Wednesday, March 9, 2011

आता श्री कंठ्कूप पाषाण पूजन भारताबाहेर सूध्दा करता येणार ...


हरि ओम
सर्वत्र कंठ्कूप पाषाण पूजने सुरु झाली आणि उभ्या आसमंतात या आपल्या मोठ्या आईचा गजर दुमदुमू लागला. प्रत्येकाचीच या आपल्या आईला घरी आणण्याची कोण घाई झाली कि बस्स् ! पण या सगळ्यांमध्ये काही जण मात्र हिरमुसलेले होते, आपल्या नशिबी हे भाग्यच नाही म्हणून स्वताला कोसत होते, का मी एवढा सातासमुद्रापार बापूपासून दूर आलो याबद्द्ल खंत करत होते कारण भारतामध्ये सगळीकडे या मोठ्या आईची धूम चालू होती आणि या आपल्या भारताबाहेरच्या श्रध्दावानांना मात्र आपल्या या मोठ्या आईच्या पूजनाची संधी मिळत नव्हती. एवढ्या एकाच कारणासाठी फक्त भारतात येणे जमणारे नव्हते, काहींना ते परवडणारे पण नव्हते. तसेच श्री वरदाचण्डीका प्रसन्नोत्सवासाठी सुट्टी राखून ठेवल्यामुळे आता सुट्टी घेणेही शक्य नव्हते.

काय करावे काहीच कळत नव्हते. पण स्वस्थ बसून काही होणार नव्हते, अनेकांनी मला या फेसबुकच्या माध्यमातून तसेच पौरससिंह, वैभवसिंह यांना याबाबत काही करता येऊ शकेल का ते विचारले, किंबहूना त्यांच्या अशा messages चा नवीन inbox तयार झाला. आम्ही सगळ्यांनी समीरदादांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी घातल्या. व समीरदादांनी बापूंशी बोलून काहीतरी मार्ग काढ्ण्याचे आश्वासन दिले.
हे सगळे जसे काही त्या प्रेमळ, कृपाळू, भक्तकनवाळू बापूंना माहीतच नव्ह्ते असे नव्हते पण त्याला असा खेळ खेळायला खूप आवडते. खरतर सर्व काही आधीच ठरवून ठेवलेले असते आणि आपली गंमत बघण्यात, त्याच्यासाठी चाललेली धावपळ करण्यात तो आपल्या नकळत आपणाकडून अनेक गोष्टी करून घेत असतो. तर अशा या बापूमाऊलीने आमच्या सर्व योजनांना होकार दिला.

त्यामूळे आता श्री कंठ्कूप पाषाण पूजन भारताबाहेर सूध्दा करता येणार. या तुमच्या लाडक्या बापूंनी तुमच्या हाकेला प्रतिसाद देऊन आपल्या लाडक्या आईला तुमच्याकदे पाठविलेले आहे चला तर मग वाचत काय बसलाय तयारीला लागा.

१) यासाठी काहीही मदत हवी असल्यास आमच्यापैकी कोणाशीही तुम्ही संपर्क करु शकता.
२) जर तुमच्यापैकी कोणी मुम्बईवरुन तिकडे येणार असेल तर आम्ही त्याच्याकडे कंठ्कूप पाषाण देऊ शकतो. त्यांनी हैप्पी होमशी संपर्क साधावा.
३) जर तुमच्यापैकी कोणी इथे येऊन कंठ्कूप पाषाण घेऊन जाऊ शकत असेल तर त्यांनी हैप्पी होमशी संपर्क साधावा.
४) जर हे शक्य नसेल तर आम्ही कंठ्कूप पाषाण कुरीयर करु शकतो फक्त तुम्ही शक्यतो त्यासाठी लागणार्‍या सर्व आवश्यकतेची पूर्तता करावी.
५) ह्यापेक्षाही इतर उपाय तुमच्याकडे असतील तर ते आम्हाला कळवावे त्याद्वारे आम्ही कंठ्कूप पाषाण आपल्या येथे पाठवायची व्यवस्था करू.

खरच आपण खूप भाग्यवान आहोत म्ह्णूनच बापूंनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. चला तर मग आपल्या मोठ्या आईच्या स्वागताची तयारी करुया.

1 comment:

  1. HARIOM VERYYYYYY GREAT NEWSS!!!
    AAPLA BAPPA APLYA LEKRUNSATHI KAY KAY KARTO NAA

    ANI AAPLI MOTHI AAI TAR PRATYEKACHI ICCHA PURN KARTEYY

    KEDARSINH DUE TO YOUR BLOG AMHALA EK EK NEWS UPDATES AIKAYLA BHETAYET .. GOOD WORK HARIOM

    ReplyDelete

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected