हरि ओम
श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशन या आपल्या संस्थेला महिंद्रा फायनान्स या कंपनीतर्फे त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉनसिबीलीटी या उपक्रमाअंतर्गत नवी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. बापूंच्या मार्गदर्शनाखाली श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशन या संस्थेमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. विरार, वसई या भागात राबवले जाणारे मेडीकल कैम्प, दरवर्षी कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात होणारा मेडीकल कैम्प याच बरोबर मुंबईत गरीब व गरजू लोकवस्तीत होणारे मोबाईल मेडीकल कैम्प यासाठी या रुग्णवाहिकेचा खरच खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे.
श्री अनिरुध्द उपासना फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी श्री. सुनीलसिंह मंत्री यांनी महिंद्रा फायनान्सच्या व्यवस्थापकीय संचालक रमेश अय्यर व वरीष्ठ उपाध्यक्ष विनय देशपांडे यांच्याकडून महींद्रा टावर्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमात या रुग्णवाहिकेच्या चाव्या स्विकारल्या.
समाजात आपल्या संस्थेचे निष्काम भक्तीमय मार्गाने जे प्रचंड काम चालू आहे त्याची दखल अशा प्रकारच्या कॉर्पोरेट कंपन्यासुध्दा घेऊ लागल्या आहेत हे खूप महत्वाचे. यावरुन आपल्याला आपल्या संस्थेच्या बापूंच्या मार्गदर्शनाखाली चालणार्या या विवीध सेवाकार्याचा अंदाज येतो आणि नकळत आपलेही बाहू स्फूरण पावू लागतात या प्रचंड सेवाकार्यात खारीचा वाटा घेण्यासाठी.....
No comments:
Post a Comment