Sunday, August 28, 2011

पुण्यात साजरा होतोय रिंगण सोहळा


FACEBOOK POSTING BY GIRISH KARULKAR.
हरि ओम ... 
 "या पुण्य नगरीत | काय वाजत गाजत ... काय वाजत गाजत ... या भक्ताच्या मेळ्यात | अनिरुद्ध नाचत डोलत..." काल दिनांक २७ ऑगस्ट २०११ रोजी  पुणे उपासना केंद्रात (Modern Highschool) शिशु विद्या मंदिर येथील  शनिवारच्या उपासनेसाठी असलेल्या ......आणि Modern Highschool च्या मागील बाजूस हेडगेवार सभागृहातील घोराकाष्ट्तोद्धारण पठण कक्षात असलेल्या....... अशा दोन्ही ठिकाणाहून सदगुरू बापूंच्या चिन्मय पादुकांचे निर्गमन एका आगळ्या वेगळ्या अशा भक्तिमय रिंगण सोहळ्याने झाले... 
                                  "जय जय राम-कृष्ण-हरि" च्या गजरात बापू भक्तांच्यासह  २ दिंड्या दोन्ही बाजूंनी निघाल्या .. ..  या दोन्ही दिंड्या टाळ, चिपळ्या आणि मृदंगाच्या गजरात पुढे सरसावत Modern Highschool  येथील मुख्य पटांगणात एकत्र आल्या .....   "जय जय राम-कृष्ण-हरि" चा गजर .... सोबात गरजणारे टाळ, चिपळ्या आणि मृदंग .... एकीकडे होणारा पवित्र असा शंख नाद .... वाजणाऱ्या तुताऱ्या ....  सदगुरू अनिरुद्ध बापूंच्या २ चिन्मय पादुका ... त्याभोवती दिंड्या.. ....भगव्या-पताका.... सुंदर अब्दागिरी... संस्थेचे ध्वज घेत पुणे उपासना केंद्रातील सर्व  कार्यकर्ते तसेच बापू भक्तांनी गजराचा ठेका साधत फेर धरला ...  आणि नेमक्या त्याच वेळी सत्संगाच्या मंडळींनी"विठोब्बा  रखुमाई जय जय.....विठोब्बा  रखुमाई......." चा गजर सुरु केला...
                                                                            रिंगणाच्या मधोमध  सदगुरू अनिरुद्ध बापूंच्या २ चिन्मय पादुका... टाळ, चिपळ्या आणि मृदंगाचा जयघोष.... सन्मानाने उंचावणारे ध्वज ... भगव्या पताका ...  मनामध्ये लाडका बापुराया आणि मुखात हरिनामाचा  गजर......अशा अत्यंत सुंदर भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळा सुरु झाला....  अगदी लहान मुलांपासून ते सगळे तरुण, मध्यम वयीन तसेच जुनी जाणती अशी वयस्कर मंडळींची पावल सुद्धा  आपोआप फेर धरू लागली..... "विठोब्बा  रखुमाई जय जय विठोब्बा  रखुमाई"..... ... "दत्ता दिगाम्बाराया हो बापू मला भेट द्या हो" ......   "विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला " ....... "जय हरि विठ्ठल श्रीहरी विठल".....   "सुचीत्दा वरदे  हारी बापू जय जय अनिरुद्ध नंदाई" .....    अशा एका मागून एक अशा गजरांची शृंखला सुरु झाली आणि पुणे उपासना केंद्रात जणू पवित्र हरिनामाचा अखंड स्त्रोत घेऊन भक्ती गंगाच अवतरली ....
                                                                       "टाळ घोष कानी येती .. ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ....पांडुरंगी नाहले हो पुण्यनगरी तीर.......  या  रिंगण सोहोळ्यात एक प्रकारचा पवित्र असा maganetic force अगदी प्रत्येकाला जाणवत होता ...... प्रत्येक भक्त "त्या"   पांडुरंगाशी ...  इतका मनोभावे जोडला गेला होता..कि परम पूज्य आई, बापू आणि दादांचे अस्तित्व तिथे आहेच ... हे प्रत्येकाला जाणवत होतं...... प्रत्येक भक्त गजरात तल्लीन झाला होता....  प्रपंच ...दुखः..संकट... अडचणी .. वेदना .. सगळ्या सगळ्याचा विसर पडला होता.... प्रत्येकाची मनस्थिती जणू "देव दिसे ठाई ठाई ... भक्त लीन भक्तापायी... सुखालागी आला या हो... आनंदाचा पूर" ...   अशी झाली होती
                             हा रिंगण सोहळा कधी संपूच नये असा प्रत्येकाला वाटत होतं...... परंतु अखेरीस "अवघा रंग एक झाला.." आणि अनिरुद्ध माऊलीचं प्रेम आपल्या हृदयात साठवत सर्व भक्तांनी पुन्हा एकदा  "जय जय राम-कृष्ण-हरि" च्या गजरात सदगुरू बापूंना निरोप दिला.... मित्रांनोखरच सांगतो.... सदगुरू बापूंना निरोप देताना प्रत्येकाच्या .. अगदी खरंच प्रत्येकाच्या मुखी हरिनाम ...  नयनात सद्गुरूंच्या आठवणीने दाटलेले प्रेमाचे अश्रू आणि हृदयात "अनिरुद्धराम" अतिशय शांतपणे स्थिरावला होता !!!!! 
या रिंगण सोहळ्याचे फोटो पाहूया पुढील भागात.......  

No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected