Wednesday, March 9, 2011

आता श्री कंठ्कूप पाषाण पूजन भारताबाहेर सूध्दा करता येणार ...


हरि ओम
सर्वत्र कंठ्कूप पाषाण पूजने सुरु झाली आणि उभ्या आसमंतात या आपल्या मोठ्या आईचा गजर दुमदुमू लागला. प्रत्येकाचीच या आपल्या आईला घरी आणण्याची कोण घाई झाली कि बस्स् ! पण या सगळ्यांमध्ये काही जण मात्र हिरमुसलेले होते, आपल्या नशिबी हे भाग्यच नाही म्हणून स्वताला कोसत होते, का मी एवढा सातासमुद्रापार बापूपासून दूर आलो याबद्द्ल खंत करत होते कारण भारतामध्ये सगळीकडे या मोठ्या आईची धूम चालू होती आणि या आपल्या भारताबाहेरच्या श्रध्दावानांना मात्र आपल्या या मोठ्या आईच्या पूजनाची संधी मिळत नव्हती. एवढ्या एकाच कारणासाठी फक्त भारतात येणे जमणारे नव्हते, काहींना ते परवडणारे पण नव्हते. तसेच श्री वरदाचण्डीका प्रसन्नोत्सवासाठी सुट्टी राखून ठेवल्यामुळे आता सुट्टी घेणेही शक्य नव्हते.

काय करावे काहीच कळत नव्हते. पण स्वस्थ बसून काही होणार नव्हते, अनेकांनी मला या फेसबुकच्या माध्यमातून तसेच पौरससिंह, वैभवसिंह यांना याबाबत काही करता येऊ शकेल का ते विचारले, किंबहूना त्यांच्या अशा messages चा नवीन inbox तयार झाला. आम्ही सगळ्यांनी समीरदादांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी घातल्या. व समीरदादांनी बापूंशी बोलून काहीतरी मार्ग काढ्ण्याचे आश्वासन दिले.
हे सगळे जसे काही त्या प्रेमळ, कृपाळू, भक्तकनवाळू बापूंना माहीतच नव्ह्ते असे नव्हते पण त्याला असा खेळ खेळायला खूप आवडते. खरतर सर्व काही आधीच ठरवून ठेवलेले असते आणि आपली गंमत बघण्यात, त्याच्यासाठी चाललेली धावपळ करण्यात तो आपल्या नकळत आपणाकडून अनेक गोष्टी करून घेत असतो. तर अशा या बापूमाऊलीने आमच्या सर्व योजनांना होकार दिला.

त्यामूळे आता श्री कंठ्कूप पाषाण पूजन भारताबाहेर सूध्दा करता येणार. या तुमच्या लाडक्या बापूंनी तुमच्या हाकेला प्रतिसाद देऊन आपल्या लाडक्या आईला तुमच्याकदे पाठविलेले आहे चला तर मग वाचत काय बसलाय तयारीला लागा.

१) यासाठी काहीही मदत हवी असल्यास आमच्यापैकी कोणाशीही तुम्ही संपर्क करु शकता.
२) जर तुमच्यापैकी कोणी मुम्बईवरुन तिकडे येणार असेल तर आम्ही त्याच्याकडे कंठ्कूप पाषाण देऊ शकतो. त्यांनी हैप्पी होमशी संपर्क साधावा.
३) जर तुमच्यापैकी कोणी इथे येऊन कंठ्कूप पाषाण घेऊन जाऊ शकत असेल तर त्यांनी हैप्पी होमशी संपर्क साधावा.
४) जर हे शक्य नसेल तर आम्ही कंठ्कूप पाषाण कुरीयर करु शकतो फक्त तुम्ही शक्यतो त्यासाठी लागणार्‍या सर्व आवश्यकतेची पूर्तता करावी.
५) ह्यापेक्षाही इतर उपाय तुमच्याकडे असतील तर ते आम्हाला कळवावे त्याद्वारे आम्ही कंठ्कूप पाषाण आपल्या येथे पाठवायची व्यवस्था करू.

खरच आपण खूप भाग्यवान आहोत म्ह्णूनच बापूंनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. चला तर मग आपल्या मोठ्या आईच्या स्वागताची तयारी करुया.

Tuesday, March 8, 2011

श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशनला महिंद्रा फायनान्सतर्फे रुग्णवाहिका .


हरि ओम



श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशन या आपल्या संस्थेला महिंद्रा फायनान्स या कंपनीतर्फे त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉनसिबीलीटी या उपक्रमाअंतर्गत नवी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. बापूंच्या मार्गदर्शनाखाली श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशन या संस्थेमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. विरार, वसई या भागात राबवले जाणारे मेडीकल कैम्प, दरवर्षी कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात होणारा मेडीकल कैम्प याच बरोबर मुंबईत गरीब व गरजू लोकवस्तीत होणारे मोबाईल मेडीकल कैम्प यासाठी या रुग्णवाहिकेचा खरच खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे.

                         
महिंद्र फायनान्स या कंपनीतर्फे श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशला चेक देताना



महिंद्र फायनान्स या कंपनीतर्फे श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशला चावी देताना
                         
महिंद्र फायनान्स व श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशला याच्यातर्फे रुग्णवाहिकेचे उद्घाटन झाले




श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी श्री. सुनीलसिंह मंत्री यांनी महिंद्रा फायनान्सच्या व्यवस्थापकीय संचालक रमेश अय्यर व वरीष्ठ उपाध्यक्ष विनय देशपांडे यांच्याकडून महींद्रा टावर्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमात या रुग्णवाहिकेच्या चाव्या स्विकारल्या.

समाजात आपल्या संस्थेचे निष्काम भक्तीमय मार्गाने जे प्रचंड काम चालू आहे त्याची दखल अशा प्रकारच्या कॉर्पोरेट कंपन्यासुध्दा घेऊ लागल्या आहेत हे खूप महत्वाचे.  यावरुन आपल्याला आपल्या संस्थेच्या बापूंच्या मार्गदर्शनाखाली चालणार्‍या या विवीध सेवाकार्याचा अंदाज येतो आणि नकळत आपलेही बाहू स्फूरण पावू लागतात या प्रचंड सेवाकार्यात खारीचा वाटा घेण्यासाठी..... 





श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशच्या ऑफिसमध्ये रुग्णवाहिकेचे आगमन ..
posted by swapnil dattopadhye in facebook

Monday, March 7, 2011

HAPPY WOMANS DAY

आज आठ मार्च जागतिक महिला दिन , माझी आई ह्या ब्लॉग वर कही दिवस चेक केला नहीं  पण आज फ्री होतो म्हणून चेक केला ,
तर चार पाच जनांचे मेसेज आलेले की केदारसिंह ह्या ब्लॉग वर महिला दिनाचा काहीतरी अपडेट करा म्हणून , पण माझी महिला ह्या 
विशायावर्ती बोलण्याची ही पहिलीच वेळ . असो तरी पण महिला दिनाच्या दहा दिवस अगोदर मी एक कार्यक्रमात गेलेलो तिथे महिलांनी 
अगदी आम्हा पुर्षाना लाजवेल असे नाटक केलेला ,, खरच स्त्री हे एक असा व्यक्तिमत्व आहे की जिच्या बद्दल बोलण पुरत नहीं.
आत्मबल केंद्रात जशी नंदाई आपल्या सख्यान्ना जिव पण तशीच धाक दाखवते ,, व जशी माया करते तय दिवसाला महिला दिन म्हणावा असा 
माला वाटत ..... नंदाई चे शब्द , म्हणजे अम्रुतापेक्षा आधिक गोड.....  प्रत्यक्षा मधील वीरांगना हा लेख वाचला व माला खुप आवडला ...
तसच रेश्मावीरा च्या आल्हदिन्ये वर्ती अपलोड केलेला लेख पण आवडला, पण प्रत्येकन्ने हे एक लक्षात ठेवले पाहिजे की जसा अपन महिला दिनाला
स्त्रीला मान देतो, तसा तो इतर वेळी पण दिला पाहिजे . कारण स्त्री जी एक शक्ति आहे जी गरज पडल्यास आपल्या पतीला आईची माया देऊ शकते,
तसा दूसरा कोणीही देऊ शकत नहीं.... माझ्या तोडक्या मोडक्या शब्दत मी महिला दिनाविशायी बोललो कही चुकला असेल तर माफ़ करा ...
फक्त पुरुषांनी एक लक्षात ठेवावा की ," स्त्री हे नर्काचे द्वार नसून,परस्त्री हे नर्काचे द्वार आहे"
निदान आज तरी आपल्या घरातल्या स्त्री साथी , आई साथी, मुलीसाठी जाताना एखादा ग्रीटिंग किव्वा एक फूल घेउन अवश्य जा..
                          महिला दिनाच्या अन्निरुद्ध शुभेच्चा !!

                                                                                                 - केदारसिंह मदन 

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected