वैशाख पौर्णिमा उपासना
१.प्रथम एक चौरंग किंवा पाट घेवून त्यावर शाल घालावी नंतर त्यावर आपल्या सद्गुरूंचा व हनुमंताचा फोटो ठेवावा.
२.श्री सदगुरुंच्या प्रतिमेस सुगंधित किंवा प्राप्त फुलांचा हार घालावा व श्री हनुमंताच्या प्रतिमेस रुईच्या पानांचा हार घालावा.
३.दीप व अगरबत्ती लावून हाथ जोडावे व श्री सदगुरूंचे तसेच श्री हनुमंताचे ध्यान करावे.
४.त्यानंतर ११ वेळा श्री अनिरुद्ध कवच किंवा
११ वेळा श्री हनुमान चालीसा
किंवा
११ वेळा हनुमान स्तोत्र किंवा
११ वेळा श्री साईबाबांची ११ वचने
किंवा
११ वेळा श्री अनिरुद्धांची ९ वचने
किंवा
११ वेळा आदिमाता शुभनकरा स्तवन व ११ वेळा अशुभनाशिनी स्तोत्र म्हणावे.
५.त्यानंतर-
१) आंब्याच पन्ह
२) कच्च्या आंबा व भिजलेली चण्याची डाळ वाटून त्याचा प्रसाद अर्पण करावा व त्यानंतर लोटांगण घालावे.
ब्रम्हमुहूर्तावर उपासना करणे शक्य न झाल्यास दिवसभरात कधीही करणे.
"जो कोणी प्रेमाने वैशाख पौर्णिमेला हि उपासना करेल त्याच्या घरी ह्या
दिवशी सद्गुरू हनुमंताबरोबर येवून जातोच. अशी ग्वाही सदगुरू श्री
आनिरुद्धानी दिली आहे"
No comments:
Post a Comment