जरी मी पुण्यात साजरा झालेल्या रिंगण सोहळ्यात प्रत्यक्षात नव्हतो पण, कालचा लेख वाचून आपण हि तिथे आहोत ह्याची जाणीव झाली खरच किती आगळा वेगळा असा हा सोहळा. हि माझ्यामते अनिरुद्ध एकादशी साजरी झालीय.... खरच तो सावळा विठ्ठल अनिरुद्ध नक्कीच तिथे आलेला ह्यात शंका नाही. आपल्यासर्वाना एक अभंग माहिती असेल "अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर " ह्यात मला जरा बदल करावासा वाटतो ह्या रिंगण सोहळ्यासाठी . तो असा........
"अवघे गर्जे पुणेनगर चालला अनिरुद्धचा गजर,
अवघे गर्जे पुणेनगर चालला हरिनामाचा गजर....
भाव ह्याच्या ध्यानी मनी ,
अवघी दुमदुमली पुणेनगरी ,
वैष्णव संगे ,भक्त नाचती, अनिरुद्धच्या चरणी........
अवघे गर्जे पुणेनगर चालला अनिरुद्धचा गजर"
अश्या काही तोडक्या-मोडक्या शब्दात मला जे सुचलाय ते मी लिहिलंय.. बाकी सांभाळून घे रे....
तर ह्या रिंगण सोहळ्यात नुसते वयस्कर नसून प्रौड तसेच लहान मुलं-मुली सुद्धा विठू नामाच्या गजरात दंगले होते..... त्या क्षणाचे काही फोटोस फेसबुक वरील पुण्याचे सिंह-वीरा ह्या ग्रुप मधले मी इथे दाखवत आहे.
चालला नामाचा गजर................
अवघी दुमदुमली पुणे नगरी ...........
दिंड्या पताका वैष्णव नाचती.......
सूचितवरदे हारे विठल जय जय अनिरुद्ध नंदाई......
तुझे नाम गोड किती ,तुझे गुण गाऊ किती...
बापू माझा, बापू माझा, विठ्ठल सावळा , त्याने मला
लावियेला लळा...............
No comments:
Post a Comment