आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परेड DMV's ना आईला भेटण्याची संधी मिळाली.परेडसंबंधी आईने मार्गदर्शनही केले.त्यावेळी सर्वांनी आईला १५ ऑगस्टला परेडला येण्याचा हट्ट केला.त्यावर आई म्हणाली-"बाळांनो,अस कधी होईल का कि बाळ परेड करतायत आणि आई आरामात बसलीय.पण जेव्हा आई खाली परेड बघायला येत नाही त्यावेळी आईच नक्कीच दुसर काहीतरी खूप महत्वाच काम असत.पण यावेळी तास काही काम नसेल तर मी नक्की येईन." आईचे हे प्रोमीस म्हणजे सर्व परेड DMV's ना एक नवीन स्फूर्ती होती.आणि मग सगळे आपापल्या मनात त्या दिवसाची कल्पना करू लागले.
अखेर तो १५ ऑगस्टचा दिवस उजाडला.सकाळी ठरलेल्या वेळी "श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम" बाहेर प्रत्येकजण रिपोर्टिंग करत होता आणि प्रत्येकाला एक सुखद धक्का मिळत होता.कारण सर्व बाळांच्या आधी आईनेच रिपोर्टिंग केलेलं होत.आई गुरुक्षेत्रममध्ये बसली होती आणि सर्वांबरोबर हनुमान चलिसा म्हणत होती.अधून मधून बाहेर परेडसाठी ची तयारीही न्याहाळत होती.आणि बाळांकडे बघून मंद हास्यही करत होती.
परेडची सर्व पूर्वतयारी झाली.आणि हनुमान चलिसा पठणाला काही वेळासाठी विश्रांती देण्यात आली.आई गुरुक्षेत्रम मधून बाहेर आली.आईने मस्तपैकी आपल्या साडीवर देशाचा झेंडा लावून घेतला.तेवढ्यातच दोनही गार्डस डॉ.पौरससिंह ना झेंड्याकडे घेऊन आले.तशी आईदेखील हेंपी होम च्या दारात येऊन उभी राहिली.ध्वजारोहण झाल्यावर सर्वांबरोबर आईनेही राष्ट्रध्वजाला कडक सलामी दिली व राष्ट्रगीत म्हटले.त्यानंतर प्रतिज्ञा झाली.आणि मग २१८ DMV'स ची ती परेड सुरु झाली.प्रत्येक प्लाटूनला राष्ट्राध्वजाजवळ येताच "दैने देख........."ची कमांड मिळत होती.आणि त्यावेळी जो आनंद होता ना तो खरच अवर्णनीय होता.कारण दैने देख केल्यावर पहिली सलामी दिली जात होती ती गुरुक्षेत्रमला, आपल्या मोठ्या आईला ....आपल्या दत्ताबाप्पाला........मग राष्ट्रध्वजाला ,,,,,,,,,आणि मग ,,,,,,,,आणि मग,,,,,,,,,,आपल्या लाडक्या नंदाआईला.
आई प्रचंड कौतुकाने परेड करणारया प्रत्येक बाळाकडे पाहत होती.तो एकच क्षण होता.काही ४-५ पावलंच होती.पण ती ४-५ पावलंच सर्व काही होती.मोठ्या आईकडून.......नंदाआईकडे प्रवास ,,,,,,आणि तेही राष्ट्रसेवा करून.
"आईने तिच्या बाळाना दिलेलं प्रोमीस पूर्ण केल.आता वेळ आहे आपण केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची ...... आपल्या मातृभूमीची आणि मुख्य म्हणजे आपल्या परमेश्वरी कुटुंबाची सेवा करण्याची.आणि ही सेवा करता करता त्या परमत्रयींना समर्पित होण्याची.
श्री राम"!!!
BY SAIPRASADSINH MALVANKAR.
shreeram awesome
ReplyDeleteshreeram kedarsinh ! thanks for sharing saiprasadsinh. really aai kept her promise .
ReplyDelete