Thursday, September 15, 2011

आता करा ऑनलाईन डोनेशन Aniruddhafoundation.com वर

FACEBOOK NOTE BY SAMIRSINH - VAIDYA-DATTOPADHYE

Hari Om Dear Friends,
Great News to all!

Now we can make online donations to our sanstha through Shree Aniruddha Upasana Foundation website. i.e. www.aniruddhafoundation.com

To Donate online you will need to visit the following link:

Please note that currently only State Bank of India (SBI) customers having an internet banking account can make donations by using this payment gateway. We are in the process of setting up processes that will enable everyone with an internet banking account or with debit/credit cards to make donations irrespective of their Bank.

Currently, we have started the SBI iCollect module through which SBI customers can make online donations and support our sanstha.


(Pls refer to the attached image denoting the location of the online donations icon on our SAUF website)

Hari om!

Donate Online: 


सत्पात्री दान करायला आपल्याला बाप्पाने हा मार्ग उघडून दिला आहे. आपण सर्वांनी त्याचा नक्की वापर करावा. ज्या श्रद्धावान भक्तांना दर गुरवारी प्रवचन स्थळी जाऊन स्वेचा निधी देता येत नाही, तसेच फेसबुक वर अनेक कॉसेस हि आहे त्यासाठी आपण ह्याचा नक्कीच वापर करू शकतो. "किती करावे हे महत्वाचे नाही आहे" चला तर मग ह्या सुवर्ण संधीचा आपण पुरेपूर फायदा घेऊया.....

Wednesday, September 14, 2011

सावळे सुंदर बापूचे रूप मनोहर

सावळे सुंदर बापूचे रूप मनोहर ,
हृदयी माझ्या विरजिले !!दृ !!

गोड नामात ह्याच्या झालो मी धन्य ,
अनिरुद्ध अनिरुद्ध , चरणी तुझ्या शारण्य !! १ !!

तुझे हास्य पाहण्या आलो मुंबई नगरीत,
तुझे दर्शन होता मीच झालो पतित !!२!!

बाळ हा मी तुझा बापू आलो शरण ,
घ्यावे जवळ मजला मी तो अभागी बटिक !!३!!

                - केदारसिंह मदन ,
               डोंबिवली {पूर्व }

खरच ह्या अनिरुद्धच्या आपल्या बाप्पाच्या नुसत्या एका दर्शनाने जीवनाचे सार्थक होते , अश्या ह्या ओमकार व्यापक अनिरुद्धला ह्या त्याच्या बाळाचा शाश्तांग नमस्कार...

Friday, September 9, 2011

बापूंची घोर तपश्चर्या

FACEBOOK NOTE BY SWAPNILSINH DATTOPADHYE.



बापूंची घोर तपश्चर्या

"अनेक श्रध्दावानांची अजूनही व्यवस्थित उपासना होत नाही, किंबहूना गुरुमंत्राची दिक्षा बापूंकडून मिळूनही अनेक श्रध्दावानांच्या मनात अनेक तर्ककुतर्क आहेत. त्यामुळेच त्यांना ह्या गुरुमंत्राचे फळ प्राप्त होत नाही या सर्वावर उपाय म्हणून बापूंनी स्वतः घोर तपश्चर्या करण्याचे ठरविले आहे".

बापूंची ही तपश्चर्या प्रामुख्याने तीन प्रकारे होणार आहे.

१) आदिमाता चण्डिकेच्या ब्रम्हत्रिपुरसुंदरी स्वरुपाची उपासना
२) बला अतिबला उपासना
३) सावित्री उपनिषदानुसार सावित्री स्वरुपाची उपासना

या तपश्चर्येचा हेतू :

या गुरुक्षेत्रम् मंत्रावर, या गुरुक्षेत्रम् वर व बापूंवर प्रेम करणार्‍या सर्व श्रध्दावान भक्ताच्या जास्तीत जास्त चुका कमी करुन, त्यांच्यावर कर्जाच्या राशी जमू नयेत व त्याला जास्तीत जास्त क्षमा मिळावी म्हणून बापू ही तपश्चर्या करणार आहेत.

१) ही उपासना अश्विन शुध्द नवरात्रीच्या अर्थात अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते चैत्र नवरात्रीच्या अर्थात शुभंकरा नवरात्रीच्या नवव्या दिवसापर्यंत म्हणजेच रामनवमी पर्यंत चालणार आहे.

२) या दरम्यान बापू श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचनासाठी येतीलच असे नाही. तसेच ते श्रीहरिगुरुग्राम येथे आले तरी प्रवचन करतीलच असे नाही. या तपश्चर्येदरम्यान बापू पूर्ण मुक्तावस्थेत असणार आहेत.

३) मात्र ते या तपश्चर्येच्या कालखंडात दर दिवशी कमीत कमी एकदा तरी गुरुक्षेत्रम् येथे येणार आहेत. तसेच या दरम्यान ते श्री धनल़क्ष्मी पूजन, अनिरुध्द पौर्णिमा, त्यानंतर असणारे अधिवेशन, आत्मबल कार्यक्रम, गाणगापूर दर्शन, जळगांव दौरा ई. कार्यक्रमांना मात्र नक्की असणार आहेत.

४) या तपश्चर्येच्या दरम्यान श्रीहरिगुरुग्राम येथे काही विशिष्ठ कार्यक्रम होणार आहेत. याचा प्रमुख उद्देश म्हणजे सर्व श्रध्दावानांच्या उपासनांना बळ प्राप्त व्हावे तसेच सर्व श्रध्दावान निश्चिंत, निर्धास्त व्हावेत हा आहे.

५) या तपश्चर्येनंतर बापूंच्या आज्ञेवरून परत सर्व गोष्टी सुरु होतील

६) बापूंच्या या तपश्चर्ये दरम्यान प्रत्येक श्रध्दावान भक्ताने कमीत कमी एकदा तरी ह्नुमानचलीसा म्हणावी. व ही हनुमान चलीसा त्याने विश्वकल्याणासाठी समर्पित करावी. तसेच या तपश्चर्ये दरम्यान प्रत्येक श्रध्दावानाने स्वताला दूषणे देणे, पापी समजणे, कमी लेखणे पूर्णपणे थांबवावे. व जास्तीत जास्त वेळ भक्ती व उपासनेत घालवावा.

७) या तपश्चर्येचे फलित म्हणजे सर्वांग ब्रम्हास्त्र व सर्वांग करुणाश्रय. अर्थात जे वाईट आहे चुकीचे आहे त्याचा नाश करणारे असे ब्रम्हास्त्र व जो बापूंवर, या भारतावर प्रेम करतो त्याच्यासाठी करुणाश्रय यांची स्थापना बापू गुरुक्षेत्रम् येथे करणार आहेत.

या सर्वाचा भाग म्हणून प.पू सुचितदादांच्या आज्ञेने रविवार दि. २ ऑक्टोबर २०११ रोजी १०८ वेळा अनिरुध्द चलीसा पठणाचा कार्यक्रम श्रीहरिगुरुग्राम येथे सकाळी ९.३० ते रात्रा ८.३० वाजेपर्यंत आयोजीत केला आहे. बापूंच्या या तपश्चर्येदरम्यान प्रत्येक श्रध्दावानाला जास्तीत जास्त ताकद, निर्भयता, निश्चितता प्राप्त व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यामुळे प्रत्येक श्रध्दावान भक्त यात सहभागी होऊ शकतो. तसेच येथे प.पू बापू, प.पू नंदाई व प.पू सुचितदादा यांची पदचिन्ह येथे दर्शनासाठी ठेवलेली असतील त्यावर प्रत्येक श्रध्दावान बेल व तुळशीपत्र वाहू शकतो.

" मर्दथ झटतो किती बापू माझा " खरच या बापू एवढी माझी काळजी कोणालाच नाही या माऊलीच्या या तपश्चर्येत आपण खरतर काहीच करु शकत नाही पण त्यानेच सांगितलेल्या भक्तीच्या व उपासनेच्या मार्गाने आपण यात खारीचा वाटा उचलण्याचा तरी प्रयत्न करुया.




Source {Facebook Note of swapnilsinh}

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected