हरिओम
नुकतेच माझे १८ वय पूर्ण झाले . आणि आपल्या संस्थेने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन २० एप्रिल २०१४ रोजी केले . मला रक्तदान करावे असे वाटत तर होते पण मनात भीती पण होती कि कस होईल ? सुई दुखणार नाही ना ? पण नंतर विचार केला कि बापू असताना भीती कशाला एकदा करून तर बघू आणि त्या प्रमाणे मी माझे नाव डोंबिवली पूर्व उपासना केंद्रात नोंदवले . रक्तदान च्या आदल्या दिवशी शांत झोप घेतली आणि अखेर तो दिवस उजाडला २० /०४ /२०१४ सकाळी नेहमीची उपासना करून , जेवून बस साठी टिळक नगर ला उभं राहिलो . सर्व जण हळू हळू जमले आणि आम्ही १. ३० वाजता दुपारी निघालो बापूंची ललकारी झाली त्यानंतर आमच्या डोंबिवली केंद्राचे प्रमुखसेवक श्री . प्रकाशसिंह लेले ह्यांनी काही भक्तांचे अनुभव सांगितले , माहिती दिली आणि असं करत करत आम्ही २. ३० वाजता श्री हरीगुरुग्राम ला पोहचलो .
बस मध्येच फॉर्म भरला होता म्हणून आम्ही मुख्य गेट मधून आत गेलो . त्यानंतर आमचे रजिसत्रेशन झाले व बापूंच्या पादुकांच्या दर्शनासाठी आम्ही स्टेज वर गेलो . (रक्तदान च्या निमित्ताने ज्या स्टेज वर आपला बापुराया प्रवचन करतो त्या स्टेज वर जाण्याचे भाग्य मिळाले अंबज्ञ ) बापूंच्या त्या हसर्या तसबिरी कडे बघून तर उरलेली थोडी फार भीती पण निघून गेली आणि मनात एक विचार आला कि आपल्या रक्तदाना मुळे तो किती आनंदी झाला असेल . मग वजन मोजून , हेमोग्लोबीन चेकप केले नॉर्मल आल्यावर मग ब्लडप्रेशर चेक केले
आणि त्यानंतर रक्तदान करण्यासाठी रांगेत उभा राहिलो . लगेच माझा नंबर सेन्ट्रल हॉस्पिटल साठी लागला व त्या प्रमाणे मी त्या ठिकाणी गेलो . मला झोपायला सांगितले हातात स्पंज चा बॉल दिला आणि जोरात दाबायला सांगितला नंतर ब्लड घेण्यासाठी सुई हाताला लावली पण खरच सांगतो अजिबात काहीच जाणवले नाही , काही दुखले नाही असं वाटत होतं कि जणू सुई टोचली नाही . मना मध्ये बापूंच नामस्मरण सुरु होते अवघ्या १०-१५ मिनिटांमध्ये सुई काढण्यात आली जरावेळ पडण्यासाठी सांगितले रिलाक्स झाल्यानंतर उठायला सांगितले मी त्या नर्स ला विचारले कि नीट झाले ना तर त्या हो म्हणाली मला एवढा आनंद झाला कि आज माझ्यामुळे माझ्या बापूंच्या चेहऱ्यावर आनंद असणार , कोणत्या गरजू ला रक्त मिळणार . आपल्या संस्थेकडून मिळणारे प्रमाणपत्र बघून त्यावरचा बापुरायाचा फोटो बघून आनंद वाटला .
खरच भीती वाटण्यासारखं काहीच नाही . मनामध्ये बापूंच नाम घेतलं कि काही जाणवतच नाही . आता मात्र मी नियमित रक्तदान करणार .
बापुराया खरच किती झटतोस तू आमच्यासाठी ! तुझे प्रेम अपरंपार आहे . आम्हाला रक्तदानाचे महत्व सांगून आमच्या कडून रक्तदान करून घेतल्याबद्दल
मी अंबज्ञ आहे .
आम्ही अंबज्ञ आहोत !

Main Gate For Mega Blood Donation |

Shraddhawan's getting check for Haemoglobin |
आणि त्यानंतर रक्तदान करण्यासाठी रांगेत उभा राहिलो . लगेच माझा नंबर सेन्ट्रल हॉस्पिटल साठी लागला व त्या प्रमाणे मी त्या ठिकाणी गेलो . मला झोपायला सांगितले हातात स्पंज चा बॉल दिला आणि जोरात दाबायला सांगितला नंतर ब्लड घेण्यासाठी सुई हाताला लावली पण खरच सांगतो अजिबात काहीच जाणवले नाही , काही दुखले नाही असं वाटत होतं कि जणू सुई टोचली नाही . मना मध्ये बापूंच नामस्मरण सुरु होते अवघ्या १०-१५ मिनिटांमध्ये सुई काढण्यात आली जरावेळ पडण्यासाठी सांगितले रिलाक्स झाल्यानंतर उठायला सांगितले मी त्या नर्स ला विचारले कि नीट झाले ना तर त्या हो म्हणाली मला एवढा आनंद झाला कि आज माझ्यामुळे माझ्या बापूंच्या चेहऱ्यावर आनंद असणार , कोणत्या गरजू ला रक्त मिळणार . आपल्या संस्थेकडून मिळणारे प्रमाणपत्र बघून त्यावरचा बापुरायाचा फोटो बघून आनंद वाटला .
आपल्या संस्थेकडून मिळणारे प्रमाणपत्र |
खरच भीती वाटण्यासारखं काहीच नाही . मनामध्ये बापूंच नाम घेतलं कि काही जाणवतच नाही . आता मात्र मी नियमित रक्तदान करणार .
बापुराया खरच किती झटतोस तू आमच्यासाठी ! तुझे प्रेम अपरंपार आहे . आम्हाला रक्तदानाचे महत्व सांगून आमच्या कडून रक्तदान करून घेतल्याबद्दल
मी अंबज्ञ आहे .
आम्ही अंबज्ञ आहोत !
No comments:
Post a Comment