१६ तारीख उजाडली आणि आपल्या बाप्पाला , आईला , व मामला भेटण्याकरिता म्हणून धावपळ सुरु झाली,
आणि ट्रेन पकडून कुर्ला स्टेशन वर उतरलो, रिक्षा आणि बस साठी नेहमी पेक्षा जास्त गर्दी होती सगळे बापू भक्ताच होते रिक्षात बसल्याबरोबर
मनामध्ये आपोआप साईराम जय जय साई राम हा गजर ऐकू येऊ लागला, तशीच बाप्पाला पाहण्यासाठीची उत्सुकता वाढू लागली आणि थोड्याच वेळात रिक्षा
श्री हरीगुरुग्राम अर्थात न्यू इंग्लिश स्कूल जवळ येऊन थांबली तसतसा हरीओम हा नाद कानी येऊ लागला, व त्याला पाहण्यासाठी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण असा
तेज दिसू लागला.. लाईन मोठी होती .. लाईनीत उभा राहून कोणी जप म्हणत होता तर कोणी अंज्नामाता वही लिहित होता .. हळू हळू लाईन पुढे सरकू लागली आणि तेवढ्यात
परमपूज्य बापूंचे मूळ पादुकांचे पालखी दर्शन घडले.. व पुढे सरकत सरकत होतो तेवढ्यात "आला रे हरी आला रे" हा गजर ऐकू येऊ लागला.. सर्व जन त्याला पाहण्यासाठी उत्सुकत होऊन
तो कुठे दिसतोय का म्हणून बघू लागले, नंतर लाईन पुढे गेली आणि आत शिरल्याबरोबर श्री गुरुक्षेत्रम मंत्र ऐकायला आला, थोड्या वेळात सद्गुरू चालीसा मध्ये सर्वजण नाहून गेले ,
आणि मग त्याला भेटण्याकरिता पुढे पुढे लाईन गेली, आणि शेवटी "तो दिसला", ते आईचे हास्य , ती दादांची नजर, आणि त्या सावल्या चे तेज जणू तो आपलीच वात पाहतोय..
अगदी मनापासून दर्शन घडला, ह्यावेळी बहुतेक जन आई आई हाक मारत होते.. त्याच्या समोर बसून सद्गुरू चालीसा म्हणण्याचे भाग्य भेटले. त्याचे भाव चित्र रूपात साठवण्यासाठी
फोटोग्राफर ची धावपळ, आणि त्या विशाल गर्दीला नीट दर्शन व्हावा म्हणून वोलेनतीअर्स ची धावपळ , आणि मग त्रिविक्रमाची पूजा व दर्शन, आणि बाहेर आल्यावर अग्निहोत्रात
उद अर्पण केला जात होता.. आणि पुढे गेल्यावर आपल्या डोक्यावरती "श्री राम" लिहिलेले ईश्तिका{वीट} , आणि फाल्गुनी फाटक च्या आवाजातल्या "साईराम जय जय साईराम दत्तगुरू सुखधामा
अनिरुद्ध बापू सद्गुरुराया, किरपा कर्जो दे न छाया किरपा कर्जो दे न छाया , साईराम जय जय रमते राम आयोजी उडिया कि गोनिया लायोजी " ह्या गाज्रावर्ती प्रदक्षिणा गर्दी असल्यामुळे ह्या वेळी फक्त
एकदाच प्रदक्षिणा मारता आली .... खरच किती अद्भुत अशी गुरुपौर्णिमा साजरी झाली .. बाप्पा, आई, आणि मामाचे किती हाथ दुखले असतील एवढ्या जनसमुदायाला दर्शन देता देता... खरच त्यालाच आपले कौतुक
"कोणा नाही इतुके कौतुक धर्म ह्याचा आगळा "
"धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायची "
"
No comments:
Post a Comment