हरिओम
आज जागतिक महिला दिन ! पण तस बघायला गेलो तर प्रत्येक दिवस हा महिला दिनच असतो . सकाळ पासून घरची कामा कॅरणारी, प्रत्येकाला काय हवं , नको ते बघणारी , आपल्या बाळच संरक्षण करणारी "आई ". स्त्री हि नेहमी अनेक भूमिकांमध्ये वावरत असते , मग आई, बहिण , पत्नी, मुलगी . तरी सुद्धा ती तिचे काम चोक पार पाडते .पण सध्या ह्या सार्वभौम भारतामध्ये "स्त्री" म्हणजे एक खेळणं असा काही विकृत प्रववृत्तीच्या पुरुषांना वाटतं . "स्त्री-भ्रूण " हत्या चे प्रमाण तर अधिकच वाढत चाललाय . व त्याच्या जोडीला , बलात्कार . आजकाल दररोज सकाळी पेपर उघडला तर एक न एक बलात्कार ची बातमी असतेच .
सकाळी कामावर गेलेली स्त्री, शाळेत गेलेली मुलगी , संध्याकाळी घरी नीट सुखरूप येईल कि नाई हि भीती प्रत्येक आई बापाला वाटायला लागलीय . माझ्या घराच्या जवळ एक शाळा आहे मी आधी बघायचो तर तिथे लहान लहान मुली शाळा सुटली कि छान बोरं ,आवळे , चिंच खात खात हसत खेळत घरी जायचे . पण आता काही वेगळाच चित्र पाहायला भेटता ज्या मुली एकत्र हसत खेळत जायच्या ग्गाप्पा मारत जायच्या त्या शाळा सुटल्यावर आपल्या आई, बाबा, किवा इतर नातेवाईकांसोबत जाताना दिस्ले. प्रत्येक स्त्रीच्या मनात भीती घर करून बसलीय .
" स्त्री- द्रौपदी" चे वस्त्रहरण त्या श्री कृष्णास पाहवेल का? नाही तो आपल्या मुलींसाठी कोणत्याही प्रसंगी येतोच . आणि तो आलाय . "अनिरुद्ध " रूपाने
स्त्री= दुर्गा आहे . तिच्यात खूप शक्ती आहेच परंतु गरज आहे ती जागृत करण्याची व ते काम आपला बापुराया , आई करत आहे .
बापूंच्या मार्गदर्शनानुसार ३ ऑक्टोबर 2० ० २ रोजी "अहिल्या संघाची " स्थापना केली . प्रत्येक स्त्रीला स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे ह्या हेतूने बापूनी स्थापना केली .
Parampoojya Nandaai In Aatmabal Class |
Annual day Of Aatmabal Annual Day ऑफ Aatmabal |
दिल्ली बलात्कार प्रकरण झाल्यानंतर तर प्रत्येक स्त्री खचून गेलेली पण आपल्या बापुरायाने तिचा अभय वरदान दिलेच .
खरच बापूंच्या वीरांनो तुम्ही बापूंच्या लेकी आहात तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही "तो" एकता समर्थ आहे तुमच रक्षण करायला फक्त गरज आहे ते त्याच्यावरच्या प्रेमाची , विश्वासाचं .
व मग खर्या अर्थाने महिला दिन साजरा करता येईल .
काही चुकल्यास क्षमस्व !
No comments:
Post a Comment