Thursday, April 4, 2013

"न्हाऊ तुझिया प्रेमे"



२६ मे २०१३च्या सत्संगाची बातमी आली आणि त्याच्याबरोबर माझा फोन, ब्लॉग, फेसबूक, सर्वच जॅम झाले. 


या अनिरुध्दांच्या प्रेमाची अफाट भक्तिगंगा सर्व कडे, तटबंद्या फोडून उचंबळून वाहू लागली आणि सर्व श्रध्दावानांकडून एकच विचारणा होऊ लागली; कुठे आहे हा सत्संग? कधी पासून पासेस मिळणार? केव्हा हा सत्संग सुरु होणार? या प्रेमळ प्रश्‍नांच्या सरबत्तीने आम्हीही तेव्हढाच वेगाने कामाला लागलो. 


तहानेने व्याकूळ झालेल्या, दर्शनाला कासावीस झालेल्या या भक्तचकोराला तो एकमेव अनिरुध्द मेघच अंबज्ञता देऊ शकतो आणि ती पहिली प्रेमधारा म्हणजे या सत्संगाचे नाव - "न्हाऊ तुझीया प्रेमे" या अनिरुध्द रायाच्या प्रेमरसात चिंब भिजून स्वत:ला विसरुन फक्त आणि फक्त त्याचेच होण्याकरीता २६ मे २०१३ रोजी बरोबर ४:०० वाजता बापूंच्या आगमनाने या सत्संगास सुरुवात होईल. ४:३० ते ६:३० व ७:०० ते ९:३० अशी दोन सत्र या सत्संगाची असतील. 

मुख्य म्हणजे या सत्संगात वहिनी म्हणे, पिपासा, पिपासा पसरली, पिपासा २, बोल बोल वाचे, यातील निवडक ४९ गाणी व अभंगांचा आस्वाद आपल्याला आकंठ पिता येणार आहे. 

अर्थातच या सत्संगांचे स्थळ व याचे Entry Passes (प्रवेश पत्रिका) हे कधी मिळणार हे नक्कीच कळवण्यात येईल.

कडक उन्हात पोळलेल्या मनोभूमीवर या अनिरुद्ध प्रेमाचा हा पहिला थेंब पडला आहे. त्या मनमोहक सुगंधाचा वास घ्या व पुढच्या थेंबाची वाट बघा कारण जो पर्यंत पिपासा लागत नाही तोपर्यंत बापू भेटत नाही.

-  समिरसिंह दत्तोपाध्ये
www.aniruddhafriend-samirsinh.com


No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected