Wednesday, December 28, 2011
Saturday, December 24, 2011
31st December Upasana
English Translateration
Last to last year, on 31st December which was a Thursday, after the regular discourse, Parampoojya Sadguru Shree Aniruddha Bapu, Nandai and Suchitdada had wished all Shraddhavaans A HAPPY & PROSPEROUS NEW YEAR following which Parampoojya Sadguru Shree Aniruddha Bapu asked everyone present to join Him in offering prayers for the New Year. These prayers and their sequence to be followed while chanting is as mentioned below:
1) Vijay Mantra - Ramo Raj Mani...
2) Ghorkashtooddharan Stotra.
3) Mantra- Anasuyotrisambhuto...
4) Adimata Shubhankara Stavan and/or Aadimata Ashubhanaashini Stavan.
5) Mantra - Sarva Mangal Maangalye...
6) Jap-Om Aiem Hrim Clim Chamundayaiy Vichhe mantra.
7) Jap-Om Krupasindhu Shri Sai Nathaya Namah.
8) Shree Akkalkot Swaami Samartha Stavan
These prayers can be offered every year during the transition period
from old year to a new year i.e. from 11:50 pm to 12:10 am.
----------------------------------------------------------------------------------------------------------
Marathi Translateration
गेल्याच्या गेल्या वर्षीच्या ३१ डिसेम्बर रोजीच्या गुरवारी , प्रवचननंतर ,परमपूज्य बापूनी, नंदाई , व सूचित दादांनी नि सर्व श्रद्ध्वान मित्रांना नववर्षाच्या शुबेच्या दिल्या , तसेच बापूनी उपस्थिथ श्रद्धावानन कडून नववर्षाची उपासना करून घेतली. त्या उपासनेच तपशील पुढील प्रमाणे:
1) विजय मंत्र - रामो राजमणी ...
2) घोर्काश्तोधारण स्तोत्र .
3) मंत्र - अन्सुयोत्रीसाम्भूतो ...
4) आदिमाता शुभंकर स्तवन and/or आदिमाता अशुभानाशिनी स्तवन .
5) मंत्र - सर्व मंगल मांगल्ये ...
6) जप -ओम ऐं ह्रीं कलीम Chamundaye विच्छे मंत्र .
7) जप -ओम कृपासिंधु श्री साई नाथाय नमः .
8) श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तवन .
Tuesday, November 29, 2011
KiratRudra &ShivGangaGauri Sthapana Sohla
There is going to be a 4 day program, the Shree Kiraatrudra and Shree
Shivagangagauri Sthapana Sohala, starting from 12th of December 2011 to 15th
December, 2011 at Shree Aniruddha Gurukshetram.
It Has Been Named as "LAKSHABILVARCHAN YUKTA MAHARUDRA"
The program shall start at around 7:30 every morning and culminate at around 8:00 pm every evening. On the first 3 days, there will be Archan and Abhishek on the RUDRA LINGA. On the 4th day, there will be LAKSHABILVARCHAN ie. 100,000 Bilva patra archan on the RUDRA LINGA.
On the first 2 days there will occur the sthapana of the Shree Kiraatrudra and Shree Shivagangagauri at Shree Aniruddha Gurukshetram.
!!Hariom!!
Sachidanand Utsav Details
Details By Dr. Yogindrasinh Joshi About Shree Sachidanand Utsav.
For clear view watch in full screen. Or Download it .Sachidanand Aniruddha
Source : Atul ahire
For clear view watch in full screen. Or Download it .Sachidanand Aniruddha
Source : Atul ahire
Sunday, November 13, 2011
नित्य अनिरुद्ध पौर्णिमा....
अखेर तो दिवस उजाडला दि :१२/११/२०११, सकाळी उठल्या क्षणापासून फक्त माझ्या बापुरायला भेटण्याची ओढ.कधी त्याला पाहतोय असं झालेलं सकाळी ७.००चि दादर लोकल पकडली आणि डोंबिवली वरून निघालो , गाडीत अनेक बापू भक्त भेटले मग काय अजून धम्माल झाली नुसती बाप्पा विषयीच चर्चा. कधी वही लिहणं तर कधी स्तोत्र म्हणणं सुरूच होता, तोच कुर्ल्याला उतरलो आणि रिक्षात बसून थेट येऊन पोहोचलो ते गेट नंबर २ जवळ . भाक्तीगंगे मध्ये अनेक जन नहात होते तेवढ्यात माझा मित्र पण आला व आम्ही दोघे त्या अनिरुद्धच्या लाभेवीण प्रीतीच्या भक्ती गंगेत नाहून जात होतो . आत जाताक्षणीच पहिले दर्शन झाले ते मुख्य स्टेज चे एका बाजूला मत अनुसया बाल रूपातील दत्त्बाप्पा सोबत, आणि दुसर्या टोकाला गायत्री माता आणि मध्ये पवित्र कतराज आश्रमात महिशासुर्मार्दीनीने {मोठ्या आईने} आपले पहिले पूल टाकले त्या पौलाचे दर्शन झाले.
व आपल्या जागेवर येऊन बसलो थोड्यावेळातच श्री मद ग्रंथराज्चे आगमन झाले.
आणि थोड्या क्षणीच सार्वजन ज्या सावळ्या कृष्णाची वाट बघत होते तो क्षण आला बाप्पाचे पूल पडताच क्षणीच "आला रे हरी आला रे" हे गीत लावले गेले व रणवाद्य ,तुतारी, व शंख ह्या सोबत आपला बाप्पा आई आणि मामा येत होते.सार्वजन अगदी भेभान होऊन नुसते त्या सद्गुरू ला पाहत होते
मग "ओम मनः सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धास नमः " त्यानंतर अनिरुद्ध कवच सुरु झाले.. व बाप्पा, आई , मामा स्टेज वर येऊन बसले.
त्यानंतर अनेक ठिकाणावरून आलेल्या श्रद्धावानांच्या परेड पथकाने सद्गुरूंना मानवंदना दिली ,व बापू, आई, मामानी सुद्धा त्यांना सलामी दिली,
व मग पहिली आरती सुरु झाली ....
आरती नंतर मी व् माझा मित्र निलेशसिंहआम्ही दर्शन घेतले अगदी मन प्रसन्न झालेले, ती लाभेविन करुणामयी अनिरुद्ध माउली आपल्या लेकरासठी उभीच होती , आईचे ते स्मित हास्य पाहून मनातील थकवा कुठच्या कुठे पळून गेला,दादांची ती नजर ने जणू ताकद दिली आणि अखेर तो सावळा सुंदर अनिरुद्ध दिसला जोर जोरात बापू बापू हक सर्वजण मारत होते आणि तो पण प्रत्येकाला फलेनकीस देत होता.... नंतर आरती नंतर बाप्पा , आई, व मामा गाऱ्हाणे च्या इथे आला, अप्प्यांचा प्रसाद ला हस्तस्पर्श केला आणि विठ्ठल उभा राहिला "हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा"
व मग अग्निहोत्र च्या इथे जाऊन उद अर्पण केले,
व तसाच तो किरातृद्राच्या इथे गेला व तिथून रामरक्षा पठण कक्षात गेला तिथे थोड्यावेळ उभाराहून सर्वाना आपल्या प्रेमाचा वर्षाव देत तो परत आला ... दर एक एक तासांनी सर्वजण बाप्पाची आरती करत होते, तर हॉल मध्ये काहीजण किरात रुद्र पूजन करत होते,
लाभेवीन प्रीतीच्या संध्याकाळी ती अनिरुद्ध माउली गजराच्या तालावर नाचत होती व सर्वजण मंत्र मुग्ध झाले,
व बापू ,स्वप्निलसिंह, पौरस सिंह, समीर दादा ह्यासार्वनी मिळून किरात रुद्र पूजन केले.
व त्यानंतर महाआरती ला सुरवात झाली.....
अश्याप्रकारे हि अनिरुद्ध पौर्णिमा संपन्न झाली पण एका अर्थाने ती नित्य अनिरुद्ध पौर्णिमा झाली ह्यावर्षीपासून प्रत्येक अनिरुद्ध पौर्णिमेला बापूनी किरात रुद्र पूजनाची परवानगी दिली.
Thursday, November 10, 2011
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०३.११.२०११)
॥ हरी ओम॥
आषाढ पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा ह्या पौर्णिमा वेगळ्या नावाने ओळखल्या जातात आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा, अश्विन पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखल्या जातात.
ह्या त्रिपुरारीच्या आईचं नाव महिषासूरमर्दिनी आहे, ज्याला तिने मारला त्या नावाने ओळखली जाते त्याप्रमाणे ह्याने त्रिपुरासुराचा नाश केला म्हणून त्रिपुरारी म्हणतात.
साध्या गोष्टीत छान शोधणं , छान बनवणं म्हणजे चिंतन. मूल जेवत का नाही ह्याबद्दल आई विचार करते म्हणजे चिंतन करते. नंतर ती लहान मुलाला कुठले पदार्थ आवडतात ह्याचा शोध घेते आणि मग निरनिराळ्या भाज्या भातांमध्ये, पराठ्यामध्ये घालून मुलाला आवडेल असं खायला बनवते हा तीचा अभ्यास म्हणजे सराव असतो. साड्या घेताना बायका चांगल्या साड्या कुठल्या, कुठल्या साड्या माझ्या मैत्रिणी कडे नाहीयेत ह्याचं चिंतन करतात, नंतर त्या साड्या कुठल्या दुकानात कमीत कमी किंमतीत मिळतात ह्याचा शोध घेतात आणि नंतर ते कितीही लांब असलं तरी त्या ठिकाणी जाऊन साडी घेतात अशा प्रकारे आपल्या आयुष्यात चिंतन, शोध आणि अभ्यास आपोआप चालूच असतो.
आधी चिंतन नंतर शोध नंतर अभ्यास म्हणजे पुरुषार्थ त्यानंतर यश मिळते यशानंतर तृप्ती येते तृप्तीतून शांती मिळते. स्मशान शांती नव्हे समाधानकारक शांती मिळते. आम्हांला यश मिळालं तरी तृप्ती आणि शांती मिळतेच असं नाही. कारण आमच चिंतन, शोध आणि अभ्यास ठरवून केलेला नसतो. नित्य कर्म असो, नैमित्तिक कर्म असो प्रत्येक कर्मात चिंतन, शोध, अभ्यास सुरुच असतो. वाईट माणसांचा मुद्दामहून प्रतिस्पर्धकां बद्दल चिंतन, शोध आणि अभ्यास करत असतात. चिंतन, शोध, अभ्यास ह्या तीन गोष्टी चांगल्या मार्गाने, पवित्र मार्गाने, परमेश्वराचं स्मरण करुन केल्या तर पुढील यश, तृप्ती आणि शांती ही मिळते.
मातृवात्सल्यविन्दानम् मध्ये घडणारी सगळी युद्ध ही शरीरातील नऊच्या नऊ चक्रात चालू असतात आणि प्रत्येक पातळीवर देवीचा, दैवी शक्तीचा म्हणजेच तुमचा विजय होतो आणि तुम्हाला अपयश देणार्या गोष्टींचा पराजय होतो. लढणं हा देवी तत्त्वाचा प्रमुख गुणधर्म आहे म्हणून लढाईसाठी लागणारी ताकद मातृवात्सल्यविन्दानम् पासून मिळते. चिंतन, शोध आणि अभ्यास ह्या गोष्टी शिव बाणाने वापराव्या लागतात. शिव म्हणजे पवित्र मार्गाने. त्रिपुरारीला एका रेषेत येऊ न देण्याची जी शक्ती होती तिचा नाश शिवगंगागौरी व किरातरुद्रांनी केला.
त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस प्रत्येक मनुष्याला चिंतन, शोध व अभ्यास ह्याच्यातून जास्तीत जास्त यश, तृप्ती, शांती मिळवून देतो. ह्या दिवशी जो कोणी चांगल बनण्यासाठी चांगला प्रयास, चांगल चिंतन करेल त्यांना मी यश देईन असा परमशिवाचा वर आहे. त्याने वरदान दिलं नाही तरी भक्तांना problem येतो आणि दिलं तरी ही भक्तांनाच problem येतो कारण तो वर इतर कसे वापरतात depend असतं. जे शुभमार्गीय आहेत त्यांचे संकल्प पूर्ण होण्याची शक्ती वाढते, जीवनातलं नैराश्य, अशांती झटकून टाकण्यासाठी ह्या दिवसासारखा दिवस नाही. ह्या दिवशी परमशिव, पार्वती, किरातरुद्र आणि शिवगंगागौरी हे चारही जणं प्रत्येक श्रध्दावानांसाठी चिंतन, शोध आणि अभ्यास त्याचबरोबर यश, तृप्ती आणि शांती ह्यांचा balance करण्यासाठी टपलेले असतात.
मला चांगलं बनायचं आहे असा संकल्प करा, मी जे काही चांगलं करत नाही ते चांगलं करण्यासाठी चांगले संकल्प करा. १०० संकल्प करा ९९ विसरलात तरी एक तरी लक्षात राहील. त्या त्रिपुरारीचं कुठलही नाव घेत घेत आपल्या जीवनाचं चिंतन करा. कमीत कमी त्याच्या नामाचं, त्याच्या गुणांच चिंतन करायला पाहिजे. maximum त्याचं चित्र, त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणता आली पाहिजे.
ह्या दिवशी जो कोणी परमात्मात्रयीचं स्मरण करतो, परमात्म्याचं नाम, भजन, चिंतन सुरु करतो स्वत:साठी केलेलं चिंतन परमात्म्याच्या चिंतनाशी जोडतो त्याला यश मिळतं अशी योजना मोठ्या आईने केलेली आहे. हा दिवस वर्षातून एकदाच येतो.
ह्यावर्षी ह्या दिवशी आपण किरातरुद्राचं पूजन करणार आहोत. ह्या पूजनासाठी किरातरुद्राची सुंदर मूर्ती तयार केली गेली आहे जी पूजनानंतर विसर्जन केली जाईल.
ह्या पूजनासाठी पोस्टकार्ड सारखे तीन पेपर दिले जातील त्यावर ठिपक्यांनी किरातरुद्राची आयुधे काढलेली असतील - शृंगी, धनुष्यबाण आणि त्रिशूल.
प्रथम मंगलाचरण होईल नंतर ही आयुधं हळद व पाणी ह्यांच्या सह्याय्याने कागदावर उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूच्या बोटाने (अनामिकाने) चित्र काढायचं ते ताम्हणात आधी शृंगी त्यावर धनुष्य आणि बाण आणि त्यावर त्रिशूलचा कागद ठेवायचा. मग दुसरे स्तोत्र म्हटलं जाईल त्यावेळी सफेद फुलं अर्पण करायची नंतर विशेष नामाचं पठण होईल तेव्हा त्यावर बिल्व पत्र अर्पण करायचं. सगळी स्तोत्रं माझ्या (परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या) आवाजात आहेत. त्यानंतर किरातरुद्राला प्रिय असणारा नैवेद्य अर्पण करायचा आहे. सुक्या खोबर्याची वाटी आणि एका पिशवीत यवाचं पीठ असेल. ते अर्पण करायचं.
ते तीन कागद आणि अर्पण केलेला नैवेद्य आपल्याबरोबर घेऊन जायचा. घरी जाताना पूजनाचे १००% व्ह्यायब्रेशन्स् आपण बरोबर घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणून ह्या कागदांबरोबर १०८% व्ह्यायब्रेशन्स् बरोबर घेऊन जाऊ शकतो. हे कागद कमीत एक रात्र आणि जास्तीत जास्त सात दिवस तुमच्या घरी ठेवू शकता त्यानंतर ते कागद पाण्यात विसर्जन करावेत किंवा तुळस, केळी किंवा औदुंबराच्या झाडाखालील मातीत पुरावेत म्हणजेच भूमातेला अर्पण करावेत. घरातील कोणी व्यक्तीने किंवा मित्रमंडळींमधील कोणी पूजन केलेले नसेल तर ज्या व्यक्तीने हे पूजन केले आहे त्या व्यक्तीने ते कागद त्यांच्या मस्तकाला लावावेत त्यामुळे त्यांनाही पूजनाचे व्हायब्रेशन्स् मिळू शकतील.
खोबरे जेवणात वापरावं व्हेज-नॉनव्हेज कशातही वापरा मला(परमपूज्य बापूंना) फरक पडत नाही. यवाच्या पिठात दूध व पिठी साखर मिक्स करुन ते प्रसाद म्हणून द्यावा.
त्यानंतर मार्गशिर्ष महिन्यात गुरुक्षेत्रम्मध्ये किरातरुद्र आणि शिवगंगागौरी ह्यांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यावेळी आपल्या गुरुक्षेत्रम्च्या उदीमध्ये जी गोविद्यापिठम् मध्ये तयार होते त्या उदीत मी(परमपूज्य अनिरुद्ध बापू) करत असलेल्या यज्ञाचे भस्म मिक्स केले जाते. त्यातच आता परशूरामाला किरातरुद्राकडून मिळालेले भस्म मिसळण्यात येणार आहे. हे भस्म म्हणजे माझी (परमपूज्य बापूंची) रेणूका माता सती गेली त्यावेळी तिच्या चितेचे भस्म जे दत्तात्रेयांनी किरातरुद्राकडून परशूरामाला दिले होते ते आहे. त्याच बरोबर उदीच्या बाजूला एका पात्रात हळद ठेवली जाईल ही हळद म्हणजे रेणूका माती सती जाताना तिच्या मळवटातील तीने जी हळद काढून दिली होती ती परशूरामाला शिवगंगागौरी कडून मिळाली होती ती हळद गुरुक्षेत्रम्मध्ये ठेवण्यात येईल आणि ती पूर्णपणे विनामूल्य असेल. ह्या मी(परमपूज्य बापू) माझ्या गोष्टी तुम्हाला देतोय ह्या विकून दिल्या जात नाहीत. मी(परमपूज्य बापू) माझ्या आईबापाला विकू शकत नाही.
ही हळद घरातील कुठल्याही मंगलकार्याला, पूजनाला वापरु शकता, हळदी-कुंकवाच्या समारंभासाठी वापरु शकता, शत्रू घरी आला तरी शत्रुला लावू शकता (पुरुषांनाही हळद लावतात), लग्नकार्यातील हळदी समारंभात वापरु शकता, कोणी तुमच्यावर ब्लॅक मॅजिक केलेलं असेलं आणि तुम्ही ही हळद लावलेली असेल तर ते ब्लॅक मॅजिक ज्याने केलेयं त्याच्यावरच उलटेल. अशी ही हळद आणि हे भस्म ह्या जन्मात आम्हाला प्राप्त झालयं मग ह्याचा पूर्ण उपयोग करुन घ्या.
त्रिपुरारी पौर्णिमा १० तारखेला असली तरी आपण ती १२ तारखेला साजरी करणार आहोत म्हणून आपल्यासाठी अनिरुद्ध पौर्णिमा १२ तारीखच चंद्राचं चंद्र बघून घेईल मी (परमपूज्य बापू) सांगितलेल्या तारखेला आपली अनिरुद्ध पौर्णिमा असेल. त्यामुळे आता पासूनच उत्सवाला तयारी करा.
॥ हरि ॐ॥
जाण रे जाण तू या त्रिपुरारीला....
|| हरी ओम ||
श्रद्धावानानो "श्री अनिरुद्ध पौर्णिमा" उत्सवात सहभागी होवून श्रद्धावानांसाठी नित्य प्रवाहित होणाऱ्या व श्रद्धावानांना शुद्ध करणाऱ्या श्री अनिरुद्धांच्या प्रेमरूपी तीर्थगंगेत न्हाउया व अनिरुद्ध कृपा प्राप्त करूया.
"जाण रे जाण तू या त्रिपुरारीला,
दाता अनिरुद्ध गायत्री नंदन आला."
सद्गुरू श्री अनिरुद्धांचा आधार जाने म्हणजेच मानव जन्माचे सार्थक करणे अर्थात "जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस" कारण....
१) ह्याच त्रिपुरारी पौर्णिमेला श्री गायत्री मातेने अनिरुद्धाना नवअंकुर ऐश्वर्याने सिद्ध करून सर्व विश्वाच्या कल्याणासाठी भूलोकी पाठवले आहे.२) ह्याच त्रिपुरारी पौर्णिमेला अनिरुद्धांची आजी श्रेष्ठ विठ्ठलभक्त शकुंतला पंडित ह्यांनी बाल अनिरुद्धाना वयाच्या आठव्या वर्षी मुंबई वडाळा येथील विठ्ठल मंदिरात नेले व आजपासून ह्याला "बापू" म्हणायचे असे सर्वाना सांगून अनिरुद्धांचे "बापू" हे नामकरण केले.
३) ह्याच त्रिपुरारी पौर्णिमेला परमात्म्याने शिव स्वरुपात त्रिपुरासुराचा वाढ केला म्हणून तिला 'त्रिपुरारी पौर्णिमा' म्हणतात. तर त्रिपुरारी पौर्णिमेला अनिरुद्ध दत्तगुरू व गायत्री मातेच्या आज्ञेने भूलोकी आले म्हणून श्रद्धावान कार्तिक महिन्याच्या ह्या पौर्णिमेला "अनिरुद्ध पौर्णिमा" म्हणतात.
१) श्री अनिरुद्ध पौर्णिमेला श्रद्धावान हरिहर स्वरूप असलेल्या त्रिविक्रमाचे तुलसी व बेल वाहून पूजन का करतात?
अनिरुद्ध पौर्णिमेला अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेला हरी व हर एकमेकांना समानपणे भेटतात. जो हरिहर अनिरुद्ध आहे तोच हरिहर स्वरूप त्रिविक्रम आहे म्हणून हरिहर स्वरूप असलेल्या त्रिविक्रमाचे श्रद्धावान तुलसी व बेल वाहून पूजन करतात.
२) सद्गुरू श्री अनिरुद्धांचे 'अनिरुद्ध' हे नाम कोणी ठेवले?
श्री गोपीनाथशास्त्री जगन्नाथशास्त्री पाध्ये हे श्री अनिरुद्धांचे मानवी गुरु हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. सर्व वेद व शास्त्रांत ते अत्यंत पारंगत व विद्वान म्हणून त्याकाळी ते प्रसिद्ध होते. त्यांना श्री विठ्ठल परमात्म्याने व श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या अनुभूतीप्रमाणे त्यांच्या नातीच्या उदरी 'त्रिपुरारी पौर्णिमेला' "तो" येणार ह्याची त्यांना खात्री झाली होती.
गोपीनाथ शास्त्रींची कन्या मालती पाध्ये तीच विवाहानंतरची शकुंतला पंडित. तिची कन्या अरुंधती तीच गोपीनाथ शास्त्रींची नात व लग्नानंतरची सौ. अरुंधती धैर्यधर जोशी.
श्री स्वामी समर्थांनी शकुंतला पंडित यांचे पती नरेंद्रनाथ पंडित यांना दिलेल्यादृष्टांताप्रमाणे अरुंधतीच्या पोटी त्रिपुरारी पौर्णिमेला 'दिव्य नील तेज' अवतीर्ण झाले .. तोच तो'अनिरुद्ध' जन्मदिवस त्रिपुरारी पोर्णिमा १८ नोव्हेंबर १९५६. त्या अनिरुद्धांचे "अनिरुद्ध" हे नाम १६ वर्षे आधीच श्री गोपीनाथ शास्त्रींच्या इच्छे प्रमाणे शकुंतला पंडित (अनिरुद्धांच्या आईच्या आई) व द्वारकामाई (गोपीनाथ शास्त्रींची पत्नी) यांनी अरुंधती पुत्राचे नाम 'अनिरुद्ध' असे ठेवले.
हाच तो श्रद्धावानांच्या जीवनात श्रद्धावानांच्या दुष्प्रारब्ध नाशासाठी अवतरीत झालेला श्रद्धावानांचा सेनापती, महायोद्ध, व लाडका सद्गुरू... सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू....
३) सद्गुरू श्री अनिरुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला का अवतीर्ण झाले आहेत?
कारण असे आहे कि 'श्री अनिरुद्ध चालीसा' मध्ये अनिरुद्धांचे संकीर्तनकरताना "कार्तिक मास कि पुरण मासी, प्रगत भरे जय जय त्रिपुरारी" असे संकीर्तन केले आहे. त्या कार्तिक पौर्णिमेचे महत्व काय?
कार्तिक पौर्णिमेला पूर्णत्व असते म्हणून प्रत्येक श्रद्धावानासाठीसद्गुरुतत्वाचे गुरुतेज जशाच्या तशा स्वरुपात स्वीकारण्याची संधी सहजपणे उपलब्ध होते. जशी उर्जा आहे तशी उर्जा या दिवशी मूळ रुपात प्राप्त होते. राधा तत्वाचे प्रेम मूळ तत्वाशी प्रगत होते.. ते याच दिवशी म्हणून अनिरुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मला सद्गुरू श्री अनिरुद्धांकडून मिळालेलं प्रेम मला त्याच्याच चरणी प्रगट करता आल पाहिजे. जसे आपण नदीचे पाणी घेतो आणि नदीलाच अर्पण करतो तसे अनिरुद्धांचे प्रेम घ्यायचे व अनिरुद्धानाच अर्पण करायचे, हे आपल्या हातून घडले कि अनिरुद्ध प्रेमाची नित्य उर्जा आपल्याला कधीच कमी पडणार नाही.
अनिरुद्ध प्रेम हीच माझ्यासाठी नित्य वाहणारी व मला शुद्ध करणारी पवित्र तीर्थगंगा आहे. हि तीर्थगंगा श्रद्धावानांकडे प्रवाहित होते ती अशी...
१. जेव्हा आपण सद्गुरू अनिरुद्धांच्या लीलांचे, त्यांच्या गुणांचे संकीर्तन करतो तेव्हा त्यातून नित्य नूतन सद्गुरू प्रेम प्रवाहीत होत असते आणि सद्गुरूंच्या प्रेमाचा स्त्रोत सर्व सामर्थ्याचा स्त्रोत असल्यामुळे जीवन रसमय व तृप्त होते.
२. जेव्हा आपण सद्गुरू श्री अनिरुद्धांचे प्रेमाने नामसंकीर्तन करतो तेव्हा सद्गुरूचे नामस्मरण सद्गुरूंच्या प्रेमाला आपल्या मनात व बुद्धीत स्थिर करते व सद्गुरू भक्ती वाढीस लागते.
३.जेव्हा आपण सद्गुरू श्री अनिरुद्धांचे दर्शन घेतो तेव्हा सद्गुरू आपल्या मनाला बुद्धीशी जोडतो व उचित भक्ती घडून येते.
४. तसेच अनिरुद्ध नामाची, अनिरुद्ध रुपाची आणि अनिरुद्ध गुणसंकीर्तनाची तीर्थगंगा आपल्या जीवनात शुभ, मंगल आणि कल्याणकारी घटना घडवून आणते.
अनिरुद्धांची हि तीर्थगंगा श्रद्धावानांकडे प्रवाहित होते ती अनिरुद्धांच्या महासिद्ध अमृतवाणीतून, त्यांच्या सहजसिद्ध लेखणीतून, त्यांच्या राजीवलोचनातून व त्यांच्या पावन अशा हस्त व चरणकमलातून ...
श्रद्धावानानो श्री अनिरुद्ध पौर्णिमा हीच आपल्यासाठी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेलाही कोणत्याही भौतिक रूपातील दक्षिणा न स्वीकारणाऱ्या अनिरुद्धाना आपण गुरुदक्षिणा काय देणार ? आपण सर्व जण एवढेच सांगूया कि हे सद्गुरूराया अनिरुद्धा, तुझ्या कडून आम्हाकडे सतत वाहणाऱ्या तुझ्या अकारण करुण्याबद्दल आम्ही तुझे सदैव ऋणी आहोत. आम्ही तुझ्या आज्ञेचे पालन करू, तुझे प्रेम हेच आमचे सर्वस्व आहे.
म्हणून श्रद्धावानानो आपल्याला कधीही विस्मरण होऊ नये अशी गोष्ट म्हणजे.....
"जाण रे जाण तू या त्रिपुरारीला, दाता अनिरुद्ध गायत्री नंदन आला."

!!अनिरुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुबेच्छा!!
Source : श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम
Subscribe to:
Posts (Atom)