बाप्पाच्या आगमनाची तयारी भाग २

आले आले हो आले आले गणपती बाप्पा आले......................
आज भाद्रपद तृतीया म्हणजेच हरतालिकेचा दिवस आणि उद्या होणार बाप्पाचे पूजन.. बापूनी सांगितल्याप्रमाणे आज संध्याकाळी ५.०० वाजता अमरसन्स , लिंकिंग रोड वरून श्रींचे आगमन झाले.. अगदी वाजत गाजत ढोल ,ताशे, लेझीम , च्या तालावरती श्री गणेशाचे आगमन हैप्पी होम मध्ये झाले,
कालच्या भागात आपण पहिले ती हैप्पी होम मध्ये सुरु असलेली साफसफाई ची तयारी, तसेच आईने आपल्या बाळासाठी केलेली सेवा.... आज आपण काही फोटोस व VIDEO पाहणार आहोत ते म्हणजे बाप्पाच्या आगमनाचे.... चला तर मग पाहूया ..........
                                                हीच ती श्री दत्त गणेशाची सुबक मूर्ती ..
                                                              अनिरुद्धांचे ५ लेझीम पथक....
आता काही VIDEO पाहूया......

VIDEO NUMBER १

VIDEO NUMBER २

चला तर आत्ता वाट पाहूया ते पूजनाची ....................

Monday, August 29, 2011

बाप्पाच्या आगमनाची तयारी भाग १



आज सर्व बापूंच्या ग्रुप किवा ब्लोग वर एकाच चर्चा ते म्हणजे " येणार ना श्रींचे दर्शन घेण्यासाठी बापूंच्या घरी?"
खरच आज सकाळी म्हणजेच ३०/८/२०११  ला हैप्पी होम येथे विग्नाहार्ता गणेशाच्या स्वागतासाठी स्वच्छता करण्यात आली हैप्पी होम आणि लिंक अपार्टमेंट मध्ये काम करणारे अनेक बापू भक्त स्वच्छता  करण्यासाठी आले होते, आणि आपल्या बाळांसाठी ती करुणामयी ती वात्सल्य , अल्हादिनी नंदाई स्वतः आपल्या बळानकरिता 
चाहा व बिस्कीट घेऊन आली... त्यावेळीचे हे दृश्य....
                                            Photo Source : ReshmaVeera Harchekar
खरच हैप्पी होम आता सज्ज झालंय श्रींच्या आगमनासाठी ! 
तर आजचा हा पहिला  भाग  संपला दुसरा भाग  लवकरच..... तो पर्यंत येत राहा किनार्यावर...





Sunday, August 28, 2011

रिंगण सोहळा भाग २

जरी मी पुण्यात साजरा झालेल्या रिंगण सोहळ्यात प्रत्यक्षात नव्हतो पण, कालचा लेख वाचून आपण हि तिथे आहोत ह्याची जाणीव झाली खरच किती आगळा वेगळा असा हा सोहळा. हि माझ्यामते अनिरुद्ध एकादशी साजरी झालीय.... खरच तो सावळा विठ्ठल अनिरुद्ध नक्कीच तिथे आलेला ह्यात शंका नाही. आपल्यासर्वाना एक अभंग माहिती असेल "अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर " ह्यात मला जरा बदल करावासा वाटतो ह्या रिंगण सोहळ्यासाठी . तो असा........
                                                 "अवघे गर्जे पुणेनगर चालला  अनिरुद्धचा गजर,
                                                  अवघे गर्जे पुणेनगर चालला  हरिनामाचा गजर....
                                                                   भाव ह्याच्या ध्यानी मनी ,
                                                            अवघी दुमदुमली पुणेनगरी ,
                                                वैष्णव संगे ,भक्त नाचती, अनिरुद्धच्या चरणी........
                                               अवघे गर्जे पुणेनगर चालला अनिरुद्धचा गजर"
अश्या काही तोडक्या-मोडक्या शब्दात मला जे सुचलाय ते मी लिहिलंय.. बाकी सांभाळून घे रे....
 तर ह्या रिंगण सोहळ्यात नुसते वयस्कर नसून प्रौड तसेच लहान मुलं-मुली सुद्धा विठू नामाच्या गजरात दंगले होते..... त्या क्षणाचे काही फोटोस फेसबुक वरील पुण्याचे सिंह-वीरा ह्या ग्रुप मधले मी इथे दाखवत आहे.
                                                       चालला नामाचा गजर................
                                                        अवघी दुमदुमली पुणे नगरी ...........
                                                    दिंड्या पताका वैष्णव नाचती.......
                                               सूचितवरदे हारे विठल जय जय अनिरुद्ध नंदाई......
                                                   तुझे नाम गोड किती ,तुझे गुण गाऊ किती...
                                             बापू माझा, बापू माझा, विठ्ठल सावळा , त्याने मला
                                                 लावियेला लळा...............

पुण्यात साजरा होतोय रिंगण सोहळा


FACEBOOK POSTING BY GIRISH KARULKAR.
हरि ओम ... 
 "या पुण्य नगरीत | काय वाजत गाजत ... काय वाजत गाजत ... या भक्ताच्या मेळ्यात | अनिरुद्ध नाचत डोलत..." काल दिनांक २७ ऑगस्ट २०११ रोजी  पुणे उपासना केंद्रात (Modern Highschool) शिशु विद्या मंदिर येथील  शनिवारच्या उपासनेसाठी असलेल्या ......आणि Modern Highschool च्या मागील बाजूस हेडगेवार सभागृहातील घोराकाष्ट्तोद्धारण पठण कक्षात असलेल्या....... अशा दोन्ही ठिकाणाहून सदगुरू बापूंच्या चिन्मय पादुकांचे निर्गमन एका आगळ्या वेगळ्या अशा भक्तिमय रिंगण सोहळ्याने झाले... 
                                  "जय जय राम-कृष्ण-हरि" च्या गजरात बापू भक्तांच्यासह  २ दिंड्या दोन्ही बाजूंनी निघाल्या .. ..  या दोन्ही दिंड्या टाळ, चिपळ्या आणि मृदंगाच्या गजरात पुढे सरसावत Modern Highschool  येथील मुख्य पटांगणात एकत्र आल्या .....   "जय जय राम-कृष्ण-हरि" चा गजर .... सोबात गरजणारे टाळ, चिपळ्या आणि मृदंग .... एकीकडे होणारा पवित्र असा शंख नाद .... वाजणाऱ्या तुताऱ्या ....  सदगुरू अनिरुद्ध बापूंच्या २ चिन्मय पादुका ... त्याभोवती दिंड्या.. ....भगव्या-पताका.... सुंदर अब्दागिरी... संस्थेचे ध्वज घेत पुणे उपासना केंद्रातील सर्व  कार्यकर्ते तसेच बापू भक्तांनी गजराचा ठेका साधत फेर धरला ...  आणि नेमक्या त्याच वेळी सत्संगाच्या मंडळींनी"विठोब्बा  रखुमाई जय जय.....विठोब्बा  रखुमाई......." चा गजर सुरु केला...
                                                                            रिंगणाच्या मधोमध  सदगुरू अनिरुद्ध बापूंच्या २ चिन्मय पादुका... टाळ, चिपळ्या आणि मृदंगाचा जयघोष.... सन्मानाने उंचावणारे ध्वज ... भगव्या पताका ...  मनामध्ये लाडका बापुराया आणि मुखात हरिनामाचा  गजर......अशा अत्यंत सुंदर भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळा सुरु झाला....  अगदी लहान मुलांपासून ते सगळे तरुण, मध्यम वयीन तसेच जुनी जाणती अशी वयस्कर मंडळींची पावल सुद्धा  आपोआप फेर धरू लागली..... "विठोब्बा  रखुमाई जय जय विठोब्बा  रखुमाई"..... ... "दत्ता दिगाम्बाराया हो बापू मला भेट द्या हो" ......   "विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला " ....... "जय हरि विठ्ठल श्रीहरी विठल".....   "सुचीत्दा वरदे  हारी बापू जय जय अनिरुद्ध नंदाई" .....    अशा एका मागून एक अशा गजरांची शृंखला सुरु झाली आणि पुणे उपासना केंद्रात जणू पवित्र हरिनामाचा अखंड स्त्रोत घेऊन भक्ती गंगाच अवतरली ....
                                                                       "टाळ घोष कानी येती .. ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ....पांडुरंगी नाहले हो पुण्यनगरी तीर.......  या  रिंगण सोहोळ्यात एक प्रकारचा पवित्र असा maganetic force अगदी प्रत्येकाला जाणवत होता ...... प्रत्येक भक्त "त्या"   पांडुरंगाशी ...  इतका मनोभावे जोडला गेला होता..कि परम पूज्य आई, बापू आणि दादांचे अस्तित्व तिथे आहेच ... हे प्रत्येकाला जाणवत होतं...... प्रत्येक भक्त गजरात तल्लीन झाला होता....  प्रपंच ...दुखः..संकट... अडचणी .. वेदना .. सगळ्या सगळ्याचा विसर पडला होता.... प्रत्येकाची मनस्थिती जणू "देव दिसे ठाई ठाई ... भक्त लीन भक्तापायी... सुखालागी आला या हो... आनंदाचा पूर" ...   अशी झाली होती
                             हा रिंगण सोहळा कधी संपूच नये असा प्रत्येकाला वाटत होतं...... परंतु अखेरीस "अवघा रंग एक झाला.." आणि अनिरुद्ध माऊलीचं प्रेम आपल्या हृदयात साठवत सर्व भक्तांनी पुन्हा एकदा  "जय जय राम-कृष्ण-हरि" च्या गजरात सदगुरू बापूंना निरोप दिला.... मित्रांनोखरच सांगतो.... सदगुरू बापूंना निरोप देताना प्रत्येकाच्या .. अगदी खरंच प्रत्येकाच्या मुखी हरिनाम ...  नयनात सद्गुरूंच्या आठवणीने दाटलेले प्रेमाचे अश्रू आणि हृदयात "अनिरुद्धराम" अतिशय शांतपणे स्थिरावला होता !!!!! 
या रिंगण सोहळ्याचे फोटो पाहूया पुढील भागात.......  

Friday, August 26, 2011

गणपती बाप्पा मोरया अनिरुध्द बाप्पा मोरया

FACEBOOK NOTE BY SWAPNILSINH DATTOPADHYE. 
॥ हरि ओम ॥

आजपासून बरोबर पाच दिवसांनी श्री गणेशाचे आगमन होणार. कालच परमपूज्य बापूंनी त्यांच्या सर्व श्रध्दावान मित्रांना आपल्या घरच्या गणपतीचे आमंत्रण दिले.

# बुधवार दि. ३१-०८-२०११ रोजी ठिक ५.०० वाजता अमरसन्स, लिंकिग रोड, बांद्रा येथून श्री गणेशाचा प्रचंड उत्साहात वाजत गाजत आगमन सोहळा सुरु होईल. तेव्हा या आगमनाच्या मिरवणूकीला सर्वांनी या आणि हो हॅपी होमला बापूंचे दर्शन घेतल्यावर प्रसाद घेउन जायला विसरू नका.

# गुरुवार दि. ०१-०९-२०११ रोजी ९.०० वाजता गणपतीचे पूजन सुरु होईल व त्यानंतर ११.०० वाजल्यापासून रात्रा ९.०० वाजेपर्यंत दर्शन सुरु असेल. आणि अर्थातच त्यानंतर महाआरती होईल.

# शुक्रवार दि. ०२-०९-२०११ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत दर्शन सुरु असेल.  

# शनिवार दि. ०३-०९-२०११ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत दर्शन सुरु असेल.  

आणि त्यानंतर आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा पुर्नमिलाप सोहळा ( आपण विर्सजन मिरवणूकीला पुर्नमिलाप सोहळा असे म्हणतो ) ४.०० वाजता सुरु होईल. अत्यंत उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या वातावरणात बापूंबरोबर नाचत नाचत या गणरायाला आपण "पुढच्या वर्षी लवकर या" म्हणून आळवणार आहोत.हा मात्र त्यानंतर साक्षात नंदाई व सुचितदादांच्या हस्ते महाप्रसाद घेऊन जायला विसरू नका.

प.पू. बापू, प.पू नंदाई व प.पू. सुचितदादा यांच्या तर्फे मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आग्रहाचे निमंत्रण करतो.

(बर्‍याच जणांना असे वाटते कि आम्ही आगमनाच्या मिरवणूकीला येऊ शकत नाही. असे नाहिये. प्रत्येक जण या मिरवणूकीलाच काय पण या तिन दिवसात प्रत्येक कार्यक्रमाला येऊ शकतो.)

तेव्हा हि माहिती कृपया आपल्या सर्व श्रध्दावान पर्यंत पोचवा. व जमले तर पुढचे ४-५ दिवस हेच आपल्या "STATUS" वर राहू द्या जेणेकरून सर्वांना याची माहीती होईल.या संर्दभात काही अडचण असल्यास नक्की विचारु शकता.

Wednesday, August 24, 2011

Ghorkashtodharan Stotra Pathan 2011





Ghorkashtodharan Stotra Chanting Program has been arranged by Sadguru Shri Aniruddha Upasana Trust as like every year in the highly auspicious month of Shravan.


The program would be carried in two sessions. In each session the Ghorkashtodharan 


Stotra would be chanted for 108 times. Following are the details for the program.

  • Address:
Shri Krishna Hall, Jadhav MargOff S.S.Wagh Marg, Naigaon, Dadar (East)Mumbai 400014,


*Landmark: Opposite Chitra Cinema

Date and Timings: 



From 31st july 2011 to 29 th August 2011.



** Except Thursdays

Session - I: 9:30 am - 1:00 pmSession - II: 5:30 pm - 9:00 pm

** For Thursdays



Session - I: 9:30 am - 1:00 pm, Session - II: 4:00 pm- 7:00 pm


photo source by {aniruddhafoundation.com}

Tuesday, August 23, 2011

चला ग मंगळागौरीचा ह्या करूया जागर ...


आपले सगळे सण वार परम पूज्य नंदाई खूप प्रेमाने संभाळते. उदा. गणपती,हळदी-कुंकू , दिवाळी -दसरा आणि मंगळागौरसुद्धा. मागच्या वर्षी श्रावण महिन्यातच नंदाईने तिच्या लाडक्या लेकीची आणि लाडक्या सुनेची मंगळागौर  अगदी थाटामाटात  साजरी केली. लोप पावत चाललेल्या सर्व खेळांना आईने पुन्हा उजाळा दिला. जवळ जवळ एक महिना आधीपासून आईसकट आम्ही सर्वजण ह्या खेळ आणि गाण्यांच्या तयारीला लागलो होतो. आईच्या busy schedule मधून स्वत: आईसुद्धा ह्या सर्वासाठी वेळ काढत होती.
आईने स्वत: नऊवारी साडी नेसली होती आणि शाकंभरी व निष्ठाला पण नेसवली होती.त्या दोघींना नखशिखांत पारंपारिक दागिन्यांनी सजवलेले होतें. कोल्हापुरी साज , बेल पांटीक ,पोहे हार, पुतळ्यांची माळ  ,नथ,  बुगडी,कंबरपटटा , पैंजण आणि अजून बरच काही ...........
आम्हाला सर्वांना असा वाटलं की आमचीही मंगळागौर आजच आहे.खरच ,
तुझिया छायेत आम्हा कमी काही नाही ......
सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल उधळीतो...

Monday, August 22, 2011

पुणे झाले हो पुण्यक्षेत्री.....नंदाई च्या चरण स्पर्शी,


                            "पुणे झाले हो पुण्यक्षेत्री ,नंदाई च्या चरण स्पर्शी,
                           वात्सल्याची हो जननी ,अन्नपूर्णा हो अवतरली,
                       पुणे झाले हो पुण्यक्षेत्री , नंदाई च्या चरण स्पर्शी,
                           कृष्णाची हो तू राधा, अनिरुद्दाची हो तू नंदा,
                          बाप्पा समेत आली माझी आई ग स्वप्नगंधा
                     आत्मबलाच्या साख्यना दिलेस ग अमृत वाणी,
                       तुझे एक एक शब्द ग आम्हास कल्यणकारी,
                        पुणे झाले हो पुण्यक्षेत्री, नंदाई च्या चरण स्पर्शी"..........



परम्पूज्य नंदाई काळ म्हणजेच दि , २२ ऑगस्ट  २०११ ला पुण्यात आत्म्बल च्या सख्यना मार्गदर्शन करण्यासाठी
गेली होती, त्यावेळी काढलेले हे काही फोटोस .
                                                      ARRIVAL OF THE NANDAI
                                                   SWAGATAM.. SUSWAGATAM..
                                                  WELCOME AAI TO PUNE
                               BLESSINGS BY PARAMPOOJYA NANDAI TO HER CHILDRENS
                                            AAI WAS VERY EXCITED TO SEE HER VEERA'S 
                    ARRIVAL ON THE STAGE, WITH THE VIBRATION OF SHANKH NAAD
                              ALL SHRADDHWAN SINH AND VEERAS , TAKING DARSHAN
                                                  A POWERPOINT PRESENTATION
                                             PAURASSINH WHILE DISCUSSING 
 पुणे झाले हो पुण्यक्षेत्री नंदाई च्या चरण स्पर्शी , पुणे झाले हो पुण्यक्षेत्री  नंदाई च्या चरण स्पर्शी...




Paurassinh's Guidance to 125 Young Shraddhaavaans of Pune

FACEBOOK POSTING BY VAIBHAVSINH KARNIK.
Hariom dear Friends !!!  It was a privilege  to be in Pune today and witness our Paurassinh address a young energetic shraddhaavaan group of our Pune Upasana Kendra. He addressed a group of about 125 enthusiastic computer savy youngsters. He explained them how to use the computer technology more efficiently and in a better way. He explained them with various examples how P.P Bapu explained the importance of computers. He explained everyone the use and importance of Social networking. Shreeram. The details of his talk will be uploaded soon. I am sharing some photographs with you. This is the first ever talk of Paurassinh infront of such a gathering. SHREERAM to Him and our beloved P.P Bapu, Nandaai, Suchitdada and Samirdada.

Paurassinh in discussion with our Shraddhaavaan Group

Attentive Group listening to PaurassinH

Some important points being discussed by Paurassinh


Paurassinh engrossed in the Talk
Paurassinh clearing doubts of the audience



Friday, August 19, 2011

श्री गुरूक्षेत्रम् मध्ये साजरा होतोय ३ दिवस दत्तयाग

FACEBOOK POSTING BY PAURAS SINH                                                 
  हरिओम
आज पासून म्हणजेच दि १९ ऑगस्ट २०११ पासून स्वप्नीलसिंह दत्तोपाध्ये दत्तयाग पूजन श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम्
,खार , {बापूंच्या घरी} करणार आहेत. हा ३ दिवसीय दत्तयाग दर वर्षी आमच्या {बापूंच्या} घरी २ वेळा केला जातो. एक स्वप्नीलसिंह  करतात व दुसरा मी {पौरससिंह}.त्याच बरोबर दर २ महिने १ दिवसीय दत्तयाग पण केला जातो. ह्या दत्तायागाचे फोटोस लवकरच अपलोड केले जाणार आहेत. दत्तयाग हा एक अभूतपूर्व असा दिन आहे, दत्तायागासाठी ११ पुरोहितांचे जप मध्ये , परमपूज्य बापू, नंदाई, सूचितदादा व संपूर्ण परिवार आपला वेळ ह्या
दत्तयागसाठी देत होते. त्याच बरोबर ह्या वर्षी २ नवचंडी याग श्री अनिरुद्ध गुरुशेत्र्म येथे होणार आहे एक याग ७ व्या 
मजल्यावर{घरामध्ये}व दुसरा गुरुशेत्र्म मध्ये खाली. जेणेकरून सर्वाना दर्शन घेता येईल.

Wednesday, August 17, 2011

१५ ऑगस्ट ध्वजारोहण समारंभ

नुकताच आपला भारताचा ६४ वा स्वातंत्र्य दिन श्री अनिरुद्ध गुरुशेत्र्म ,खार येथे मोठ्या भक्तिभावाने,व परेड नि संपन्न झाला ह्यावेळी परमपूज्य नंदाई स्वतः ध्वज ला सलामी देण्यासाठी आलेल्या, तसेच डॉ. पौरससिंह ह्यांनी ध्वजरोहण केले. परेड टीम नि आधी दत्त्बाप्पा, मग मोठी आई , मग बापू, मग ध्वज व नंतर परमपूज्य नंदाईला सलामी दिली त्यावेळी कवर केलेला हा VIDEO .....
source via {manasamarthyadata.com}

श्री साई सत्‌चरित पंचशील परिक्षा ऑगस्ट 2011

श्री साई सत्‌चरित पंचशील परिक्षा, ऑगस्ट २०११ - प्रश्नपत्रिका


सुचना - मराठी


INSTRUCTIONS IN MARATHI OF EXAM


प्रश्नपत्रिका भाग - १


QUESTION PAPER PAGE 1


प्रश्नपत्रिका भाग - २



QUESTION PAPER PAGE 2


प्रश्नपत्रिकेसाठी वरील लिंक वर क्लिक करावे.
प्रश्न्पत्रीकेलीये उपर दिये हुये लिंक पर क्लिक करो.
FOR QUESTIONPAPER CLICK ON ABOVE LINK.

Monday, August 15, 2011

आईच प्रॉमिस!!!


आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परेड DMV's ना आईला भेटण्याची संधी मिळाली.परेडसंबंधी आईने मार्गदर्शनही केले.त्यावेळी सर्वांनी आईला १५ ऑगस्टला परेडला येण्याचा हट्ट केला.त्यावर आई म्हणाली-"बाळांनो,अस कधी होईल का कि बाळ परेड करतायत आणि आई आरामात बसलीय.पण जेव्हा आई खाली परेड बघायला येत नाही त्यावेळी आईच नक्कीच दुसर काहीतरी खूप महत्वाच काम असत.पण यावेळी तास काही काम नसेल तर मी नक्की येईन." आईचे हे प्रोमीस म्हणजे सर्व परेड  DMV's ना एक नवीन स्फूर्ती होती.आणि मग सगळे आपापल्या मनात  त्या दिवसाची कल्पना करू लागले.
               अखेर तो १५ ऑगस्टचा दिवस उजाडला.सकाळी ठरलेल्या वेळी "श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम" बाहेर प्रत्येकजण रिपोर्टिंग करत होता आणि प्रत्येकाला एक सुखद धक्का मिळत होता.कारण सर्व बाळांच्या आधी आईनेच रिपोर्टिंग केलेलं होत.आई गुरुक्षेत्रममध्ये बसली होती आणि सर्वांबरोबर  हनुमान चलिसा म्हणत होती.अधून मधून बाहेर परेडसाठी ची तयारीही न्याहाळत होती.आणि बाळांकडे बघून मंद हास्यही करत होती.
                परेडची सर्व पूर्वतयारी झाली.आणि हनुमान चलिसा पठणाला काही वेळासाठी विश्रांती देण्यात आली.आई गुरुक्षेत्रम मधून बाहेर आली.आईने मस्तपैकी आपल्या साडीवर देशाचा झेंडा लावून घेतला.तेवढ्यातच दोनही गार्डस  डॉ.पौरससिंह ना झेंड्याकडे घेऊन आले.तशी आईदेखील हेंपी होम च्या दारात येऊन उभी राहिली.ध्वजारोहण झाल्यावर सर्वांबरोबर आईनेही राष्ट्रध्वजाला कडक सलामी दिली व राष्ट्रगीत म्हटले.त्यानंतर प्रतिज्ञा झाली.आणि मग २१८ DMV'स ची ती परेड सुरु झाली.प्रत्येक प्लाटूनला राष्ट्राध्वजाजवळ येताच "दैने देख........."ची कमांड मिळत होती.आणि त्यावेळी जो आनंद होता ना तो खरच अवर्णनीय होता.कारण दैने देख केल्यावर पहिली सलामी दिली जात होती ती गुरुक्षेत्रमला,  आपल्या मोठ्या आईला ....आपल्या दत्ताबाप्पाला........मग राष्ट्रध्वजाला ,,,,,,,,,आणि मग ,,,,,,,,आणि मग,,,,,,,,,,आपल्या लाडक्या नंदाआईला.
आई प्रचंड कौतुकाने परेड करणारया प्रत्येक बाळाकडे पाहत होती.तो एकच क्षण होता.काही ४-५ पावलंच होती.पण ती ४-५ पावलंच सर्व काही होती.मोठ्या आईकडून.......नंदाआईकडे प्रवास ,,,,,,आणि तेही राष्ट्रसेवा करून.
                   "आईने तिच्या बाळाना दिलेलं प्रोमीस पूर्ण केल.आता वेळ आहे आपण केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची ...... आपल्या मातृभूमीची आणि मुख्य म्हणजे आपल्या परमेश्वरी कुटुंबाची सेवा करण्याची.आणि ही सेवा करता करता त्या परमत्रयींना समर्पित होण्याची.
श्री राम"!!!


 BY SAIPRASADSINH MALVANKAR.

हनुमान चलीसा पठण

HARIOM
Hanuman Chalisa pathan has started at Shree Aniruddha Gurukshetram,
 today(15th Aug 2011).

The chanting of “Hanuman Chalisa” will take place at Shree Aniruddha Gurukshetram between Monday, 15th August, 2011 and Sunday, 21st August, 2011 between 8.00 am and 8.00 pm.

The pathan will continue till Sunday, 21st August, 2011.Timing:  Daily 8.00 am and 8.00 pm.

All bhaktas can derive the maximum benefit of the divine atmosphere by participating wholeheartedly in this Utsav.

Friday, August 12, 2011

आईच्या वाढदिवसाची धमाल...

                                                                    हरिओम 
संध्याकाळी ४.०० ला भाक्तीगंगे मध्ये उभा होतो , कसा साजरा होईल आईचा वाढदिवस ह्याचा विचार करीत, 
आणि ६.०० वाजता आत सोडला गेलं, आत आलो तशी धडधड सुरु झाली स्टेज वर तयारी सुरु होती आणि थोड्याच
वेळात स्टेज नि एका स्वर्गा प्रमाणे रूप घेतला आणि एका बाजूला एक लाल रंगाच्या पडद्यांनी मनाला चुळबुळ लावली,

आता तर नुसता काय असेल त्या पडद्याच्या मागे हेच सुचत होता, आणि थोड्याच वेळात श्रीमदपुरुषार्थ ग्रंथाचे आगमन 
झाले, आणि आत्ता नुसती नजर लागलेली ती बापू,आई च्या आगमनाची, आणि ७.३५ झाले आणि तेवढ्यात "आला रे हरी आला रे
" हे गजर सुरु झाला सगळ्यांना एक नवा जोश निर्माण झाला आणि आई,बापू दिसले आणि सर्वांनी "आई ,आई ,आई " ह्या नावाचा जय्गोश करण्यात 
सुरवात केली नुसता आई आई ह्या नावानीच हरीगुरुग्राम दुमदुमल, उपासनेनंतर , बाप्पा स्टेज वर आला हरिओम म्हटलं व बोलला कि "मी माझा प्रोमिसे पाळलंय,
आणि तेवढ्यात आपल्या संस्थेच्या "CEO" नि बाप्पाला विनंती केली कि त्याने आईला स्टेज वरती आणावे सर्व जण नुसते खुश ,कोणी शिटी वाजवत होता तर कोणी आई 

ओरडत होता, आणि आई स्टेज वर आली बाप्पासोबत , आणि नंतर स्वप्नीलसिंह व पौरस सिंह ह्यांनी तो लाल पडदा उगध्ला गेलं त्यात सुंदर असा आई असा लिहिलेला ग्रीटिंग कार्ड
होता,व आपल्या आईचा मस्त एक मोठा फोटो होता, नंतर सर्वांतर्फे आईला आपल्या "CEO" नि मोठा पुष्पगुच ज्यावर मोठ्याक्षारात फुलांनी ५० लिहिले होते ते आईला दिला,


आणि बापू बोलले कि आईला बोलायला लाऊ का ,तेच सर्व जण हो म्हणून जोरात ओरडले व टाळ्यांचा कडकडत सुरु झाला, आई बोलली श्रीराम बाळानो असाच प्रेम करत राहा सर्वांवर ,
 
आणि सर्व जण हो आई असा सर्व म्हटले , आणि तेवढ्यात "बार बार दिन ये आये,बार बार दिल ये गये आप जियो हजारो साल याही हे मेरी आरजू हैप्पी बर्थडे टू यु नंदाई ,हैप्पी बर्थडे टू यु"
नंतर बाप्पांनी  घोषणा केल्या  १} म्हणजे पुरुषांसाठी जो ड्रेस आहे तो म्हणजे सलवार कुर्ता ,शेरवानी घालायचा पण फक्त काही उत्सव वैगेरे असेल तर सेवेसाठी पण ओढणीच्या जागी आपला उपर्ण हव ,
पण जे गुरुशेत्रामचे, व जुईनगरचे कार्यकर्ते आहे त्यांनी मात्र लुंगी,सफेद शर्त, उपरणं घालायचा , हा पण काही पूजन वैगेरे असेल तर सर्व पुर्शनी सुद्धा नेहमीचा लुंगी उपरणं,सफेद शर्त घालायचा. 
आणि नंतर बाप्पा बोलला कि आजच्या दिवशी मी तुम्हाला जो आवडेल त्या गजरावर्ती नाचण्याची मुभा देतो, मग काय सर्व आनंदात, मग एक एक गजर सुरु झाले बापू पण चांगली साथ देत होते मग साई आरती झाली,

आणि मग दर्शन सुरु... खरच आई बोलत असताना मातृत्वाचा पूस संपूर्ण हरीगुरुग्राम मध्ये पसरला होता... हा क्षण खरच अविस्मरणीय राहणार आहे हे नक्कीच. 
                                                              हरिओम 

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected