सांगलीकर
व पश्चिम महाराष्ट्रातील श्रध्दावान बापूभक्त तर अक्षरशः बापूंच्या
आगमनाचे तास मोजायला लागले असतील एव्हाना. २७ एप्रिलला सकाळी बापू
सांगलीच्या दौर्यावर हॅपीहोमहून निघतील. त्याच दिवशी संध्याकाळी बापू
सांगलीला पोहचतील. बापूचंते पहिलं दर्शन नक्कीच त्यांच्या श्रध्दवान
मित्रांना अत्यानंददायी तर असेलच शिवाय बापूंच पहिलं पाऊल सांगलीत पडताच
ह्या त्यांच्या मित्रांच्या आनंदाला उधाण येईल.. त्यांचा आनंद गगनात मावणार
नाही.. बापू सांगलीत १ मे पर्यंत असतील.
१)
शनिवार, २७ला आगमनासरशीच बापूंच स्वागत सांगलीतील टिळक चौकात सांगली,
मीरज, कुपवाड व जवळच्या भागांमधील श्रध्दावान बापूभक्त करणार आहेत. बापू
साधारण ५ ते ५:३०च्या दरम्यान टिळक चौकात पोहचतील.
२) त्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे रविवार, २८ एप्रिल हा दौर्यातील ‘श्रीअनिरुध्द आनंदोत्सवाचा‘ मुख्य
सोहळ्याचा दिवस असेल. ह्यादिवशी संध्याकाळी ५ वाजता बापूंचं प्रवचन होईल व
त्यानंतर २० ते २५ मिनटे गजर होतील आणि त्यानंतर सर्व श्रध्दावान
बापूभक्तांना सद्गुरुंचं दर्शन घेता येईल. हा संपूर्ण सोहळा सांगलीतील
’भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम’, खणभाग येथे पार पडेल. या
कार्यक्रमासाठी अथांग भक्तसागर बापूंचे बोल व त्यांच्या बरोबरचा प्रत्येक
क्षण साठवायला आतूर होऊन येईल ह्याची मला खात्री आहे.
३) तीसर्या दिवशी म्हणजे सोमवार, २९ एप्रिलच्या संध्याकाळी बापू स्वत: सर्व कार्यकर्त्यांबरोबर सत्संगात भाग घेतील.
४)
मंगळवार, ३० एप्रिल म्हणजेच चौथ्यादिवशी दुपारी श्रीरेवणनाथ ह्यांचे स्थान
म्हणजेच श्रीक्षेत्र रेवणसिध्द येथे दर्शनासाठी निघतील. विटा येथील नगर
परिषदेने बापूंना आग्रहाचे आमंत्रण दिले आहे. ह्या आमंत्रणाचा मान राखून
बापू श्रीरेवणसिध्दला जातानाच विटा येथेही सदिच्छा भेट देतील.
श्रीरेवणसिध्दहून दर्शन आटोपून येताना बापू विटा येथे तेथील आमदार
मा. श्री. सदाशिवभाऊ पाटील व माजी-नगराध्यक्ष व नगरसेवक मा. श्री. वैभव
पाटील यांच्या आमंत्रणाने ’आदर्श इंस्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी ऍन्ड रीसर्च
सेंटरला’ देखील सदिच्छा भेट देणार आहेत.
५)
शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवार, १ मे २०१३ला बापूं श्रीक्षेत्र औदुंबर येथे
श्रीदत्तगुरुंचे दर्शन घेतील. येथे श्री. वेंकटरमन दिक्षीत शास्त्री
यांच्या आमंत्रणाचा मान राखून बापू, ‘सद्गुरु स्वामी नारायणानंदतीर्थ सेवा
ट्रस्ट’ला भेट देतील.
मित्रांनो
श्रीसाईसच्चरितातील “उतू चालला आहे खजीना…” हे शब्द अक्षरश: माझा मनात
आतापासूनच नाद करु लागले आहेत. सद्गुरु बापूंची सांगली, विटा, रेवणसिध्द व
औदुंबर ह्या ठिकाणची भेट म्हणजे खरोखरच तेथील श्रध्दावान बापूभक्तांसाठी
अत्यंत मोठा खजीनाच असेल ज्याचा ठेवा ते आयुष्यभर जपतीलच; पण मुख्य म्हणजे
बापूंनाच आपल्या जीवनात उतरवून आपल्या संपूर्ण आयुष्यच सफल करुन घेण्याची
सोय ह्या पाच दिवसात त्यांच्या श्रध्दावान मित्रांसाठी बापूंनी ओतप्रोत
करुन ठेवली आहे ह्यात शंकाच नाही.
ll हरि ॐ ll
No comments:
Post a Comment