Monday, May 2, 2011

श्री वरदा चंडिका प्रसोनात्सव पूर्वतयारी : भाग १

श्री वरदा चंडिका प्रसोनात्सव
८ मे ते १८ मे दरम्यान संपन्न होणार्या "श्री वरदाचण्डीका प्रसन्नोत्सवा"ची जोरदार तयारी सुरु आहे. श्री हरिगुरुग्राम बांद्रा येथे होणार्या या उत्सवाची तयारी तर आता युद्ध पातळीवर सुरु आहे. गुरुवारीच या उत्सवासाठी मंडप घालून झालेला होता आणि खरच किती वेगळे वाटत होते. गुरुवारी "जयंती मंगला काली..." हा गजर सुरु झाला आणि आता मोठ्या आईच्या आगमनाला केवळ दहाच दिवस उरले आहेत हे जाणवले...आता ही धूम आहे तर उत्सवात काय होईल?

शुक्रवारपासून श्री हरिगुरुग्रामला पुढची तयारी सुरु झाली. जितका उत्सव मोठा तितकी त्याची पूर्वतयारी मोठी...या उत्सवाची पूर्वतयारी बापूंनी या उत्सवावर केलेल्या पहिल्या प्रवचनापासून सुरु झाली. बापूंची तयारी कधीपासून असेल हे त्यांनाच ठाऊक.

सर्वप्रथम, कंठकूप पाषाण पूजन आणि १०८ नद्या आणि सप्तसमुद्रांचे जल जमा करण्याची सेवा सुरु झाली. भक्तांनी मोठ्या अपार कष्टाने जगभरातून, देशातून नद्यांचे आणि सप्त समुद्राचे जल जमा केले. श्री कंठकूपपाषाण पूजन जगभरात झाले. अनेक भक्तांनी त्यांच्याकडील कंठकूपपाषाणांचे फोटो फेसबुकच्या मार्फत शेअर केले.  वैभवसिंह कर्णिक यांनी फेसबुकवर दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत ४० कुटुंबीयांकडे हे पूजन झाले.

प्रथम पूजन परम पूज्य बापू, नंदाई व सुचितदादांनी श्री हरीगुरुग्राम  १६ डिसेबर २०१० रोजी केले. १ मे रोजी कंठकूप पाषाण पूजनाची अखेरचा दिवस होता. २ मे रोजी हॅपी होम येथे श्री कंठकूपपाषाण जमा करण्यात आले. ह्या कंठकूपाषाणांच्या पूजना पासून पूर्वतयारी पर्यंत काही महत्त्व पूर्ण टप्पे आपण या पूढे पाहणार आहोत. तोपर्यंत.....

जय अंबे जय भवानी!!!!
श्रीराम

No comments:

Post a Comment

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected